< 2 Samuelova 1 >
1 A po smrti Saulovoj, kad se David vrati pobivši Amalike i osta u Siklagu dva dana,
१शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग नगरात येऊन दोन दिवस राहिल्यानंतर,
2 Treæega dana, gle, doðe jedan iz vojske Saulove razdrtijeh haljina i glave posute prahom; i došav k Davidu pade na zemlju i pokloni se.
२तिसऱ्या दिवशी, तेथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतील होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. त्याने सरळ दावीदाजवळ येऊन लोटांगण घातले.
3 I reèe mu David: otkuda ideš? A on mu reèe: iz okola Izrailjskoga utekoh.
३दावीदाने त्यास विचारले, “तू कोठून आलास?” आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले.
4 A David mu reèe: šta bi? kaži mi. A on reèe: narod pobježe iz boja; i mnogo naroda pade i izgibe, pogibe i Saul i sin mu Jonatan.
४तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे. तो म्हणाला, लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात मरण पावले व शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.”
5 A David reèe momku koji mu donese glas: kako znaš da je poginuo Saul i sin mu Jonatan?
५दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?”
6 A momak koji mu donese glas reèe: sluèajno doðoh na goru Gelvuju, a to se Saul naslonio na koplje svoje, kola i konjici približavahu se k njemu.
६यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.
7 A on obazrevši se natrag ugleda me, pa me viknu, a ja mu rekoh: evo me.
७शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्यास मी दिसलो त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो.
8 A on mi reèe: ko si? A ja mu rekoh: Amalik sam.
८त्याने माझी चौकशी केली मी अमालेकी असल्याचे त्यास सांगितले.
9 A on mi reèe: pristupi k meni i ubij me; jer me obuzeše muke, a još je sasvijem duša u meni.
९तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.’
10 I pristupih k njemu i ubih ga, jer sam znao da neæe ostati živ pošto pade; i uzeh vijenac carski koji mu bješe na glavi i grivnu koja mu bješe na ruci, i evo donesoh gospodaru svojemu.
१०त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.”
11 Tada David zgrabi haljine na sebi i razdrije ih; tako i svi ljudi koji bijahu s njim.
११हे ऐकून दावीदाला इतके दुःख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याच्या सारखेच केले.
12 I ridaše i plakaše, i postiše do veèera za Saulom i za Jonatanom sinom njegovijem i za narodom Gospodnjim i za domom Izrailjevijem što izgiboše od maèa.
१२दुःखाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळपर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक युद्धात मृत्युमुखी पडले याबद्दल त्यांनी शोक केला.
13 I reèe David momku koji mu donese glas: odakle si? A on reèe: ja sam sin jednoga došljaka Amalika.
१३शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दावीदाने विचारले, “तू कुठला?” यावर तो म्हणाला, “मी अमालेकी असून एका परदेशी मनुष्याचा मुलगा आहे.”
14 Reèe mu David: kako te nije bilo strah podiæi ruku svoju i ubiti pomazanika Gospodnjega?
१४दावीदाने त्यास विचारले, “परमेश्वराने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?”
15 I dozva David jednoga izmeðu momaka svojih i reèe: hodi, pogubi ga. A on ga udari, te umrije.
१५मग दावीदाने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून त्या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.
16 I reèe mu David: krv tvoja na tvoju glavu; jer tvoja usta svjedoèiše na te govoreæi: ja sam ubio pomazanika Gospodnjega.
१६दावीद त्यास म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस तू अपराधी आहेस. याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.”
17 Tada David narica ovako za Saulom i za Jonatanom sinom njegovijem,
१७शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक विलापगीत म्हटले.
18 I izgovori, da bi se uèili sinovi Judini luku, i eto je napisano u knjizi istinitoga:
१८त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.
19 Diko Izrailjeva! na tvojim visinama pobijeni su; kako padoše junaci?
१९“हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले. पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले!
20 Ne kazujte u Gatu, i ne razglašujte po ulicama Askalonskim, da se ne vesele kæeri Filistejske i da ne igraju kæeri neobrezanijeh.
२०ही बातमी गथमध्ये सांगू नका. अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करू नका. नाही तर, पलिष्ट्यांच्या त्या कन्या आनंदीत होतील. नाहीतर बेसुंत्याच्या त्या मुलींना आनंद होईल.
21 Gore Gelvujske! ne padala rosa ni dažd na vas, i ne rodilo polje za prinos, jer je tu baèen štit s junaka, štit Saulov, kao da nije pomazan uljem.
२१गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली.
22 Bez krvi pobijenijeh i bez masti od junaka nije se vraæao luk Jonatanov, niti je maè Saulov dolazio natrag prazan.
२२योनाथानाच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले. शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांस वधिले, बलाढ्यांची हत्या केली.
23 Saul i Jonatan, mili i dragi za života, ni na smrti se ne rastaviše; lakši od orlova bijahu.
२३शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
24 Kæeri Izrailjeve! plaèite za Saulom, koji vas je oblaèio u skerlet lijepo, i kitio vas zlatnijem zakladima po haljinama vašim.
२४इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हास दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
25 Kako padoše junaci u boju! Jonatan kako pogibe na tvojim visinama!
२५युध्दात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानाला मरण आले.
26 Žao mi je za tobom, brate Jonatane; bio si mi mio vrlo; veæa mi je bila ljubav tvoja od ljubavi ženske.
२६बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते.
27 Kako padoše junaci, i propade oružje ubojito!
२७या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले त्यांची शस्त्रे नष्ट झाली.”