< Izlazak 2 >
1 A neko od plemena Levijeva otide i oženi se kæerju Levijevom.
१लेवी वंशातील एका मनुष्याने जाऊन लेवीच्या एका मुलीशी विवाह केला.
2 I ona zatrudnje i rodi sina; i videæi ga lijepa krijaše ga tri mjeseca.
२ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला; तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्यास तीन महिने लपवून ठेवले.
3 A kad ga ne može više kriti, uze kovèežiæ od site, i obli ga smolom i paklinom, i metnu dijete u nj, i odnese ga u trsku kraj rijeke.
३पुढे आणखी तिला तो लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लव्हाळ्याची पेटी तयार केली; तिला राळ व डांबर लावले. तिने त्या बाळाला पेटीत ठेवून ती पेटी नदीच्या तीरी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.
4 A sestra njegova stade podalje da vidi šta æe biti od njega.
४त्याची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली.
5 A kæi Faraonova doðe da se kupa u rijeci, i djevojke njezine hodahu kraj rijeke; i ona ugleda kovèežiæ u trsci, i posla dvorkinju svoju te ga izvadi.
५त्या वेळी फारोची मुलगी आंघोळ करण्यासाठी नदीवर आली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. तिने लव्हाळ्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांगितले.
6 A kad otvori, vidje dijete, i gle, dijete plakaše; i sažali joj se, i reèe: to je Jevrejsko dijete.
६तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले. ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला, ती म्हणाली, “खात्रीने हे इब्र्याच्या मुलांपैकी आहे.”
7 Tada reèe sestra njegova kæeri Faraonovoj: hoæeš li da idem da ti dozovem dojkinju Jevrejku, da ti doji dijete?
७मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?”
8 A kæi Faraonova reèe joj: idi. I otide djevojèica, i dozva mater djetinju.
८फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
9 I kæi Faraonova reèe joj: uzmi ovo dijete, i odoj mi ga, a ja æu ti platiti. I uze žena dijete i odoji ga.
९फारोच्या मुलीने त्या बाळाच्या आईला म्हटले, “या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्यास दूध पाज; त्याबद्दल मी तुला वेतन देईन.” तेव्हा ती स्त्री बाळाला घेऊन त्यास दूध पाजू लागली.
10 A kad dijete odraste, odvede ga ka kæeri Faraonovoj, a ona ga posini; i nadjede mu ime Mojsije govoreæi: jer ga iz vode izvadih.
१०ते मूल वाढून मोठे झाले. तेव्हा तिने त्यास फारोच्या मुलीकडे आणले; आणि तो तिचा मुलगा झाला; तिने त्याचे नाव मोशे ठेवले, ती म्हणाली, “कारण मी त्यास पाण्यातून बाहेर काढले.”
11 I kad Mojsije bijaše velik, izide k braæi svojoj, i gledaše nevolju njihovu. I vidje gdje nekakav Misirac bije èovjeka Jevrejina izmeðu braæe njegove.
११काही दिवसानी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर आपल्या लोकांकडे गेला आणि त्याने त्यांची कष्टाची कामे पहिली. कोणी एक मिसरी आपल्या इब्री मनुष्यास मारत असताना त्याने पाहिले.
12 I obazrev se i tamo i amo, kad vidje da nema nikoga, ubi Misirca, i zakopa ga u pijesak.
१२तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसराच्या मनुष्यास जिवे मारले व वाळूत पुरून टाकले.
13 I sjutradan izide opet, a to se dva Jevrejina svaðahu, i reèe onomu koji èinjaše krivo: zašto biješ bližnjega svojega?
१३दुसऱ्या दिवशी तो बाहेर गेला, तेव्हा पाहा दोन इब्री माणसे मारामारी करत होती. त्यांच्यामध्ये जो दोषी होता त्यास तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?”
14 A on reèe: ko je tebe postavio knezom i sudijom nad nama? hoæeš li da me ubiješ kao što si ubio Misirca? Tada se Mojsije uplaši i reèe: zaista se doznalo.
१४पण त्या मनुष्याने उत्तर दिले, “तुला आम्हांवर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिसऱ्यास जिवे मारलेस, तसे मला मारायला पाहतोस का?” तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत: शीच म्हणाला, “मी काय केले ते आता खचीत सर्वांना माहीत झाले आहे.”
15 I Faraon èuv za to tražaše da pogubi Mojsija. Ali Mojsije pobježe od Faraona i doðe u zemlju Madijamsku, i sjede kod jednoga studenca.
१५आणि फारोने याविषयी ऐकले तेव्हा त्याने मोशेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला.
16 A sveštenik Madijamski imaše sedam kæeri, i one doðoše i stadoše zahvatati vodu i naljevati u pojila da napoje stado oca svojega.
१६मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; आपल्या वडिलाच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या;
17 A doðoše pastiri, i otjeraše ih; a Mojsije usta i odbrani ih, i napoji im stado.
१७परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपाला पाणी पाजले.
18 I one se vratiše k ocu svojemu Raguilu; a on reèe: što se danas tako brzo vratiste?
१८मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज इतक्या लवकर घरी कशा आला आहात?”
19 A one rekoše: jedan Misirac odbrani nas od pastira, i nali nam i napoji stado.
१९त्या म्हणाल्या, “एका मिसरी मनुष्याने आम्हांला मेंढपाळाच्या हातून सोडवले. त्याने आम्हांसाठी पाणी देखील काढून कळपाला पाजले.”
20 A on reèe kæerima svojim: pa gdje je? zašto ostaviste toga èovjeka? zovite ga da jede.
२०तेव्हा तो आपल्या मुलींना म्हणाला, “तो कोठे आहे? तुम्ही त्या मनुष्यास का सोडले? त्यास बोलावून आणा म्हणजे तो आपल्याबरोबर भोजन करेल.”
21 I Mojsije se skloni da živi kod onoga èovjeka, i on dade Mojsiju kæer svoju Seforu.
२१त्या मनुष्यापाशी राहायला मोशे कबूल झाला. त्याने आपली मुलगी सिप्पोरा हिचा विवाह देखील त्याच्याशी करून दिला.
22 I ona rodi sina, i on mu nadjede ime Girsam, jer sam, reèe, došljak u zemlji tuðoj.
२२तिला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नाव गेर्षोम ठेवले, तो म्हणाला, “मी परदेशात वस्ती करून आहे.”
23 A poslije mnogo vremena umrije car Misirski; i uzdisahu od nevolje sinovi Izrailjevi i vikahu; i vika njihova radi nevolje doðe do Boga.
२३बऱ्याच काळानंतर मिसराचा राजा मरण पावला. तेव्हा इस्राएलांनी दास्यामुळे कण्हून आक्रोश केला. त्यांनी मदतीकरता हाका मारल्या व दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत देवापर्यंत वर जाऊन पोहचला;
24 I Bog èu uzdisanje njihovo, i opomenu se Bog zavjeta svojega s Avramom, s Isakom i s Jakovom.
२४देवाने त्यांचे कण्हणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्यास आठवण झाली.
25 I pogleda Bog na sinove Izrailjeve, i vidje ih.
२५देवाने इस्राएली लोकांस पाहिले आणि त्यास त्यांची परिस्थिती समजली.