< Isaija 18 >
1 Teško zemlji koja sjen èini krilima s one strane rijeka Etiopskih;
१कूशातील नद्यांच्या पलीकडील सळसळणाऱ्या पंखाच्या देशा हायहाय;
2 Koja šalje poslanike preko mora, u laðama od site po vodama, govoreæi: idite, brzi glasnici, k narodu rasijanu i oplijenjenu, k narodu strašnu otkako je dosad, k narodu razmjerenu i pogaženu, kojemu zemlju raznose rijeke.
२जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे, जे लोक भीतीपासून दूर व जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा,
3 Svi koji živite na svijetu i stanujete na zemlji, kad se digne zastava na gorama, gledajte, i kad zatrubi truba, slušajte.
३अहो जगातल्या सर्व रहिवाश्यांनो आणि जे कोणी पृथ्वीवर राहणाऱ्यांनो, जेव्हा पर्वतावरून निशाण उंचविण्यात येईल तेव्हा पाहा; आणि जेव्हा कर्णा फुंकण्यात येईल तेव्हा ऐका.
4 Jer ovako mi reèe Gospod: umiriæu se i gledaæu iz stana svojega, kao vruæina koja suši poslije dažda i kao rosan oblak o vruæini žetvenoj.
४परमेश्वराने मला हे सांगितले आहे की, जसे सूर्याच्या प्रकाशात उकळणारी उष्णता असते अथवा जसे कापणीच्या उन्हात दहिवरयुक्त अभ्र येते, तसे मी आपल्या निवासस्थानातून शांतपणे निरीक्षण करीन.
5 Jer prije berbe, kad napupe pupci i od cvijeta postane grozd i stane zreti, okresaæe odvode kosijerom, i uzeæe lozu i otsjeæi.
५कापणीच्यापूर्वी, जेव्हा बहार संपल्यावर फुले द्राक्षात पिकू लागतात, तेव्हा तो कोयत्याने डहाळ्या कापील व खाली काढून टाकेल आणि पसरलेल्या फांद्या काढून टाकेल.
6 Sve æe se ostaviti pticama gorskim i zvijerima zemaljskim; i ptice æe ljetovati na njima, a svakojake zvijeri zemaljske zimovaæe.
६पर्वतावरील पक्ष्यांसाठी आणि पृथ्वीवरील जनावरांसाठी त्या एकत्र टाकून ठेवल्या जातील. उन्हाळ्यात पक्षी त्यामध्ये राहतील आणि थंडीत पृथ्वीवरील जनावरे त्यावर हिवाळा घालवतील.”
7 Tada æe se donijeti dar Gospodu nad vojskama od naroda rasijanoga i oplijenjenoga, od naroda strašnoga otkako je dosad, od naroda razmjerenoga i pogaženoga, kojemu zemlju raznose rijeke, k mjestu imena Gospoda nad vojskama, ka gori Sionskoj.
७त्या वेळेला, उंच आणि मनमिळावू लोक, भीतीपासून दूर व जवळ असे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे ते, सेनाधीश परमेश्वराचे नाव दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश पमेश्वराला स्वतःचा नजराणा म्हणून अर्पण करण्यास येतील.