< 1 karinthinaḥ 15 >
1 hē bhrātaraḥ, yaḥ susaṁvādō mayā yuṣmatsamīpē nivēditō yūyañca yaṁ gr̥hītavanta āśritavantaśca taṁ puna ryuṣmān vijñāpayāmi|
१आता बंधूंनो मी तुम्हास आठवण करून देतो, की जे शुभवर्तमान मी तुम्हास गाजवले व जे तुम्ही स्वीकारलेत व ज्याच्यात तुम्ही स्थिरही आहात.
2 yuṣmākaṁ viśvāsō yadi vitathō na bhavēt tarhi susaṁvādayuktāni mama vākyāni smaratāṁ yuṣmākaṁ tēna susaṁvādēna paritrāṇaṁ jāyatē|
२ज्याच्या द्वारे तुम्हास तारण मिळाले आहे तेच शुभवर्तमान मी तुम्हास कळवतो. ज्या वचनाने तुम्हासही शुभवर्तमान सांगितले त्या वचनानुसार ते तुम्ही दृढ धरले असल्यास त्याच्या योगे तुमचे तारणही होत आहे; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
3 yatō'haṁ yad yat jñāpitastadanusārāt yuṣmāsu mukhyāṁ yāṁ śikṣāṁ samārpayaṁ sēyaṁ, śāstrānusārāt khrīṣṭō'smākaṁ pāpamōcanārthaṁ prāṇān tyaktavān,
३कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी महत्त्वाचे हे आहे की, शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांसाठी मरण पावला.
4 śmaśānē sthāpitaśca tr̥tīyadinē śāstrānusārāt punarutthāpitaḥ|
४त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठविण्यात आले.
5 sa cāgrē kaiphai tataḥ paraṁ dvādaśaśiṣyēbhyō darśanaṁ dattavān|
५व तो केफाला दिसला, नंतर बारा प्रेषितांना,
6 tataḥ paraṁ pañcaśatādhikasaṁkhyakēbhyō bhrātr̥bhyō yugapad darśanaṁ dattavān tēṣāṁ kēcit mahānidrāṁ gatā bahutarāścādyāpi varttantē|
६नंतर तो एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मरण पावले आहेत.
7 tadanantaraṁ yākūbāya tatpaścāt sarvvēbhyaḥ prēritēbhyō darśanaṁ dattavān|
७नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला.
8 sarvvaśēṣē'kālajātatulyō yō'haṁ, sō'hamapi tasya darśanaṁ prāptavān|
८आणि शेवटी मी जो अवेळी जन्मल्याप्रमाणे, त्या मलासुद्धा तो दिसला.
9 īśvarasya samitiṁ prati daurātmyācaraṇād ahaṁ prēritanāma dharttum ayōgyastasmāt prēritānāṁ madhyē kṣudratamaścāsmi|
९कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणावयाच्या योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला.
10 yādr̥śō'smi tādr̥śa īśvarasyānugrahēṇaivāsmi; aparaṁ māṁ prati tasyānugrahō niṣphalō nābhavat, anyēbhyaḥ sarvvēbhyō mayādhikaḥ śramaḥ kr̥taḥ, kintu sa mayā kr̥tastannahi matsahakāriṇēśvarasyānugrahēṇaiva|
१०पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी आहे आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही, तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
11 ataēva mayā bhavēt tai rvā bhavēt asmābhistādr̥śī vārttā ghōṣyatē saiva ca yuṣmābhi rviśvāsēna gr̥hītā|
११म्हणून मी असो किंवा ते असोत आम्ही अशी घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला.
12 mr̥tyudaśātaḥ khrīṣṭa utthāpita iti vārttā yadi tamadhi ghōṣyatē tarhi mr̥talōkānām utthiti rnāstīti vāg yuṣmākaṁ madhyē kaiścit kutaḥ kathyatē?
१२पण जर आम्ही ख्रिस्त मरण पावलेल्यातून उठविला गेला आहे असे शुभवर्तमान गाजवतो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे?
13 mr̥tānām utthiti ryadi na bhavēt tarhi khrīṣṭō'pi nōtthāpitaḥ
१३जर मृतांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही,
14 khrīṣṭaśca yadyanutthāpitaḥ syāt tarhyasmākaṁ ghōṣaṇaṁ vitathaṁ yuṣmākaṁ viśvāsō'pi vitathaḥ|
१४आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.
