< Poslovice 21 >

1 Srce je carevo u ruci Gospodu kao potoci vodeni; kuda god hoæe, savija ga.
राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे; तो त्यास वाटेल तेथे वळवतो.
2 Svaki se put èovjeku èini prav, ali Gospod ispituje srca.
प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात, परंतु परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो.
3 Da se èini pravda i sud, milije je Gospodu nego žrtva.
योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा परमेश्वरास अधिक मान्य आहेत.
4 Ponosite oèi i naduto srce i oranje bezbožnièko grijeh je.
घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात.
5 Misli vrijedna èovjeka donose obilje, a svakoga nagla siromaštvo.
परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो.
6 Blago sabrano jezikom lažljivijem taština je koja prolazi meðu one koji traže smrt.
लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते.
7 Grabež bezbožnijeh odnijeæe ih, jer ne htješe èiniti što je pravo.
दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात.
8 Èiji je put kriv, on je tuð; a ko je èist, njegovo je djelo pravo.
अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो.
9 Bolje je sjedjeti u uglu od krova nego sa ženom svadljivom u kuæi zajednièkoj.
भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहणे अधिक चांगले.
10 Duša bezbožnikova želi zlo, ni prijatelj njegov ne nalazi milosti u njega.
१०दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो; त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही.
11 Kad potsmjevaè biva karan, ludi mudra; i kad se mudri pouèava, prima znanje.
११जेव्हा निंदकास शासन होते तेव्हा अज्ञानी शहाणे होतात; आणि जेव्हा सुज्ञास शिक्षण मिळते तेव्हा त्याच्या ज्ञानात वाढ होते.
12 Uèi se pravednik od kuæe bezbožnikove, kad se bezbožnici obaraju u zlo.
१२नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो, तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो.
13 Ko zatiskuje uho svoje od vike ubogoga, vikaæe i sam, ali neæe biti uslišen.
१३जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही.
14 Dar u tajnosti utišava gnjev, i poklon u njedrima žestoku srdnju.
१४गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते, आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते.
15 Radost je pravedniku èiniti što je pravo, a strah onima koji èine bezakonje.
१५योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो. पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो.
16 Èovjek koji zaðe s puta mudrosti poèinuæe u zboru mrtvijeh.
१६जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो, त्यास मरण पावलेल्यांच्या मंडळीत विसावा मिळेल.
17 Ko ljubi veselje, biæe siromah; ko ljubi vino i ulje, neæe se obogatiti.
१७ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षरस आणि तेल प्रिय आहे तो श्रीमंत होणार नाही.
18 Otkup za pravednike biæe bezbožnik i za dobre bezakonik.
१८जो कोणी चांगले करतो त्याची खंडणी दुर्जन आहे, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो.
19 Bolje je živjeti u zemlji pustoj nego sa ženom svadljivom i gnjevljivom.
१९भांडखोर आणि खूप तक्रार करून अशांती निर्माण करणाऱ्या पत्नीबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले.
20 Dragocjeno je blago i ulje u stanu mudroga, a èovjek bezuman proždire ga.
२०सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत, पण मूर्ख मनुष्य ते वाया घालवतो.
21 Ko ide za pravdom i milošæu, naæi æe život, pravdu i slavu.
२१जो कोणी नीतिमत्ता आणि दया करतो, त्यास आयुष्य, उन्नती आणि मान मिळेल.
22 U grad jakih ulazi mudri, i obara silu u koju se uzdaju.
२२सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो, आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.
23 Ko èuva usta svoja i jezik svoj, èuva dušu svoju od nevolja.
२३जो कोणी आपले तोंड व जीभ सांभाळतो, तो संकटापासून आपला जीव वाचवतो.
24 Ponositom i obijesnom ime je potsmjevaè, koji sve radi bijesno i oholo.
२४गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे. तो गर्वाने उद्धट कृती करतो.
25 Ljenivca ubija želja, jer ruke njegove neæe da rade;
२५आळशाची वासना त्यास मारून टाकते; त्याचे हात काम करण्यास नकार देतात.
26 Svaki dan želi; a pravednik daje i ne štedi.
२६तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो, परंतु नीतिमान देतो आणि मागे धरून ठेवत नाही.
27 Žrtva je bezbožnièka gad, akamoli kad je prinose u grijehu?
२७दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते, तर मग तो यज्ञ दुष्ट हेतूने आणतो ते किती अधिक वीट असे आहे.
28 Lažni svjedok poginuæe, a èovjek koji sluša, govoriæe svagda.
२८खोटा साक्षीदार नाश पावेल, पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो.
29 Bezbožnik je bezobrazan, a pravednik udešava svoje pute.
२९दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो, पण सरळ मनुष्य आपल्या मार्गाचा नीट विचार करतो.
30 Nema mudrosti ni razuma ni savjeta nasuprot Bogu.
३०परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत.
31 Konj se oprema za dan boja, ali je u Gospoda spasenje.
३१लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे.

< Poslovice 21 >