< Jeremija 3 >

1 Govore: ako ko pusti ženu svoju, i ona otišavši od njega uda se za drugoga, hoæe li se onaj vratiti k njoj? Ne bi li se sasvijem oskvrnila ona zemlja? A ti si se kurvala s mnogim milosnicima; ali opet vrati se k meni, veli Gospod.
ते म्हणतात, एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला सोडले, तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली, तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्री ही भूमी आहे. तू वेश्येसारखी पुष्कळ सहयोगीं सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे? असे परमेश्वर म्हणतो.
2 Podigni oèi svoje k visinama, i pogledaj gdje se nijesi kurvala; na putovima si sjedjela èekajuæi ih kao Arapin u pustinji, i oskvrnila si zemlju kurvarstvom svojim i zloæom svojom.
डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या वेश्या व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस.
3 Zato se ustaviše daždi, i ne bi poznoga dažda; ali u tebe bješe èelo žene kurve, i ne htje se stidjeti.
म्हणून वसंत ऋतूतील पाऊस थांबवण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही. पण तरी तुझा चेहरा गर्विष्ठ आहे, जसा वारांगनेचा असतो तसा. तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस.
4 Hoæeš li otsele vikati k meni: oèe moj, ti si voð mladosti moje?
माझ्या बापा, मी तरूण असताना तुच माझा जवळचा मित्र आहेस. असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय.
5 Hoæe li se srditi jednako? hoæe li se gnjeviti dovijeka? Eto, govoriš, a èiniš zlo koliko god možeš.
“तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?” पाहा, “तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करीत आहेस.”
6 Još mi reèe Gospod za vremena cara Josije: jesi li vidio što uèini odmetnica, Izrailj? kako odlazi na svako visoko brdo i pod svako zeleno drvo, i kurva se ondje.
नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला.
7 I pošto uèini sve to, rekoh: vrati se k meni; ali se ne vrati; i to vidje nevjernica, sestra njezina, Juda.
मी म्हणालो, “ही दुष्कृत्ये करून झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.” पण ती माझ्याकडे परत आली नाही. तेव्हा इस्राएलने काय केले हे इस्राएलाच्या अविश्वासू बहीण, यहूदाने पाहिले.
8 I svidje mi se za sve to što uèini preljubu odmetnica Izrailj da je pustim i dam joj knjigu raspusnu; ali se ne poboja nevjernica sestra joj Juda, nego otide, te se i ona prokurva.
धर्मत्यागी इस्राएल! या सर्व कारणांमुळे तीने व्यभिचार का केला हे मला दिसून आले आहे. तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला सूटपत्र दिले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण यहूदा भयभीत झाली नाही आणि तिनेसुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारीणीप्रमाणे व्यवहार केला.
9 I sramotnijem kurvanjem svojim oskvrni zemlju, jer èinjaše preljubu s kamenom i s drvetom.
तिने तिचा राष्ट्र “भ्रष्ट” केला ह्याची तिला पर्वा नव्हती, म्हणून दगड आणि लाकूड यांपासून त्यांनी मूर्ती तयार केल्या.
10 I kod svega toga ne vrati se k meni nevjernica sestra joj Juda svijem srcem svojim, nego lažno, govori Gospod.
१०इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले. असे परमेश्वर म्हणतो
11 Zato mi reèe Gospod: odmetnica Izrailj opravda se više nego nevjernica Juda.
११तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “विश्वासहीन इस्राएल अविश्वासू यहूदापेक्षा अधिक नीतिमान ठरला आहे!
12 Idi i vièi ove rijeèi k sjeveru, i reci: vrati se, odmetnice Izrailju, veli Gospod, i neæu pustiti da padne gnjev moj na vas, jer sam milostiv, veli Gospod, neæu se gnjeviti dovijeka.
१२तू जाऊन ही वचने उत्तरेकडे घोषीत कर. परमेश्वर असे म्हणतो, हे विश्वासहीन इस्राएला, परत ये! परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्यावर नेहमीच संतापणार नाही, कारण मी विश्वासू आहे, मी सर्वकाळ क्रोध धरणार नाही.
13 Samo poznaj bezakonje svoje, da si se odmetnula Gospodu Bogu svojemu, ti si tumarala k tuðima pod svako drvo zeleno, i nijeste slušali glasa mojega, veli Gospod.