15 vayañcēśvarasya mr̥ṣāsākṣiṇō bhavāmaḥ, yataḥ khrīṣṭa stēnōtthāpitaḥ iti sākṣyam asmābhirīśvaramadhi dattaṁ kintu mr̥tānāmutthiti ryadi na bhavēt tarhi sa tēna nōtthāpitaḥ|
१५आणि आम्ही देवाचे खोटे साक्षी ठरलो कारण देवाने ख्रिस्ताला उठवले अशी आम्ही त्याच्याविषयी साक्ष दिली. जर हे असे असेल की, मरण पावलेले उठवले जात नाहीत तर त्याने त्यास उठवले नाही.
16 yatō mr̥tānāmutthiti ryati na bhavēt tarhi khrīṣṭō'pyutthāpitatvaṁ na gataḥ|
१६आणि जर मृतांना उठवले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही.
17 khrīṣṭasya yadyanutthāpitaḥ syāt tarhi yuṣmākaṁ viśvāsō vitathaḥ, yūyam adyāpi svapāpēṣu magnāstiṣṭhatha|
१७आणि, जर ख्रिस्त उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून तुमच्या पापात आहात.
18 aparaṁ khrīṣṭāśritā yē mānavā mahānidrāṁ gatāstē'pi nāśaṁ gatāḥ|
१८होय आणि जे ख्रिस्तात मरण पावलेले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे.
19 khrīṣṭō yadi kēvalamihalōkē 'smākaṁ pratyāśābhūmiḥ syāt tarhi sarvvamartyēbhyō vayamēva durbhāgyāḥ|
१९जर ख्रिस्तावर असलेली आमची आशाही, फक्त या जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यांपेक्षा आम्ही दयनीय असे आहोत.
20 idānīṁ khrīṣṭō mr̥tyudaśāta utthāpitō mahānidrāgatānāṁ madhyē prathamaphalasvarūpō jātaśca|
२०परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मरण पावलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथमफळ आहे.
21 yatō yadvat mānuṣadvārā mr̥tyuḥ prādurbhūtastadvat mānuṣadvārā mr̥tānāṁ punarutthitirapi pradurbhūtā|
२१कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमाणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले.
22 ādamā yathā sarvvē maraṇādhīnā jātāstathā khrīṣṭēna sarvvē jīvayiṣyantē|
२२कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील.
23 kintvēkaikēna janēna nijē nijē paryyāya utthātavyaṁ prathamataḥ prathamajātaphalasvarūpēna khrīṣṭēna, dvitīyatastasyāgamanasamayē khrīṣṭasya lōkaiḥ|
२३पण प्रत्येकजण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथमफळ आहे आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले लोक जिवंत केले जातील.
24 tataḥ param antō bhaviṣyati tadānīṁ sa sarvvaṁ śāsanam adhipatitvaṁ parākramañca luptvā svapitarīśvarē rājatvaṁ samarpayiṣyati|
२४मग शेवट होईल, प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल.
25 yataḥ khrīṣṭasya ripavaḥ sarvvē yāvat tēna svapādayōradhō na nipātayiṣyantē tāvat tēnaiva rājatvaṁ karttavyaṁ|
२५कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायांखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे.
26 tēna vijētavyō yaḥ śēṣaripuḥ sa mr̥tyurēva|
२६जो शेवटचा शत्रू मृत्यू तो नष्ट केला जाईल.
27 likhitamāstē sarvvāṇi tasya pādayō rvaśīkr̥tāni| kintu sarvvāṇyēva tasya vaśīkr̥tānītyuktē sati sarvvāṇi yēna tasya vaśīkr̥tāni sa svayaṁ tasya vaśībhūtō na jāta iti vyaktaṁ|
२७पवित्र शास्त्र सांगते, “कारण देवाने, त्याच्या पायाखाली सर्व गोष्टी अंकित केल्या आहेत.” पण जेव्हा तो म्हणतो की, “सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या आहेत,” तेव्हा ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकित केल्या, तो स्वतः बाहेर आहे हे उघड आहे.
28 sarvvēṣu tasya vaśībhūtēṣu sarvvāṇi yēna putrasya vaśīkr̥tāni svayaṁ putrō'pi tasya vaśībhūtō bhaviṣyati tata īśvaraḥ sarvvēṣu sarvva ēva bhaviṣyati|
२८आणि, जेव्हा सर्व गोष्टी त्यास वश होतील तेव्हा पुत्र स्वतः त्या सर्व गोष्टी आपल्या वश करणार्याला वश होईल. म्हणजे देवपिता हाच सर्वात सर्व असावा.
29 aparaṁ parētalōkānāṁ vinimayēna yē majjyantē taiḥ kiṁ lapsyatē? yēṣāṁ parētalōkānām utthitiḥ kēnāpi prakārēṇa na bhaviṣyati tēṣāṁ vinimayēna kutō majjanamapi tairaṅgīkriyatē?
२९नाही तर, जे लोक मरण पावल्यांसाठी बाप्तिस्मा घेतात ते काय साधतील? जर मरण पावलेले उठविलेच जात नाहीत तर ते लोक त्यांच्याविषयी बाप्तिस्मा का घेतात?
30 vayamapi kutaḥ pratidaṇḍaṁ prāṇabhītim aṅgīkurmmahē?
३०आणि आम्ही सुद्धा प्रत्येक वेळी संकटात का पडतो?
31 asmatprabhunā yīśukhrīṣṭēna yuṣmattō mama yā ślāghāstē tasyāḥ śapathaṁ kr̥tvā kathayāmi dinē dinē'haṁ mr̥tyuṁ gacchāmi|
३१बंधूंनो ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याठायी, मला तुमच्याविषयी असलेल्या अभिमानाची शपथ घेऊन मी हे म्हणतो की, मी रोज रोज मरतो.
32 iphiṣanagarē vanyapaśubhiḥ sārddhaṁ yadi laukikabhāvāt mayā yuddhaṁ kr̥taṁ tarhi tēna mama kō lābhaḥ? mr̥tānām utthiti ryadi na bhavēt tarhi, kurmmō bhōjanapānē'dya śvastu mr̥tyu rbhaviṣyati|
३२मनुष्य स्वभावाप्रमाणे इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मरण पावलेले उठवले जात नाहीत तर चला “आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे!”
33 ityanēna dharmmāt mā bhraṁśadhvaṁ| kusaṁsargēṇa lōkānāṁ sadācārō vinaśyati|
३३फसू नका, “वाईट सोबतीने चांगल्या सवयी बिघडतात.”
34 yūyaṁ yathōcitaṁ sacaitanyāstiṣṭhata, pāpaṁ mā kurudhvaṁ, yatō yuṣmākaṁ madhya īśvarīyajñānahīnāḥ kē'pi vidyantē yuṣmākaṁ trapāyai mayēdaṁ gadyatē|
३४नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करीत जाऊ नका कारण तुम्हापैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.
35 aparaṁ mr̥talōkāḥ katham utthāsyanti? kīdr̥śaṁ vā śarīraṁ labdhvā punarēṣyantīti vākyaṁ kaścit prakṣyati|
३५परंतु कोणीतरी म्हणेल? “मरण पावलेले कसे उठवले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?”
36 hē ajña tvayā yad bījam upyatē tad yadi na mriyēta tarhi na jīvayiṣyatē|
३६तू इतका अज्ञानी आहेस काय? तू जे पेरतोस ते प्रथम मरण पावल्याशिवाय जिवंत होत नाही.
37 yayā mūrttyā nirgantavyaṁ sā tvayā nōpyatē kintu śuṣkaṁ bījamēva; tacca gōdhūmādīnāṁ kimapi bījaṁ bhavituṁ śaknōti|
३७आणि तू जे पेरतोस ते त्याचे भावी शरीर पेरीत नाहीस, तर उघडा दाणा पेरतोस; तो गव्हाचा किंवा दुसर्या कशाचा असेल.
38 īśvarēṇēva yathābhilāṣaṁ tasmai mūrtti rdīyatē, ēkaikasmai bījāya svā svā mūrttirēva dīyatē|
३८आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्यास आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे “शरीर” देतो.
39 sarvvāṇi palalāni naikavidhāni santi, manuṣyapaśupakṣimatsyādīnāṁ bhinnarūpāṇi palalāni santi|
३९जिवंत प्राणीमात्रांचे सर्वांचे देह सारखेच नसतात. त्याऐवजी मनुष्याचे शरीर एक प्रकारचे असते. प्राण्यांचे शरीर दुसऱ्या प्रकारचे असते, पक्ष्यांचे वेगळ्या प्रकारचे असते; आणि माशांचे आणखी वेगळ्या प्रकारचे असते.
40 aparaṁ svargīyā mūrttayaḥ pārthivā mūrttayaśca vidyantē kintu svargīyānām ēkarūpaṁ tējaḥ pārthivānāñca tadanyarūpaṁ tējō'sti|
४०तसेच स्वर्गीय शरीरे आहेत आणि पृथ्वीवरील शरीरे आहेत, पण स्वर्गीय शरीराचे वैभव एक प्रकारचे असते, तर पृथ्वीवरील शरीराचे दुसरे असते.
41 sūryyasya tēja ēkavidhaṁ candrasya tējastadanyavidhaṁ tārāṇāñca tējō'nyavidhaṁ, tārāṇāṁ madhyē'pi tējasastāratamyaṁ vidyatē|
४१सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकाचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताऱ्यांहून निराळा असतो.
42 tatra likhitamāstē yathā, ‘ādipuruṣa ādam jīvatprāṇī babhūva,’ kintvantima ādam (khrīṣṭō) jīvanadāyaka ātmā babhūva|
४२म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते अविनाशी आहे.
43 yad upyatē tat tucchaṁ yaccōtthāsyati tad gauravānvitaṁ; yad upyatē tannirbbalaṁ yaccōtthāsyati tat śaktiyuktaṁ|
४३जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठवले जाते जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते.
44 yat śarīram upyatē tat prāṇānāṁ sadma, yacca śarīram utthāsyati tad ātmanaḥ sadma| prāṇasadmasvarūpaṁ śarīraṁ vidyatē, ātmasadmasvarūpamapi śarīraṁ vidyatē|
४४जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठवले जाते ते आत्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात.
45 tatra likhitamāstē yathā, ādipuruṣa ādam jīvatprāṇī babhūva, kintvantima ādam (khrīṣṭō) jīvanadāyaka ātmā babhūva|
४५आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत प्राणी झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला.
46 ātmasadma na prathamaṁ kintu prāṇasadmaiva tatpaścād ātmasadma|
४६परंतु जे आत्मिक ते प्रथम नाही, जे नैसर्गिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते.
47 ādyaḥ puruṣē mr̥da utpannatvāt mr̥ṇmayō dvitīyaśca puruṣaḥ svargād āgataḥ prabhuḥ|
४७पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला.
48 mr̥ṇmayō yādr̥śa āsīt mr̥ṇmayāḥ sarvvē tādr̥śā bhavanti svargīyaśca yādr̥śō'sti svargīyāḥ sarvvē tādr̥śā bhavanti|
४८ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत.
49 mr̥ṇmayasya rūpaṁ yadvad asmābhi rdhāritaṁ tadvat svargīyasya rūpamapi dhārayiṣyatē|
४९आणि जो मातीचा होता त्याचे प्रतिरूप आपण धारण केले, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण करू.
50 hē bhrātaraḥ, yuṣmān prati vyāharāmi, īśvarasya rājyē raktamāṁsayōradhikārō bhavituṁ na śaknōti, akṣayatvē ca kṣayasyādhikārō na bhaviṣyati|
५०आता बंधूंनो मी हे सांगतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही.
51 paśyatāhaṁ yuṣmabhyaṁ nigūḍhāṁ kathāṁ nivēdayāmi|
५१पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ.
52 sarvvairasmābhi rmahānidrā na gamiṣyatē kintvantimadinē tūryyāṁ vāditāyām ēkasmin vipalē nimiṣaikamadhyē sarvvai rūpāntaraṁ gamiṣyatē, yatastūrī vādiṣyatē, mr̥talōkāścākṣayībhūtā utthāsyanti vayañca rūpāntaraṁ gamiṣyāmaḥ|
५२क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ.
53 yataḥ kṣayaṇīyēnaitēna śarīrēṇākṣayatvaṁ parihitavyaṁ, maraṇādhīnēnaitēna dēhēna cāmaratvaṁ parihitavyaṁ|
५३कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे.
54 ētasmin kṣayaṇīyē śarīrē 'kṣayatvaṁ gatē, ētasman maraṇādhīnē dēhē cāmaratvaṁ gatē śāstrē likhitaṁ vacanamidaṁ sētsyati, yathā, jayēna grasyatē mr̥tyuḥ|
५४हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे; “विजयात मरण गिळले गेले आहे.”
55 mr̥tyō tē kaṇṭakaṁ kutra paralōka jayaḥ kka tē|| (Hadēs )
५५“अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरणा, तुझी नांगी कोठे आहे?” (Hadēs )
56 mr̥tyōḥ kaṇṭakaṁ pāpamēva pāpasya ca balaṁ vyavasthā|
५६मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते.
57 īśvaraśca dhanyō bhavatu yataḥ sō'smākaṁ prabhunā yīśukhrīṣṭēnāsmān jayayuktān vidhāpayati|
५७पण देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो!
58 atō hē mama priyabhrātaraḥ; yūyaṁ susthirā niścalāśca bhavata prabhōḥ sēvāyāṁ yuṣmākaṁ pariśramō niṣphalō na bhaviṣyatīti jñātvā prabhōḥ kāryyē sadā tatparā bhavata|
५८म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.