< 1 Dnevnika 28 >

1 I David sabra u Jerusalim sve poglavare Izrailjeve, poglavare plemenske i poglavare od redova koji služahu caru, i tisuænike i stotinike, i koji bijahu nad svijem blagom i stokom carevom, i sinove svoje i dvorane i junake i sve ljude hrabre,
दावीदाने इस्राएलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूर वीर आणि लढवय्ये यांना यरूशलेमेत एकत्र बोलावले.
2 I ustavši car David na noge reèe: èujte me, braæo moja i narode moj! ja bijah naumio da sazidam dom gdje bi poèivao kovèeg Gospodnji i da bude podnožje nogama Boga našega, i pripravih što treba za zidanje.
नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.
3 Ali mi Bog reèe: neæeš sazidati doma imenu mojemu, jer si ratnik i krv si proljevao.
पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.’
4 Ali Gospod Bog Izrailjev izabra me iz svega doma oca mojega da budem car nad Izrailjem dovijeka; jer Judu izabra za voða, i iz doma Judina dom oca mojega; i izmeðu sinova oca mojega bi mu volja da mene postavi carem nad svijem Izrailjem.
इस्राएलाचा देव परमेश्वर याने मला सर्वकाळ इस्राएलाचा राजा होण्यासाठी माझ्या वडिलाच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे. कारण त्याने यहूदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली.
5 A tako izmeðu svijeh sinova mojih jer mnogo sinova dade mi Gospod) izabra Solomuna sina mojega da sjedi na prijestolu carstva Gospodnjega nad Izrailjem.
देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्राएलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे.
6 I reèe mi: Solomun sin tvoj sazidaæe moj dom i trijemove moje; jer njega izabrah sebi za sina, i ja æu mu biti otac.
त्याने मला म्हटले तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील. कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.
7 I utvrdiæu carstvo njegovo dovijeka, ako bude postojan da izvršuje zapovijesti moje i zakone moje kao danas.
माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.
8 Sada dakle pred svijem Izrailjem, zborom Gospodnjim, i da èuje Bog naš, kažem vam: držite i tražite sve zapovijesti Gospoda Boga svojega, da biste držali ovu dobru zemlju i ostavili je u našljedstvo sinovima svojim nakon sebe dovijeka.
तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्वकाळचे वतन म्हणून द्यावा.
9 A ti, Solomune sine, znaj Boga oca svojega, i služi mu cijelim srcem i dušom dragovoljnom; jer sva srca ispituje Gospod i svaku pomisao zna; ako ga ustražiš, naæi æeš ga; ako li ga ostaviš, odbaciæe te zasvagda.
हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत: करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील.
10 Vidi sada da te je Gospod izabrao da sazidaš dom za svetinju; budi hrabar i radi.
१०परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.”
11 Tada predade David Solomunu sinu svojemu sliku od trijema i od kuæa njegovijeh, i od riznica i od soba i od klijeti unutrašnjih, i od mjesta za zaklopac oèišæenja,
११दावीदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला.
12 I sliku od svega što bješe smislio za trijemove doma Gospodnjega i za sve klijeti unaokolo i za riznicu doma Božijega i za riznicu od svetijeh stvari,
१२त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा.
13 I za redove sveštenièke i Levitske i za svaki posao u službi u domu Gospodnjem i za sve posuðe u domu Gospodnjem;
१३याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली.
14 Zlato pod mjeru za sudove zlatne za svaku službu, i srebro za sve sudove srebrne pod mjeru, za sve sudove za svaku službu;
१४सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले.
15 Pod mjeru za svijetnjake zlatne i žiške zlatne, po težini svakoga svijetnjaka i žižaka njegovijeh, i za svijetnjake srebrne po težini svakoga svijetnjaka i žižaka njegovijeh, prema potrebi svakoga svijetnjaka;
१५सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले.
16 I zlata pod mjeru za stolove na kojima æe stajati hljebovi postavljeni, za svaki sto; i srebra za stolove srebrne;
१६आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले.
17 I za viljuške i za kotliæe i za zdjele zlata èistoga, i za zlatne èaše pod mjeru, za svaku èašu, i za srebrne èaše srebra pod mjeru za svaku;
१७शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुप्याच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले.
18 I za oltar kadioni èistoga zlata pod mjeru; i sliku od kola zlatnijeh heruvima, koji æe raširivši krila zaklanjati kovèeg zavjeta Gospodnjega.
१८धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करुब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले.
19 To mi je sve došlo pisano rukom Gospodnjom da bih znao sve kako što treba uraditi.
१९दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.”
20 I tako reèe David Solomunu sinu svojemu: budi slobodan i hrabar, i radi, ne boj se i ne plaši se, jer æe Gospod Bog, Bog moj, biti s tobom, neæe te ostaviti niti æe otstupiti od tebe, dokle ne svršiš sav posao za službu u domu Gospodnjem.
२०दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.
21 A evo redovi sveštenièki i Levitski za svaku službu u domu Božijem; i imaš uza se za svaki posao ljudi dragovoljnijeh i vještijeh svakom poslu, i poglavare i sav narod za svaku zapovijest svoju.
२१देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामांत कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागिर कामात मदत करण्यास तुझ्याबरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील.”

< 1 Dnevnika 28 >