< मार्कः 12 >

1 अनन्तरं यीशु र्दृष्टान्तेन तेभ्यः कथयितुमारेभे, कश्चिदेको द्राक्षाक्षेत्रं विधाय तच्चतुर्दिक्षु वारणीं कृत्वा तन्मध्ये द्राक्षापेषणकुण्डम् अखनत्, तथा तस्य गडमपि निर्म्मितवान् ततस्तत्क्षेत्रं कृषीवलेषु समर्प्य दूरदेशं जगाम।
येशू त्यांना दाखले सांगून शिकवू लागला, “एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षरसासाठी कुंड खणले आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला.
2 तदनन्तरं फलकाले कृषीवलेभ्यो द्राक्षाक्षेत्रफलानि प्राप्तुं तेषां सविधे भृत्यम् एकं प्राहिणोत्।
हंगामाच्या योग्यवेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठवले.
3 किन्तु कृषीवलास्तं धृत्वा प्रहृत्य रिक्तहस्तं विससृजुः।
परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले.
4 ततः स पुनरन्यमेकं भृत्यं प्रषयामास, किन्तु ते कृषीवलाः पाषाणाघातैस्तस्य शिरो भङ्क्त्वा सापमानं तं व्यसर्जन्।
नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठवले. त्यांनी त्याचे डोके फोडले आणि त्यास अपमानकारक रीतीने वागविले.
5 ततः परं सोपरं दासं प्राहिणोत् तदा ते तं जघ्नुः, एवम् अनेकेषां कस्यचित् प्रहारः कस्यचिद् वधश्च तैः कृतः।
मग धन्याने आणखी एका नोकराला पाठवले. त्यांनी त्यास जिवे मारले. त्याने इतर अनेकांना पाठवले. शेतकऱ्यांनी काहींना मारहाण केली तर काहींना ठार मारले.
6 ततः परं मया स्वपुत्रे प्रहिते ते तमवश्यं सम्मंस्यन्ते, इत्युक्त्वावशेषे तेषां सन्निधौ निजप्रियम् अद्वितीयं पुत्रं प्रेषयामास।
धन्याजवळ पाठवण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. तो म्हणाला, खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील. तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्यास त्या शेतकऱ्यांकडे पाठवले.
7 किन्तु कृषीवलाः परस्परं जगदुः, एष उत्तराधिकारी, आगच्छत वयमेनं हन्मस्तथा कृते ऽधिकारोयम् अस्माकं भविष्यति।
परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, हा तर वारीस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल!
8 ततस्तं धृत्वा हत्वा द्राक्षाक्षेत्राद् बहिः प्राक्षिपन्।
मग त्यांनी त्यास धरले, जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले.
9 अनेनासौ द्राक्षाक्षेत्रपतिः किं करिष्यति? स एत्य तान् कृषीवलान् संहत्य तत्क्षेत्रम् अन्येषु कृषीवलेषु समर्पयिष्यति।
तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येईल आणि शेतकऱ्यांना जिवे मारील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल.
10 अपरञ्च, "स्थपतयः करिष्यन्ति ग्रावाणं यन्तु तुच्छकं। प्राधानप्रस्तरः कोणे स एव संभविष्यति।
१०तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय? जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला.
11 एतत् कर्म्म परेशस्यांद्भुतं नो दृष्टितो भवेत्॥" इमां शास्त्रीयां लिपिं यूयं किं नापाठिष्ट?
११हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे.”
12 तदानीं स तानुद्दिश्य तां दृष्टान्तकथां कथितवान्, त इत्थं बुद्व्वा तं धर्त्तामुद्यताः, किन्तु लोकेभ्यो बिभ्युः, तदनन्तरं ते तं विहाय वव्रजुः।
१२मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले. परंतु त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यास अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता. मग ते त्यास सोडून निघून गेले.
13 अपरञ्च ते तस्य वाक्यदोषं धर्त्तां कतिपयान् फिरूशिनो हेरोदीयांश्च लोकान् तदन्तिकं प्रेषयामासुः।
१३नंतर त्यांनी त्यास चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परूशी व काही हेरोदी लोकांस त्याच्याकडे पाठवले.
14 त आगत्य तमवदन्, हे गुरो भवान् तथ्यभाषी कस्याप्यनुरोधं न मन्यते, पक्षपातञ्च न करोति, यथार्थत ईश्वरीयं मार्गं दर्शयति वयमेतत् प्रजानीमः, कैसराय करो देयो न वां? वयं दास्यामो न वा?
१४ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी की, आपण प्रामाणिक आहात आणि पक्षपात न करता आपण देवाचा मार्ग खरेपणाने शिकविता हे आम्हास माहीत आहे तर मग कैसरला कर देणे योग्य आहे की नाही? आणि आम्ही तो द्यावा की न द्यावा?”
15 किन्तु स तेषां कपटं ज्ञात्वा जगाद, कुतो मां परीक्षध्वे? एकं मुद्रापादं समानीय मां दर्शयत।
१५परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला व त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे आणा म्हणजे मी ते पाहीन.”
16 तदा तैरेकस्मिन् मुद्रापादे समानीते स तान् पप्रच्छ, अत्र लिखितं नाम मूर्त्ति र्वा कस्य? ते प्रत्यूचुः, कैसरस्य।
१६मग त्यांनी त्याच्याकडे एक नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “या नाण्यावरील ही प्रतिमा व हा लेख कोणाचा आहे?” ते त्यास म्हणाले, “कैसराचा.”
17 तदा यीशुरवदत् तर्हि कैसरस्य द्रव्याणि कैसराय दत्त, ईश्वरस्य द्रव्याणि तु ईश्वराय दत्त; ततस्ते विस्मयं मेनिरे।
१७मग येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे ते कैसराला आणि जे देवाचे ते देवाला द्या.” तेव्हा त्यांना त्याच्या उत्तराविषयी फार आश्चर्य वाटले.
18 अथ मृतानामुत्थानं ये न मन्यन्ते ते सिदूकिनो यीशोः समीपमागत्य तं पप्रच्छुः;
१८नंतर, जे पुनरुत्थान नाही असे मानणारे काही सदूकी त्याच्याकडे आले त्यांनी त्यास विचारले,
19 हे गुरो कश्चिज्जनो यदि निःसन्ततिः सन् भार्य्यायां सत्यां म्रियते तर्हि तस्य भ्राता तस्य भार्य्यां गृहीत्वा भ्रातु र्वंशोत्पत्तिं करिष्यति, व्यवस्थामिमां मूसा अस्मान् प्रति व्यलिखत्।
१९“गुरुजी. मोशेने आमच्यासाठी पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मरण पावला व त्याची पत्नी मागे राहिली, परंतु त्यांना मूलबाळ नसले तर आपल्या भावाच्या वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मरण पावलेल्या भावाचा वंश वाढवावा.
20 किन्तु केचित् सप्त भ्रातर आसन्, ततस्तेषां ज्येष्ठभ्राता विवह्य निःसन्ततिः सन् अम्रियत।
२०तर असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ न होता मरण पावला.
21 ततो द्वितीयो भ्राता तां स्त्रियमगृहणत् किन्तु सोपि निःसन्ततिः सन् अम्रियत; अथ तृतीयोपि भ्राता तादृशोभवत्।
२१दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोसुध्दा मूलबाळ न होता मरण पावला.
22 इत्थं सप्तैव भ्रातरस्तां स्त्रियं गृहीत्वा निःसन्तानाः सन्तोऽम्रियन्त, सर्व्वशेषे सापि स्त्री म्रियते स्म।
२२तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मरण पावली.
23 अथ मृतानामुत्थानकाले यदा त उत्थास्यन्ति तदा तेषां कस्य भार्य्या सा भविष्यति? यतस्ते सप्तैव तां व्यवहन्।
२३सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरुत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.”
24 ततो यीशुः प्रत्युवाच शास्त्रम् ईश्वरशक्तिञ्च यूयमज्ञात्वा किमभ्राम्यत न?
२४येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात.
25 मृतलोकानामुत्थानं सति ते न विवहन्ति वाग्दत्ता अपि न भवन्ति, किन्तु स्वर्गीयदूतानां सदृशा भवन्ति।
२५कारण जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत, त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील.
26 पुनश्च "अहम् इब्राहीम ईश्वर इस्हाक ईश्वरो याकूबश्चेश्वरः" यामिमां कथां स्तम्बमध्ये तिष्ठन् ईश्वरो मूसामवादीत् मृतानामुत्थानार्थे सा कथा मूसालिखिते पुस्तके किं युष्माभि र्नापाठि?
२६परंतु मरण पावलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे.
27 ईश्वरो जीवतां प्रभुः किन्तु मृतानां प्रभु र्न भवति, तस्माद्धेतो र्यूयं महाभ्रमेण तिष्ठथ।
२७तो मरण पावलेल्यांचा देव नव्हे तर जिवंत लोकांचा देव आहे. तुम्ही फार चुकत आहात.”
28 एतर्हि एकोध्यापक एत्य तेषामित्थं विचारं शुश्राव; यीशुस्तेषां वाक्यस्य सदुत्तरं दत्तवान् इति बुद्व्वा तं पृष्टवान् सर्व्वासाम् आज्ञानां का श्रेष्ठा? ततो यीशुः प्रत्युवाच,
२८त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घालताना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञा पैकी महत्त्वाची अशी पहिली आज्ञा कोणती?”
29 "हे इस्रायेल्लोका अवधत्त, अस्माकं प्रभुः परमेश्वर एक एव,
२९येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्राएला, ऐक, प्रभू आपला देव एकच प्रभू आहे.
30 यूयं सर्व्वन्तःकरणैः सर्व्वप्राणैः सर्व्वचित्तैः सर्व्वशक्तिभिश्च तस्मिन् प्रभौ परमेश्वरे प्रीयध्वं," इत्याज्ञा श्रेष्ठा।
३०तू आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर.’
31 तथा "स्वप्रतिवासिनि स्ववत् प्रेम कुरुध्वं," एषा या द्वितीयाज्ञा सा तादृशी; एताभ्यां द्वाभ्याम् आज्ञाभ्याम् अन्या काप्याज्ञा श्रेष्ठा नास्ति।
३१दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
32 तदा सोध्यापकस्तमवदत्, हे गुरो सत्यं भवान् यथार्थं प्रोक्तवान् यत एकस्माद् ईश्वराद् अन्यो द्वितीय ईश्वरो नास्ति;
३२तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते खरे बोललात.
33 अपरं सर्व्वान्तःकरणैः सर्व्वप्राणैः सर्व्वचित्तैः सर्व्वशक्तिभिश्च ईश्वरे प्रेमकरणं तथा स्वमीपवासिनि स्ववत् प्रेमकरणञ्च सर्व्वेभ्यो होमबलिदानादिभ्यः श्रष्ठं भवति।
३३त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”
34 ततो यीशुः सुबुद्धेरिव तस्येदम् उत्तरं श्रुत्वा तं भाषितवान् त्वमीश्वरस्य राज्यान्न दूरोसि।इतः परं तेन सह कस्यापि वाक्यस्य विचारं कर्त्तां कस्यापि प्रगल्भता न जाता।
३४येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्यास म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” त्यानंतर त्यास प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
35 अनन्तरं मध्येमन्दिरम् उपदिशन् यीशुरिमं प्रश्नं चकार, अध्यापका अभिषिक्तं (तारकं) कुतो दायूदः सन्तानं वदन्ति?
३५येशू परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता, तो म्हणाला, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे नियमशास्त्राचे शिक्षक म्हणातात ते कसे शक्य आहे?
36 स्वयं दायूद् पवित्रस्यात्मन आवेशेनेदं कथयामास। यथा। "मम प्रभुमिदं वाक्यवदत् परमेश्वरः। तव शत्रूनहं यावत् पादपीठं करोमि न। तावत् कालं मदीये त्वं दक्षपार्श्व् उपाविश।"
३६दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत, तू माझ्या उजवीकडे बैस.’
37 यदि दायूद् तं प्रभूं वदति तर्हि कथं स तस्य सन्तानो भवितुमर्हति? इतरे लोकास्तत्कथां श्रुत्वाननन्दुः।
३७दावीद स्वतः ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर मग ख्रिस्त दाविदाचा पुत्र कसा?” आणि मोठा लोकसमुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता.
38 तदानीं स तानुपदिश्य कथितवान् ये नरा दीर्घपरिधेयानि हट्टे विपनौ च
३८शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते.
39 लोककृतनमस्कारान् भजनगृहे प्रधानासनानि भोजनकाले प्रधानस्थानानि च काङ्क्षन्ते;
३९आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते.
40 विधवानां सर्व्वस्वं ग्रसित्वा छलाद् दीर्घकालं प्रार्थयन्ते तेभ्य उपाध्यायेभ्यः सावधाना भवत; तेऽधिकतरान् दण्डान् प्राप्स्यन्ति।
४०ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.”
41 तदनन्तरं लोका भाण्डागारे मुद्रा यथा निक्षिपन्ति भाण्डागारस्य सम्मुखे समुपविश्य यीशुस्तदवलुलोक; तदानीं बहवो धनिनस्तस्य मध्ये बहूनि धनानि निरक्षिपन्।
४१येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते.
42 पश्चाद् एका दरिद्रा विधवा समागत्य द्विपणमूल्यां मुद्रैकां तत्र निरक्षिपत्।
४२नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली.
43 तदा यीशुः शिष्यान् आहूय कथितवान् युष्मानहं यथार्थं वदामि ये ये भाण्डागारेऽस्मिन धनानि निःक्षिपन्ति स्म तेभ्यः सर्व्वेभ्य इयं विधवा दरिद्राधिकम् निःक्षिपति स्म।
४३येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे.
44 यतस्ते प्रभूतधनस्य किञ्चित् निरक्षिपन् किन्तु दीनेयं स्वदिनयापनयोग्यं किञ्चिदपि न स्थापयित्वा सर्व्वस्वं निरक्षिपत्।
४४मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”

< मार्कः 12 >