< Sudije 12 >
1 A ljudi od plemena Jefremova skupiše se, i prešavši na sjever rekoše Jeftaju: zašto si išao u boj na sinove Amonove a nas nijesi pozvao da idemo s tobom? spaliæemo ognjem dom tvoj i tebe.
१सर्व एफ्राइमी लोक एकत्र झाले आणि यार्देन नदी पार करून उत्तरेस साफोन नगरात जाऊन इफ्ताहाला म्हणाले, “तू अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला गेलास, तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस? आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू.”
2 A Jeftaj im reèe: imah veliku raspru sa sinovima Amonovijem ja i moj narod, i pozvah vas, ali me ne izbaviste iz ruku njegovijeh.
२तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते; तेव्हा मी तुम्हाला बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही.
3 Pa videæi da me ne izbaviste, stavih dušu svoju u ruku svoju, i otidoh na sinove Amonove, i Gospod mi ih dade u ruke; pa što ste sada došli k meni da se bijete sa mnom?
३तेव्हा तुम्ही सोडवत नाही, हे पाहून मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या स्वत: च्या सामर्थ्याने अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला पलीकडे गेलो, या प्रकारे परमेश्वराने मला विजय दिला; तर आजच्या दिवशी तुम्ही माझ्याशी लढायला मजवर आला आहात?”
4 Tada Jeftaj skupi sve ljude od Galada, i udari na Jefrema; i ljudi od Galada pobiše Jefrema; jer govorahu: bjegunci ste Jefremovi vi, ljudi od Galada, koji se bavite meðu Jefremom i meðu Manasijom.
४तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी मनुष्यांनी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, “एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.”
5 I Galad uze Jefremu brodove Jordanske. I kad koji od Jefrema dobježe i reèe: pusti me da prijeðem, rekoše mu oni od Galada: jesi li od Jefrema? I kad on reèe: nijesam,
५तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतार रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळताना बोलला, “तुम्ही मला पार जाऊ द्या,” असे म्हणे. तेव्हा गिलादी माणसे त्यास म्हणत असत, “तू एफ्राथी आहेस की काय?” आणि तो जर “नाही” असे बोलला,
6 Onda mu rekoše: reci: Šibolet. A on reèe: Sibolet, ne moguæi dobro izgovoriti. Tada ga uhvatiše i zaklaše na brodu Jordanskom. I pogibe u ono vrijeme iz plemena Jefremova èetrdeset i dvije tisuæe.
६तर ते त्यास म्हणत, “आता तू शिब्बोलेथ असे म्हण,” तेव्हा तो “सिब्बोलेथ” असे म्हणत असे (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता). मग ते त्यास धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळी एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली.
7 I Jeftaj bi sudija Izrailju šest godina; i umrije, i bi pogreben u gradu Galadskom.
७इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला; मग इफ्ताह गिलादी मेला, आणि गिलादातल्या एका नगरात त्यास पुरण्यात आले.
8 A poslije njega bi sudija Izrailju Avesan iz Vitlejema.
८मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला.
9 I imaše trideset sinova i trideset kæeri, koje razuda iz kuæe, a trideset djevojaka dovede sinovima svojim iz drugih kuæa; i bi sudija Izrailju sedam godina.
९तेव्हा त्यास तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून तीस कन्या आणल्या; त्याने सात वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
10 Potom umrije Avesan, i bi pogreben u Vitlejemu.
१०नंतर इब्सान मेला, आणि त्यास बेथलेहेमात पुरण्यात आले.
11 A poslije njega bi sudija Izrailju Elon od Zavulona; on bi sudija Izrailju deset godina.
११आणि त्याच्यामागे जबुलूनी एलोन इस्राएलाचा न्यायाधीश झाला; त्याने तर दहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
12 Potom umrije Elon od Zavulona i bi pogreben u Ajalonu u zemlji Zavulonovoj.
१२नंतर तो जबुलूनी एलोन मेला, आणि त्यास जबुलून देशातल्या अयालोन येथे पुरण्यात आले.
13 Poslije njega bi sudija Izrailju Avdon sin Elilov Faratonjanin.
१३आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र अब्दोन जो पिराथोनी, तो इस्राएलाचा न्यायाधीश झाला.
14 On imaše èetrdeset sinova i trideset unuka, koji jahahu sedamdesetoro magaradi. I bi sudija Izrailju osam godina.
१४आणि त्यास चाळीस पुत्र व तीस नातू होते; त्यांच्याकडे आपापले गाढव होते ज्यावर जे सवार होत होते; त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
15 Potom umrije Avdon sin Elilov Faratonjanin, i bi pogreben u Faratonu u zemlji Jefremovoj na gori Amalièkoj.
१५मग पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला, आणि त्यास एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले.