< 1 Dnevnika 11 >
1 I sabraše se svi Izrailjci k Davidu u Hevron, i rekoše: evo, mi smo kost tvoja i tijelo tvoje.
१मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले व ते त्यास म्हणाले, “पहा, आम्ही तुझ्याच मांसाचे व हाडाचे आहोत.
2 I preðe dok Saul bijaše car ti si odvodio i dovodio Izrailja; i Gospod Bog tvoj rekao ti je: ti æeš pasti narod moj Izrailja; i ti æeš biti voð narodu mojemu Izrailju.
२मागील दिवसात, शौल जेव्हा आमच्यावर राजा होता, तेव्हा लढाईत तू इस्राएलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, ‘तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करशील.”
3 Tako doðoše sve starješine Izrailjeve k caru u Hevron, i uèini s njima David vjeru u Hevronu pred Gospodom, i pomazaše Davida za cara nad Izrailjem kao što bješe rekao Gospod preko Samuila.
३असे इस्राएल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दावीदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दावीदाला इस्राएलावर राजा होण्यास अभिषेक केला. याप्रकारे शमुवेलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले.
4 Potom otide David sa svijem Izrailjem na Jerusalim, a to je Jevus, jer ondje bijahu Jevuseji, koji življahu u onoj zemlji.
४दावीद व सर्व इस्राएल लोक यरूशलेम म्हणजे यबूस याठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत होते.
5 I rekoše Jevušani Davidu: neæeš uæi ovamo. Ali David uze kulu Sion, to je grad Davidov.
५यबूसचा रहिवासी दावीदाला म्हणाला, “तू येथे येणार नाहीस.” पण तरीही दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. हेच दावीदाचे नगर आहे.
6 Jer David reèe: ko prvi nadbije Jevuseje, biæe knez i vojvoda. I Joav sin Serujin izide prvi, i posta knez.
६दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसी लोकांवर प्रथम हल्ला करील तोच माझा सेनापती होईल.” सरुवेचा पुत्र यवाब याने प्रथम हल्ला केला म्हणून त्यास सेनापती करण्यात आले.
7 Poslije sjeðaše David u tom gradu, zato ga prozvaše grad Davidov.
७मग दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दावीद नगर पडले.
8 I sazida grad unaokolo, od Milona unaokolo; a Joav opravi ostatak grada.
८त्याने त्या नगराला चोहीकडून म्हणजे मिल्लोपासून ते सभोवार मजबूत कोट बांधला. नगराचा राहिलेला भाग यवाबाने मजबूत केला.
9 I David jednako napredovaše i siljaše se, jer Gospod nad vojskama bješe s njim.
९दावीद अधिकाधिक महान होत गेला कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर होता.
10 A ovo su poglavice meðu junacima Davidovijem, koji junaèki radiše uza nj za carstvo njegovo sa svijem Izrailjem da bude car nad Izrailjem po rijeèi Gospodnjoj;
१०हे दावीदाजवळच्या पुढाऱ्यांतील होते, इस्राएलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास राजा करावे म्हणून समस्त इस्राएलाबरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले.
11 I ovo je broj junaka Davidovijeh: Jasoveam sin Ahmonijev, prvi izmeðu trideset; on mahnu kopljem svojim na tri stotine, i pobi ih ujedanput.
११दावीदाकडील उत्तम सैनिकांची यादी: याशबाम, हा हखमोनीचा पुत्र, तीस जणांचा सेनापती होता. त्याने एका प्रसंगी आपल्या भाल्याने तीनशे मनुष्यांना ठार मारले.
12 A za njim Eleazar sin Dodov Ahošanin, on bijaše jedan od tri junaka.
१२त्यानंतर दोदय अहोही याचा पुत्र एलाजार तिघा पराक्रमी वीरांपैकी एक होता.
13 On bijaše s Davidom u Fas-Damimu, kad se Filisteji skupiše na boj; i ondje bijaše njiva puna jeèma, i narod pobježe od Filisteja,
१३पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे तेथे एकत्र होऊन लढावयाला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक होते आणि पलिष्ट्यांपुढून सैन्य पळून गेले होते.
14 A oni stadoše usred njive, i odbraniše je pobivši Filisteje; i Gospod dade izbavljenje veliko.
१४तेव्हा त्यांनी त्या शेतात उभे राहून त्या पलिष्ट्यांना कापून काढले आणि रक्षण केले. परमेश्वराने त्यांची सुटका करून त्यांना मोठा विजय मिळवून दिला.
15 I ta tri prva izmeðu trideset sidoše ka stijeni k Davidu u peæinu Odolamsku, kad vojska Filistejska stajaše u okolu u dolini Rafajskoj.
१५एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरांपैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे खडक उतरून गेले.
16 A David bijaše onda u gradu, a straža Filistejska bijaše tada u Vitlejemu.
१६आणखी एकदा दावीद त्याच्या किल्ल्यांत, गुहेत, असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलेहेममध्ये होते.
17 I David zaželje i reèe: ko bi mi donio vode da pijem iz studenca Vitlejemskoga što je kod vrata?
१७तेव्हा दावीदाला पाण्याची फार उत्कट इच्छा झाली. तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी जर मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल!”
18 Tada ta trojica prodriješe kroz oko Filistejski, i zahvatiše vode iz studenca Vitlejemskoga koji je kod vrata, i donesoše i dadoše Davidu; a David ne htje piti, nego je izli Gospodu.
१८यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिंमतीने वाट काढली, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्यांनी दावीदाला आणून दिले. परंतु त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वरास अर्पण केले.
