< Postanak 29 >
1 Tada se podiže Jakov i otide u zemlju istoènu.
१नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालू ठेवला आणि तो पूर्वेकडील लोकांच्या देशात आला.
2 I obziruæi se ugleda studenac u polju; i gle, tri stada ovaca ležahu kod njega, jer se na onom studencu pojahu stada, a veliki kamen bijaše studencu na vratima.
२त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता.
3 Ondje se skupljahu sva stada, te pastiri odvaljivahu kamen s vrata studencu i pojahu stada, i poslije opet privaljivahu kamen na vrata studencu na njegovo mjesto.
३जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला काढीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवत.
4 I Jakov im reèe: braæo, odakle ste? Rekoše: iz Harana smo.
४याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?” ते म्हणाले, “आम्ही हारान प्रदेशाहून आलो आहोत.”
5 A on im reèe: poznajete li Lavana sina Nahorova? Oni rekoše: poznajemo.
५मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्यास ओळखतो.”
6 On im reèe: je li zdrav? Rekoše: jest, i evo Rahilje kæeri njegove, gdje ide sa stadom.
६याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “तो बरा आहे आणि ती पाहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”
7 I on reèe: eto još je rano, niti je vrijeme vraæati stoku; napojte stoku pa idite i pasite je.
७याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि तसेच कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झाली नाही. तेव्हा मेंढरांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत जाऊ द्या.”
8 A oni rekoše: ne možemo, dokle se ne skupe sva stada, da odvalimo kamen s vrata studencu, onda æemo napojiti stoku.
८परंतु ते म्हणाले, “आम्हांला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”
9 Dok on još govoraše s njima, doðe Rahilja sa stadom oca svojega, jer ona pasijaše ovce.
९याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली. कारण तीच त्यांना राखीत होती.
10 A kad Jakov vidje Rahilju kæer Lavana ujaka svojega, i stado Lavana ujaka svojega, pristupi Jakov i odvali kamen studencu s vrata, i napoji stado Lavana ujaka svojega.
१०जेव्हा याकोबाने आपल्या आईचा भाऊ लाबान याची मुलगी राहेल हिला व आपल्या आईच्या भावाच्या मेंढरांना पाहिले तेव्हा याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून दगड लोटला व आपल्या आईचा भाऊ लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले.
11 I poljubi Jakov Rahilju, i povikavši zaplaka se.
११याकोबाने राहेलीचे चुंबन घेतले आणि मोठ्याने रडला.
12 I kaza se Jakov Rahilji da je rod ocu njezinu i da je sin Reveèin; a ona otrèa te javi ocu svojemu.
१२याकोबाने राहेलला सांगितले की, तो तिच्या वडिलाच्या नात्यातील आहे, म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले.
13 A kad Lavan èu za Jakova sina sestre svoje, istrèa mu na susret, i zagrli ga i poljubi, i uvede u svoju kuæu. I on pripovjedi Lavanu sve ovo.
१३जेव्हा आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याची बातमी लाबानाने ऐकली, तेव्हा लाबान धावत जाऊन त्यास भेटला. त्यास मिठी मारली, त्याची चुंबने घेतली आणि त्यास आपल्या घरी घेऊन आला. मग याकोबाने सर्व गोष्टी लाबानाला सांगितल्या.
14 A Lavan mu reèe: ta ti si kost moja i tijelo moje. I osta kod njega cio mjesec dana.
१४मग लाबान त्यास म्हणाला, “खरोखर तू माझे हाड व माझे मांस आहेस.” त्यानंतर याकोब एक महिनाभर त्याच्यापाशी राहिला.
15 Tada reèe Lavan Jakovu: zar badava da mi služiš, što si mi rod? Kaži mi šta æe ti biti plata?
१५लाबान याकोबाला म्हणाला, “तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग?”
16 A Lavan imaše dvije kæeri: starijoj bješe ime Lija, a mlaðoj Rahilja.
१६लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल.
17 I u Lije bjehu kvarne oèi, a Rahilja bješe lijepa stasa i lijepa lica.
१७लेआचे डोळे अधू होते, परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती.
18 I Jakovu omilje Rahilja, te reèe: služiæu ti sedam godina za Rahilju, mlaðu kæer tvoju.
१८याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”
19 A Lavan mu reèe: bolje tebi da je dam nego drugom; ostani kod mene.
१९लाबान म्हणाला, “परक्या मनुष्यास देण्यापेक्षा, ती मी तुला द्यावी हे बरे आहे. माझ्यापाशी राहा.”
20 I otsluži Jakov za Rahilju sedam godina, i uèiniše mu se kao nekoliko dana, jer je ljubljaše.
२०म्हणून याकोबाने सात वर्षे राहेलसाठी सेवाचाकरी केली; आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्यास फार थोड्या दिवसांसारखी वाटली.
21 I reèe Jakov Lavanu: daj mi ženu, jer mi se navrši vrijeme, da legnem s njom.
२१नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी पत्नी मला द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन.”
22 I sazva Lavan sve ljude iz onoga mjesta i uèini gozbu.
२२तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांस एकत्र केले आणि मेजवानी दिली.
23 A uveèe uze Liju kæer svoju i uvede je k Jakovu, i on leže s njom.
२३त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला
24 I Lavan dade Zelfu robinju svoju Liji kæeri svojoj da joj bude robinja.
२४लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.
25 A kad bi ujutru, gle, ono bješe Lija; te reèe Jakov Lavanu: šta si mi to uèinio? ne služim li za Rahilju kod tebe? zašto si me prevario?
२५सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?”
26 A Lavan mu reèe: ne biva u našem mjestu da se uda mlaða prije starije.
२६लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरीवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही.
27 Navrši nedjelju dana s tom, pa æemo ti dati i drugu za službu što æeš služiti kod mene još sedam godina drugih.
२७या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.”
28 Jakov uèini tako, i navrši s njom nedjelju dana, pa mu dade Lavan Rahilju kæer svoju za ženu.
२८त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली;
29 I dade Lavan Rahilji kæeri svojoj robinju svoju Valu da joj bude robinja.
२९लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली.
30 I tako leže Jakov s Rahiljom; i voljaše Rahilju nego Liju, i stade služiti kod Lavana još sedam drugih godina.
३०तेव्हा मग याकोबाने राहेलीशीही लग्न केले; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवाचाकरी केली.
31 A Gospod videæi da Jakov ne mari za Liju, otvori njojzi matericu, a Rahilja osta nerotkinja.
३१परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निःसंतान होती.
32 I Lija zatrudnje, i rodi sina, i nadjede mu ime Ruvim, govoreæi: Gospod pogleda na jade moje, sada æe me ljubiti muž moj.
३२लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे; कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”
33 I opet zatrudnje, i rodi sina, i reèe: Gospod èu da sam prezrena, pa mi dade i ovoga. I nadjede mu ime Simeun.
३३लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे, म्हणून त्याने मला हा सुद्धा मुलगा दिला आहे,” आणि या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले.
34 I opet zatrudnje, i rodi sina, i reèe: da ako se sada veæ priljubi k meni muž moj, kad mu rodih tri sina. Zato mu nadješe ime Levije.
३४लेआ पुन्हा गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मात्र माझा पती माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन पुत्र दिले आहेत.” त्यामुळे तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले.
35 I zatrudnje opet, i rodi sina, i reèe: sada æu hvaliti Gospoda. Zato mu nadjede ime Juda; i presta raðati.
३५त्यानंतर लेआ पुन्हा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुती करीन.” त्यामुळे तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; नंतर तिला मुल होण्याचे थांबले.