१३तुम्ही पाप केले आहे, तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरूद्ध गेलात. प्रत्येक हिरव्या झाडाखाली तू अन्य दैवतांसोबत आपले मार्ग वाटून घेतले, आणि माझा शब्द ऐकला नाही, असे परमेश्वर म्हणतो.
14 Obratite se, sinovi odmetnici, veli Gospod, jer sam ja muž vaš, i uzeæu vas, jednoga iz grada i dva iz porodice, i odvešæu vas u Sion.
१४अविश्वासू लोकहो, परत या. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे. मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हास सियोनला आणीन.
15 I daæu vam pastire po srcu svojemu, koji æe vas pasti znanjem i razumom.
१५माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील.
16 I kad se umnožite i narodite u zemlji, onda se, veli Gospod, neæe više govoriti: kovèeg zavjeta Gospodnjega; niti æe im dolaziti na um niti æe ga pominjati, niti æe hoditi k njemu, niti æe ga više opravljati.
१६आणि त्या दिवसात असे होईल की, तुम्ही देशात बहूतपट असे व्हाल आणि फळ द्याल. परमेश्वर असे म्हणतो, त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, परमेश्वराच्या कराराचा कोश, असे ते आणखी म्हणणार नाही. येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत. ते कोणी बनवणार पण नाही.
17 U to æe se vrijeme Jerusalim zvati prijesto Gospodnji, i svi æe se narodi sabrati u nj, k imenu Gospodnjemu u Jerusalimu, i neæe više iæi po misli srca svojega zloga.
१७त्या वेळेला यरूशलेम बद्दल अशी घोषणा करतील, हे परमेश्वराचे सिंहासन आहे आणि परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरूशलेममध्ये एकत्र येतील. या पुढे ते त्यांच्या दुराग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत.
18 U to æe vrijeme dom Judin iæi s domom Izrailjevijem, i doæi æe zajedno iz zemlje sjeverne u zemlju koju dadoh u našljedstvo ocima vašim.
१८त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
19 Ali ja rekoh: kako bih te postavio meðu sinove i dao ti zemlju željenu, krasno našljedstvo mnoštva naroda? I rekoh: ti æeš me zvati: oèe moj; i neæeš se odvratiti od mene.
१९मी म्हणालो, मी तुला लेकरांमध्ये कसे ठेवीन? आणि रमणीय देश, म्हणजे राष्ट्रांच्या सैन्याचे सुशोभित वतन, तुला कसे देईन? तेव्हा मी म्हटले तुम्ही मला माझ्या ‘पिता’ असे म्हणाल व मला अनुसरण्यापासून मागे फिरणार नाही.
20 Doista kao što žena iznevjeri druga svojega, tako iznevjeriste mene, dome Izrailjev, veli Gospod.
२०पण पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे तुम्ही आहात. इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे.” परमेश्वर असे म्हणतो.
21 Glas po visokim mjestima neka se èuje, plaè, molbe sinova Izrailjevijeh, jer prevratiše put svoj, zaboraviše Gospoda Boga svojega.
२१उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, इस्राएली लोक रडत आहेत. कारण त्यांनी आपले मार्ग बदलले आणि मला, त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.
22 Vratite se, sinovi odmetnici, i iscijeliæu odmete vaše. Evo, mi idemo k tebi, jer si ti Gospod Bog naš.
२२“विश्वासहीन लोकांनो, परत या, मी तुमचा विश्वासघातकीपणा बरा करीन. पाहा! आम्ही तुझ्याकडे येण्याचे कारण म्हणजे तू आमचा देव परमेश्वर आहेस!”
23 Doista, zaludu su humovi, mnoštvo gora; doista, u Gospodu je Bogu našem spasenje Izrailjevo.
२३टेकड्यांवरून आणि पर्वतांवरून फक्त खोटेपणा येतो, खचित इस्राएलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठायी आहे,
24 Jer ta sramota proždrije trud otaca naših od djetinjstva našega, ovce njihove i goveda njihova, sinove njihove i kæeri njihove.
२४तरीही लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्वकाही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली, मेंढ्या व गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली आहेत.
25 Ležimo u sramoti svojoj, i pokriva nas rug naš; jer Gospodu Bogu svojemu griješismo mi i oci naši od djetinjstva svojega do danas, i ne slušasmo glasa Gospoda Boga svojega.
२५आम्ही आपल्या लज्जेत पडू. आमची लाज आम्हांला झाको, कारण आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी, आपल्या तरुणपणापासून या दिवसापर्यंत परमेश्वरा आमचा देव याचा शब्द ऐकला नाही.

< Jeremija 3 >