< Poslovice 3 >
1 Sine moj, ne zaboravljaj nauke moje, i zapovijesti moje neka hrani srce tvoje.
१माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;
2 Jer æe ti donijeti dug život, dobre godine i mir.
२कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील.
3 Milost i istina neka te ne ostavlja; priveži ih sebi na grlo, upiši ih na ploèi srca svojega.
३विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
4 Te æeš naæi milost i dobru misao pred Bogom i pred ljudima.
४म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील.
5 Uzdaj se u Gospoda svijem srcem svojim, a na svoj razum ne oslanjaj se.
५तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि तुझ्या स्वत: च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;
6 Na svijem putovima svojim imaj ga na umu, i on æe upravljati staze tvoje.
६तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.
7 Ne misli sam o sebi da si mudar; boj se Gospoda i uklanjaj se oda zla.
७तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा.
8 To æe biti zdravlje pupku tvojemu i zaljevanje kostima tvojim.
८हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल.
9 Poštuj Gospoda imanjem svojim i prvinama od svega dohotka svojega;
९तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे,
10 I biæe pune žitnice tvoje obilja, i presipaæe se vino iz kaca tvojih.
१०त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.
11 Sine moj, ne odbacuj nastave Gospodnje, i nemoj da ti dosadi karanje njegovo.
११माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस,
12 Jer koga ljubi Gospod onoga kara, i kao otac sina koji mu je mio.
१२जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो.
13 Blago èovjeku koji naðe mudrost, i èovjeku koji dobije razum.
१३ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते.
14 Jer je bolje njom trgovati nego trgovati srebrom, i dobitak na njoj bolji je od zlata.
१४ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.
15 Skuplja je od dragoga kamenja, i što je god najmilijih stvari tvojih ne mogu se izjednaèiti s njom.
१५ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही.
16 Dug život u desnici joj je, a u ljevici bogatstvo i slava.
१६तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत.
17 Puti su njezini mili puti i sve staze njezine mirne.
१७तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.
18 Drvo je životno onima koji se hvataju za nju, i ko je god drži sreæan je.
१८जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.
19 Gospod je mudrošæu osnovao zemlju, utvrdio nebesa razumom.
१९परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले.
20 Njegovom mudrošæu razvališe se bezdane i oblaci kaplju rosom.
२०त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते.
21 Sine moj, da ti to ne odlazi iz oèiju; èuvaj pravu mudrost i razboritost;
२१माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस.
22 I biæe život duši tvojoj i nakit grlu tvojemu.
२२ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल.
23 Tada æeš iæi bez brige putem svojim, i noga tvoja neæe se spotaæi.
२३नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील, आणि तुझ्या पायाला ठेच लागणार नाही;
24 Kad liježeš, neæeš se plašiti, i kad poèivaš, sladak æe ti biti san.
२४तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल.
25 Neæeš se plašiti od nagle strahote ni od pogibli bezbožnièke kad doðe.
२५जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे, किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस;
26 Jer æe ti Gospod biti uzdanica i èuvaæe ti nogu da se ne uhvati.
२६कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे, आणि तुझा पाय पाशात अडकण्यापासून सांभाळील.
27 Ne odreci dobra onima kojima treba, kad možeš uèiniti.
२७ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, ते करण्यापासून माघार घेऊ नकोस.
28 Ne govori bližnjemu svojemu: idi, i doði drugi put, i sjutra æu ti dati, kad imaš.
२८एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, “जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.”
29 Ne kuj zla bližnjemu svojemu koji živi s tobom bez brige.
२९तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो.
30 Ne svaðaj se ni s kim bez uzroka, ako ti nije uèinio zla.
३०काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही.
31 Nemoj zavidjeti nasilniku, ni izabrati kojega puta njegova.
३१तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस.
32 Jer je mrzak Gospodu zlikovac, a u pravednih je tajna njegova.
३२कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो.
33 Prokletstvo je Gospodnje u kuæi bezbožnikovoj, a stan pravednièki blagosilja.
३३परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; परंतु तो नितीमानांच्या घराला आशीर्वाद देतो.
34 Jer potsmjevaèima on se potsmijeva, a krotkima daje milost.
३४तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो, पण तो नम्रजनांस त्याची कृपा देतो.
35 Mudri æe naslijediti slavu, a bezumnike æe odnijeti sramota.
३५ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील.