< မထိး 12 >
1 အနန္တရံ ယီၑု ရွိၑြာမဝါရေ ၑ္သျမဓျေန ဂစ္ဆတိ, တဒါ တစ္ဆိၐျာ ဗုဘုက္ၐိတား သန္တး ၑ္သျမဉ္ဇရီၑ္ဆတွာ ဆိတွာ ခါဒိတုမာရဘန္တ၊
१त्यावेळी एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून चालला होता. शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले.
2 တဒ် ဝိလောကျ ဖိရူၑိနော ယီၑုံ ဇဂဒုး, ပၑျ ဝိၑြာမဝါရေ ယတ် ကရ္မ္မာကရ္တ္တဝျံ တဒေဝ တဝ ၑိၐျား ကုရွွန္တိ၊
२जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.”
3 သ တာန် ပြတျာဝဒတ, ဒါယူဒ် တတ္သင်္ဂိနၑ္စ ဗုဘုက္ၐိတား သန္တော ယတ် ကရ္မ္မာကုရွွန် တတ် ကိံ ယုၐ္မာဘိ ရ္နာပါဌိ?
३तेव्हा येशूने त्यांना म्हटले, दाविदाला व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
4 ယေ ဒရ္ၑနီယား ပူပါး ယာဇကာန် ဝိနာ တသျ တတ္သင်္ဂိမနုဇာနာဉ္စာဘောဇနီယာသ္တ ဤၑွရာဝါသံ ပြဝိၐ္ဋေန တေန ဘုက္တား၊
४तो देवाच्या भवनात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी खाऊ नयेत, असे करणे नियमशास्त्राच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवानगी होती. त्या त्यांनी कशा खाल्ल्या?
5 အနျစ္စ ဝိၑြာမဝါရေ မဓျေမန္ဒိရံ ဝိၑြာမဝါရီယံ နိယမံ လငွန္တောပိ ယာဇကာ နိရ္ဒောၐာ ဘဝန္တိ, ၑာသ္တြမဓျေ ကိမိဒမပိ ယုၐ္မာဘိ ရ္န ပဌိတံ?
५आणि प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी परमेश्वराच्या भवनातील याजक भवनात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? परंतु तरी ते निर्दोष असत.
6 ယုၐ္မာနဟံ ဝဒါမိ, အတြ သ္ထာနေ မန္ဒိရာဒပိ ဂရီယာန် ဧက အာသ္တေ၊
६मी तुम्हास सांगतो की, परमेश्वराच्या भवनापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे.
7 ကိန္တု ဒယာယာံ မေ ယထာ ပြီတိ ရ္န တထာ ယဇ္ဉကရ္မ္မဏိ၊ ဧတဒွစနသျာရ္ထံ ယဒိ ယုယမ် အဇ္ဉာသိၐ္ဋ တရှိ နိရ္ဒောၐာန် ဒေါၐိဏော နာကာရ္ၐ္ဋ၊
७पवित्र शास्त्र म्हणते, मला दया हवी आहे आणि यज्ञ पशू नको. याचा खरा अर्थ तुम्हास समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांस दोष लावला नसता.
8 အနျစ္စ မနုဇသုတော ဝိၑြာမဝါရသျာပိ ပတိရာသ္တေ၊
८कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.
9 အနန္တရံ သ တတ္သ္ထာနာတ် ပြသ္ထာယ တေၐာံ ဘဇနဘဝနံ ပြဝိၐ္ဋဝါန်, တဒါနီမ် ဧကး ၑုၐ္ကကရာမယဝါန် ဥပသ္ထိတဝါန်၊
९नंतर येशूने ते ठिकाण सोडले व यहूद्यांच्या सभास्थानात तो गेला.
10 တတော ယီၑုမ် အပဝဒိတုံ မာနုၐား ပပြစ္ဆုး, ဝိၑြာမဝါရေ နိရာမယတွံ ကရဏီယံ န ဝါ?
१०सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”
11 တေန သ ပြတျုဝါစ, ဝိၑြာမဝါရေ ယဒိ ကသျစိဒ် အဝိ ရ္ဂရ္တ္တေ ပတတိ, တရှိ ယသ္တံ ဃၖတွာ န တောလယတိ, ဧတာဒၖၑော မနုဇော ယုၐ္မာကံ မဓျေ က အာသ္တေ?
११येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्यास वर काढणार नाही काय?
12 အဝေ ရ္မာနဝး ကိံ နဟိ ၑြေယာန်? အတော ဝိၑြာမဝါရေ ဟိတကရ္မ္မ ကရ္တ္တဝျံ၊
१२तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांस शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.”
13 အနန္တရံ သ တံ မာနဝံ ဂဒိတဝါန်, ကရံ ပြသာရယ; တေန ကရေ ပြသာရိတေ သောနျကရဝတ် သွသ္ထော'ဘဝတ်၊
१३मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला.
14 တဒါ ဖိရူၑိနော ဗဟိရ္ဘူယ ကထံ တံ ဟနိၐျာမ ဣတိ ကုမန္တြဏာံ တတ္ပြာတိကူလျေန စကြုး၊
१४नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली.
15 တတော ယီၑုသ္တဒ် ဝိဒိတွာ သ္ထနာန္တရံ ဂတဝါန်; အနျေၐု ဗဟုနရေၐု တတ္ပၑ္စာဒ် ဂတေၐု တာန် သ နိရာမယာန် ကၖတွာ ဣတျာဇ္ဉာပယတ်,
१५परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वांना बरे केले.
१६आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका.
17 တသ္မာတ် မမ ပြီယော မနောနီတော မနသသ္တုၐ္ဋိကာရကး၊ မဒီယး သေဝကော ယသ္တု ဝိဒျတေ တံ သမီက္ၐတာံ၊ တသျောပရိ သွကီယာတ္မာ မယာ သံသ္ထာပယိၐျတေ၊ တေနာနျဒေၑဇာတေၐု ဝျဝသ္ထာ သံပြကာၑျတေ၊
१७यशया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.
18 ကေနာပိ န ဝိရောဓံ သ ဝိဝါဒဉ္စ ကရိၐျတိ၊ န စ ရာဇပထေ တေန ဝစနံ ၑြာဝယိၐျတေ၊
१८“हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो परराष्ट्रीय लोकांस योग्य न्यायाची घोषणा करील.
19 ဝျဝသ္ထာ စလိတာ ယာဝတ် နဟိ တေန ကရိၐျတေ၊ တာဝတ် နလော ဝိဒီရ္ဏော'ပိ ဘံက္ၐျတေ နဟိ တေန စ၊ တထာ သဓူမဝရ္တ္တိဉ္စ န သ နိရွွာပယိၐျတေ၊
१९तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.
20 ပြတျာၑာဉ္စ ကရိၐျန္တိ တန္နာမ္နိ ဘိန္နဒေၑဇား၊
२०वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील.
21 ယာနျေတာနိ ဝစနာနိ ယိၑယိယဘဝိၐျဒွါဒိနာ ပြောက္တာနျာသန်, တာနိ သဖလာနျဘဝန်၊
२१परराष्ट्रीय लोक त्याच्यावर आशा ठेवतील. येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे.”
22 အနန္တရံ လောကဲ သ္တတ္သမီပမ် အာနီတော ဘူတဂြသ္တာန္ဓမူကဲကမနုဇသ္တေန သွသ္ထီကၖတး, တတး သော'န္ဓော မူကော ဒြၐ္ဋုံ ဝက္တုဉ္စာရဗ္ဓဝါန်၊
२२मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.
23 အနေန သရွွေ ဝိသ္မိတား ကထယာဉ္စကြုး, ဧၐး ကိံ ဒါယူဒး သန္တာနော နဟိ?
२३सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”
24 ကိန္တု ဖိရူၑိနသ္တတ် ၑြုတွာ ဂဒိတဝန္တး, ဗာလ္သိဗူဗ္နာမ္နော ဘူတရာဇသျ သာဟာယျံ ဝိနာ နာယံ ဘူတာန် တျာဇယတိ၊
२४परूश्यांनी लोकांस हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भूते काढण्यासाठी येशू बालजबूलचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.”
25 တဒါနီံ ယီၑုသ္တေၐာမ် ဣတိ မာနသံ ဝိဇ္ဉာယ တာန် အဝဒတ် ကိဉ္စန ရာဇျံ ယဒိ သွဝိပက္ၐာဒ် ဘိဒျတေ, တရှိ တတ် ဥစ္ဆိဒျတေ; ယစ္စ ကိဉ္စန နဂရံ ဝါ ဂၖဟံ သွဝိပက္ၐာဒ် ဝိဘိဒျတေ, တတ် သ္ထာတုံ န ၑက္နောတိ၊
२५परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही.
26 တဒွတ် ၑယတာနော ယဒိ ၑယတာနံ ဗဟိး ကၖတွာ သွဝိပက္ၐာတ် ပၖထက် ပၖထက် ဘဝတိ, တရှိ တသျ ရာဇျံ ကေန ပြကာရေဏ သ္ထာသျတိ?
२६आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल?
27 အဟဉ္စ ယဒိ ဗာလ္သိဗူဗာ ဘူတာန် တျာဇယာမိ, တရှိ ယုၐ္မာကံ သန္တာနား ကေန ဘူတာန် တျာဇယန္တိ? တသ္မာဒ် ယုၐ္မာကမ် ဧတဒွိစာရယိတာရသ္တ ဧဝ ဘဝိၐျန္တိ၊
२७आणि मी जर बालजबूलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे लोक कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुमचा न्याय करतील.
