< Isaija 8 >

1 I reèe mi Gospod: uzmi knjigu veliku i napiši u njoj pismom èovjeèijim: brz na plijen, hitar na grabež.
परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी पाटी घे आणि तिच्यावर महेर-शालाल-हाश-बज असे लिही.”
2 I uzeh vjerne svjedoke, Uriju sveštenika i Zahariju sina Jeverehijina.
माझ्याकरिता साक्षीसाठी उरीया याजक व यबरेखाचा मुलगा जखऱ्या या विश्वासू साक्षीदारास मी बोलावून घेईन.
3 Potom pristupih k proroèici, i ona zatrudnje i rodi sina. A Gospod mi reèe: nadjeni mu ime: brz na plijen, hitar na grabež.
मी एका संदेष्ट्रीकडे गेलो. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला मग परमेश्वर मला म्हणाला, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव.
4 Jer prije nego dijete nauèi vikati: oèe moj i majko moja, odnijeæe se blago Damaštansko i plijen Samarijski pred carem Asirskim.
कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.”
5 I još mi reèe Gospod govoreæi:
परमेश्वर माझ्याशी पुन्हा बोलला,
6 Što ovaj narod ne mari za vodu Siloamsku koja teèe tiho, i raduje se Resinu i sinu Remalijinu,
“हे लोक शिलोहाचे संथ पाणी नापसंत करतात, आणि रसीन व रमाल्याचा मुलगा यांच्या सोबत आनंदी होतात.
7 Zato, evo, Gospod æe navesti na njih vodu iz rijeke silnu i veliku, cara Asirskoga i svu slavu njegovu, te æe izaæi iz svijeh potoka svojih, i teæi æe povrh svijeh bregova svojih,
म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तीशाली लोंढा, म्हणजेच अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील. तो आपले सर्व पाट व कडा भरुन वाहील.
8 I navaliæe preko Jude, plaviæe i razlivaæe se i doæi do grla, i krila æe joj se raširiti preko svekolike zemlje tvoje, Emanuilo!
आणि तो पुढे वाहत यहूदात शिरेल व त्यास बुडवेल, पुराचे पाणी वाढत व पसरत तुमच्या गळ्याला लागेपर्यंत येईल. हे इम्मानुएला, त्याचे पसरलेले पंख तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”
9 Združujte se, narodi, ali æete se potrti; èujte svi koji ste u daljnoj zemlji: oružajte se, ali æete se potrti; oružajte se, ali æete se potrti.
अहो लोकांनो युध्द करा, पण तुमचा चुराडा होईल. दूरच्या सर्व देशांनो ऐका; युद्धासाठी सशस्त्र व्हा पण तुमचा चुराडा होईल; स्वतःला सुसज्ज करा पण तुमचा चुराडा होईल.
10 Dogovarajte se, dogovor æe vam se razbiti: recite rijeè, neæe biti od nje ništa, jer je s nama Bog.
१०योजना करा, पण ती व्यर्थ करण्यात येईल; हुकूम करा, पण तो अमलांत येणार नाही, कारण देव आम्हाबरोबर आहे.
11 Jer mi ovako reèe Gospod uhvativši me za ruku i opomenuvši me da ne idem putem ovoga naroda, govoreæi:
११परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरुन असे बजावून सांगितले होते की या लोकांच्या मार्गाने जाऊ नको, तो म्हणाला,
12 Ne govorite buna, kad god ovaj narod kaže buna, i ne bojte se èega se on boji, i ne plašite se.
१२“हे लोक कोणत्याही गोष्टीला कारस्थान म्हणतात त्यास कारस्थान म्हणू नका, ते ज्याला भितात त्यास तुम्ही भिऊ नका आणि घाबरु नका.
13 Gospoda nad vojskama svetite; i on neka vam je strah i bojazan.
१३सेनाधीश परमेश्वर, त्यास पवित्र घोषित करून तुम्ही त्याचा सन्मान करा, तुम्ही त्याचे भय धरा आणि तोच एक असा पवित्र आहे, की तुम्हास त्याचा धाक वाटावा.
14 I biæe vam svetinja, a kamen za spoticanje i stijena za sablazan objema domovima Izrailjevijem, zamka i mreža stanovnicima Jerusalimskim.
१४तो एक पवित्रस्थान होईल; परंतु इस्राएलाच्या दोन्ही घराण्याला तो ठेच लागणारा धोंडा व अडखण्याचा खडक आणि यरूशलेमेतील रहिवाश्यास पाश व सापळा असा होईल.
15 I spotaknuæe se mnogi i pašæe i satræe se, zaplešæe se i uhvatiæe se.
१५पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.”
16 Sveži svjedoèanstvo, zapeèati zakon mojim uèenicima.
१६माझी साक्ष पक्की बांध, नोंद अधिकृतपणे शिक्कामोर्तब करून माझ्या शिष्यांना दे.
17 Èekaæu dakle Gospoda, koji je sakrio lice svoje od doma Jakovljeva, i uzdaæu se u nj.
१७मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन, जो याकोबाच्या घराण्यापासून आपले तोंड लपवितो; मी त्याची प्रतीक्षा करीन.
18 Evo ja i djeca koju mi je dao Gospod jesmo znak i èudo Izrailju od Gospoda nad vojskama, koji nastava na gori Sionu.
१८पाहा, मी व मुले जी परमेश्वराने मला दिली ती इस्राएलास चिन्हे व चमत्कारांसाठी जो सैन्याधीश परमेश्वर सीयोन पर्वतावर वसतो त्याने ठेवली आहेत.
19 I ako vam reku: pitajte vraèe i gatare, koji šapæu i mrmljaju; recite: ne treba li narod da pita Boga svojega? ili æe pitati mrtve mjesto živijeh?
१९ते तुम्हास म्हणतील, “भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या” जे काहीतरी बरळतात व मंत्र पुटपुटतात. परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय?
20 Zakon i svjedoèanstvo tražite. Ako li ko ne govori tako, njemu nema zore.
२०म्हणून तुम्ही नियमशास्त्र व विधी याकडे लक्ष दिले पाहीजे! ते अशा गोष्टी बोलत नाहीत कारण त्यांना प्रभात प्रकाश नाही.
21 I hodiæe po zemlji potucajuæi se i gladujuæi; i kad bude gladan, ljutiæe se i psovati cara svojega i Boga svojega gore.
२१ते अतिशय त्रस्त व भुकेले असे देशातून जातील. जेव्हा ते भुकेले होतील तेव्हा संतापून आणि त्यांच्या राजाला व देवाला आपली तोंडेवर करून शाप देतील.
22 A kad pogleda na zemlju, a to nevolja i mrak i teška muka, i on zagnan u tamu.
२२ते पृथ्वीकडे दृष्टी टाकतील आणि पाहा विपत्ती अंधकार व दु: खाचे निराशेचे काहूर त्यांना दिसेल. ते अंधकाराच्या भूमीत लोटले जातील.

< Isaija 8 >