19 I reèe: ne dao mi Bog moj da to uèinim! eda li æu piti krv tijeh ljudi koji ne mariše za život svoj? jer je donesoše ne mareæi za život svoj. I ne htje je piti. To uèiniše ta tri junaka.
१९तो म्हणाला “हे देवा, असले काम माझ्याकडून न होवो या ज्या मनुष्यांनी आपले जीव धोक्यात घातले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? त्यांनी आपला जीव धोक्यात घालून ते आणले आहे.” त्याने ते पिण्यास नकार दिला. त्या तीन शूरांनी हे कृत्ये केले.
20 I Avisaj brat Joavov bješe prvi izmeðu trojice. I on mahnu kopljem svojim na tri stotine, i pobi ih, i proslavi se meðu trojicom;
२०यवाबाचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. या तिघा सैनिकांबरोबर त्याचा उल्लेख नेहमीच केला जातो.
21 Meðu trojicom bješe slavniji od druge dvojice i bješe im poglavica; ali one trojice ne stiže.
२१या तिघांपेक्षा त्याचा मान जास्त झाला आणि त्यास त्यांचा नायक करण्यात आले, तरीपण, त्याची किर्ती त्या तीन सुप्रसिध्द सैनिकासारखी झाली नाही.
22 Venaja sin Jodajev, sin èovjeka junaka iz Kavseila, koji uèini velika djela, on pogubi dva junaka Moavska, i sišav ubi lava u jami kad bješe snijeg.
२२कबसेल येथला एक बलवान मनुष्य होता, त्याचा पुत्र यहोयादा बनाया याने पुष्कळ पराक्रम केले. त्याने मवाबातील अरीएलाच्या दोन पुत्रांना ठार केले. बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला.
23 On ubi i nekoga Misirca visoka pet lakata. Imaše Misirac u ruci koplje kao vratilo, a on izide na nj sa štapom, i istrže Misircu koplje iz ruke, i ubi ga njegovijem kopljem.
२३मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने ठार मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसरी सैनिकाला ठार केले.
24 To uèini Venaja sin Jodajev, i bi slavan meðu ova tri junaka.
२४यहोयादाचा पुत्र बनाया याने असे बरेच पराक्रम केले. त्याने अगदी तीन शूरवीरासारखे नाव मिळवले होते.
25 Bješe najslavniji izmeðu tridesetorice, ali one trojice ne stiže. I David ga postavi nad pratiocima svojim.
२५तीस शूरांपेक्षा बनाया अधिक सन्माननीय होता. पण तो त्या तिघांच्या पदास पोहचला नाही. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.
26 Junaci izmeðu vojnika bijahu: Asailo brat Joavov, Elhanan sin Dodov iz Vitlejema,
२६सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,
27 Samot Arorarin, Helis Felonjanin,
२७हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी,
28 Ira sin Ikisov iz Tekoje, Avijezer iz Anatota,
२८तकोइच्या इक्केशचा पुत्र ईरा, अनाथोथचा अबीयेजर
29 Sivehaj iz Husata, Ilaj iz Ahoha,
२९सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही.
30 Maraj iz Netofata, Heled sin Vanin iz Netofata,
३०महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेद,
31 Itaj sin Rivajev iz Gavaje sinova Venijaminovih, Venaja iz Faratona,
३१बन्यामिनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी,
32 Uraj od potoka Gaskih, Avilo iz Arvata,
३२गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी,
33 Azmavet iz Varuma, Elijava iz Salvona,
३३अजमावेथ बहरुमी, अलीहाबा शालबोनी.
34 Sinovi Asima Gizonjanina, Jonatan sin Sagijin Araranin,
३४हामेश गिजोनी याचे पुत्र, शागे हरारी याचा पुत्र योनाथान,
35 Ahijam sin Saharov Araranin, Elifal sin Urov,
३५हरारी साखार याचा पुत्र अहीयाम, ऊरचा पुत्र अलीफल,
36 Efer iz Mehirata, Ahija iz Felona,
३६हेफेर मखेराथी, अहीया पलोनी,
37 Esro Karmilac, Naraj sin Esvajev,
३७हेस्री कर्मेली, एजबयचा पुत्र नारय.
38 Joilo brat Natanov, Mivar sin Agirijev,
३८नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार,
39 Selek Amonac, Naraj Viroæanin, koji nošaše oružje Joavu sinu Serujinu,
३९सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
40 Ira Jetranin, Gariv Jetranin,
४०ईरा, इथ्री, गारेब, इथ्री,
41 Urija Hetejin, Zavad sin Alajev,
४१उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद.
42 Adina sin Sizin od sinova Ruvimovijeh, poglavar sinova Ruvimovijeh, i trideset s njim,
४२शीजा रऊबेनी याचा पुत्र अदीना हा रऊबेन्याचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक,
43 Anan sin Mašin, i Josafat iz Mitne,
४३माकाचा पुत्र हानान आणि योशाफाट मिथनी,
44 Ozija iz Asterota, Sama i Jehilo sinovi Hotana Aroiranina,
४४उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे पुत्र शामा व ईयेल.
45 Jediailo sin Simrijev i Joha brat mu iz Tise,
४५शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा
46 Elilo Mavljanin, i Jerivaj i Josavija sinovi Elnamovi, i Jetema Moavac,
४६अलीएल महवी व एलानामचे पुत्र यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी,
47 Elilo i Ovid i Jasilo iz Mesovaje.
४७अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.