28 ကိန္တဝဟံ ယဒီၑွရာတ္မနာ ဘူတာန် တျာဇယာမိ, တရှီၑွရသျ ရာဇျံ ယုၐ္မာကံ သန္နိဓိမာဂတဝတ်၊
२८परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
29 အနျဉ္စ ကောပိ ဗလဝန္တ ဇနံ ပြထမတော န ဗဒွွာ ကေန ပြကာရေဏ တသျ ဂၖဟံ ပြဝိၑျ တဒ္ဒြဝျာဒိ လောဌယိတုံ ၑက္နောတိ? ကိန္တု တတ် ကၖတွာ တဒီယဂၖသျ ဒြဝျာဒိ လောဌယိတုံ ၑက္နောတိ၊
२९किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्यास तो बांधून टाकील व मग तो चोरी करील.
30 ယး ကၑ္စိတ် မမ သွပက္ၐီယော နဟိ သ ဝိပက္ၐီယ အာသ္တေ, ယၑ္စ မယာ သာကံ န သံဂၖဟ္လာတိ, သ ဝိကိရတိ၊
३०जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.
31 အတဧဝ ယုၐ္မာနဟံ ဝဒါမိ, မနုဇာနာံ သရွွပြကာရပါပါနာံ နိန္ဒာယာၑ္စ မရ္ၐဏံ ဘဝိတုံ ၑက္နောတိ, ကိန္တု ပဝိတြသျာတ္မနော ဝိရုဒ္ဓနိန္ဒာယာ မရ္ၐဏံ ဘဝိတုံ န ၑက္နောတိ၊
३१म्हणून मी तुम्हास सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची व वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्यास क्षमा करण्यात येणार नाही.
32 ယော မနုဇသုတသျ ဝိရုဒ္ဓါံ ကထာံ ကထယတိ, တသျာပရာဓသျ က္ၐမာ ဘဝိတုံ ၑက္နောတိ, ကိန္တု ယး ကၑ္စိတ် ပဝိတြသျာတ္မနော ဝိရုဒ္ဓါံ ကထာံ ကထယတိ နေဟလောကေ န ပြေတျ တသျာပရာဓသျ က္ၐမာ ဘဝိတုံ ၑက္နောတိ၊ (aiōn )
३२एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्यास क्षमा होणार नाही. त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही. (aiōn )
33 ပါဒပံ ယဒိ ဘဒြံ ဝဒထ, တရှိ တသျ ဖလမပိ သာဓု ဝက္တဝျံ, ယဒိ စ ပါဒပံ အသာဓုံ ဝဒထ, တရှိ တသျ ဖလမပျသာဓု ဝက္တဝျံ; ယတး သွီယသွီယဖလေန ပါဒပး ပရိစီယတေ၊
३३झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा; कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.
34 ရေ ဘုဇဂဝံၑာ ယူယမသာဓဝး သန္တး ကထံ သာဓု ဝါကျံ ဝက္တုံ ၑက္ၐျထ? ယသ္မာဒ် အန္တးကရဏသျ ပူရ္ဏဘာဝါနုသာရာဒ် ဝဒနာဒ် ဝစော နိရ္ဂစ္ဆတိ၊
३४अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हास चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते.
35 တေန သာဓုရ္မာနဝေါ'န္တးကရဏရူပါတ် သာဓုဘာဏ္ဍာဂါရာတ် သာဓု ဒြဝျံ နိရ္ဂမယတိ, အသာဓုရ္မာနုၐသ္တွသာဓုဘာဏ္ဍာဂါရာဒ် အသာဓုဝသ္တူနိ နိရ္ဂမယတိ၊
३५चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
36 ကိန္တွဟံ ယုၐ္မာန် ဝဒါမိ, မနုဇာ ယာဝန္တျာလသျဝစာံသိ ဝဒန္တိ, ဝိစာရဒိနေ တဒုတ္တရမဝၑျံ ဒါတဝျံ,
३६आणखी मी तुम्हास सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील.
37 ယတသ္တွံ သွီယဝစောဘိ ရ္နိရပရာဓး သွီယဝစောဘိၑ္စ သာပရာဓော ဂဏိၐျသေ၊
३७कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.”
38 တဒါနီံ ကတိပယာ ဥပါဓျာယား ဖိရူၑိနၑ္စ ဇဂဒုး, ဟေ ဂုရော ဝယံ ဘဝတ္တး ကိဉ္စန လက္ၐ္မ ဒိဒၖက္ၐာမး၊
३८काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काहीजणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”
39 တဒါ သ ပြတျုက္တဝါန်, ဒုၐ္ဋော ဝျဘိစာရီ စ ဝံၑော လက္ၐ္မ မၖဂယတေ, ကိန္တု ဘဝိၐျဒွါဒိနော ယူနသော လက္ၐ္မ ဝိဟာယာနျတ် ကိမပိ လက္ၐ္မ တေ န ပြဒရ္ၑယိၐျန္တေ၊
३९येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हास मिळणार नाही.
40 ယတော ယူနမ် ယထာ တြျဟောရာတြံ ဗၖဟန္မီနသျ ကုက္ၐာဝါသီတ်, တထာ မနုဇပုတြောပိ တြျဟောရာတြံ မေဒိနျာ မဓျေ သ္ထာသျတိ၊
४०कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.
41 အပရံ နီနိဝီယာ မာနဝါ ဝိစာရဒိန ဧတဒွံၑီယာနာံ ပြတိကူလမ် ဥတ္ထာယ တာန် ဒေါၐိဏး ကရိၐျန္တိ, ယသ္မာတ္တေ ယူနသ ဥပဒေၑာတ် မနာံသိ ပရာဝရ္တ္တယာဉ္စကြိရေ, ကိန္တွတြ ယူနသောပိ ဂုရုတရ ဧက အာသ္တေ၊
४१जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्याविरुध्द साक्ष देतील आणि तुम्हास दोष देतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणीएक येथे आहे.
42 ပုနၑ္စ ဒက္ၐိဏဒေၑီယာ ရာဇ္ဉီ ဝိစာရဒိန ဧတဒွံၑီယာနာံ ပြတိကူလမုတ္ထာယ တာန် ဒေါၐိဏး ကရိၐျတိ ယတး သာ ရာဇ္ဉီ သုလေမနော ဝိဒျာယား ကထာံ ၑြောတုံ မေဒိနျား သီမ္န အာဂစ္ဆတ်, ကိန္တု သုလေမနောပိ ဂုရုတရ ဧကော ဇနော'တြ အာသ္တေ၊
४२न्यायाच्या दिवशी दक्षिणेकडील देशाची राणी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.”
43 အပရံ မနုဇာဒ် ဗဟိရ္ဂတော 'ပဝိတြဘူတး ၑုၐ္ကသ္ထာနေန ဂတွာ ဝိၑြာမံ ဂဝေၐယတိ, ကိန္တု တဒလဘမာနး သ ဝက္တိ, ယသ္မာ; နိကေတနာဒ် အာဂမံ, တဒေဝ ဝေၑ္မ ပကာဝၖတျ ယာမိ၊
४३“जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्यास सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्यास मिळत नाही.
44 ပၑ္စာတ် သ တတ် သ္ထာနမ် ဥပသ္ထာယ တတ် ၑူနျံ မာရ္ဇ္ဇိတံ ၑောဘိတဉ္စ ဝိလောကျ ဝြဇန် သွတောပိ ဒုၐ္ဋတရာန် အနျသပ္တဘူတာန် သင်္ဂိနး ကရောတိ၊
४४तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्यास दिसते.
45 တတသ္တေ တတ် သ္ထာနံ ပြဝိၑျ နိဝသန္တိ, တေန တသျ မနုဇသျ ၑေၐဒၑာ ပူရွွဒၑာတောတီဝါၑုဘာ ဘဝတိ, ဧတေၐာံ ဒုၐ္ဋဝံၑျာနာမပိ တထဲဝ ဃဋိၐျတေ၊
४५नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्यास झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या मनुष्याची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या या पापी पिढीचे होईल.”
46 မာနဝေဘျ ဧတာသာံ ကထနာံ ကထနကာလေ တသျ မာတာ သဟဇာၑ္စ တေန သာကံ ကာဉ္စိတ် ကထာံ ကထယိတုံ ဝါဉ္ဆန္တော ဗဟိရေဝ သ္ထိတဝန္တး၊
४६मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते.
47 တတး ကၑ္စိတ် တသ္မဲ ကထိတဝါန်, ပၑျ တဝ ဇနနီ သဟဇာၑ္စ တွယာ သာကံ ကာဉ္စန ကထာံ ကထယိတုံ ကာမယမာနာ ဗဟိသ္တိၐ္ဌန္တိ၊
४७तेव्हा कोणीतरी त्यास म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.”
48 ကိန္တု သ တံ ပြတျဝဒတ်, မမ ကာ ဇနနီ? ကေ ဝါ မမ သဟဇား?
४८त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?”
49 ပၑ္စာတ် ၑိၐျာန် ပြတိ ကရံ ပြသာရျျ ကထိတဝါန်, ပၑျ မမ ဇနနီ မမ သဟဇာၑ္စဲတေ;
४९मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ हे आहेत.
50 ယး ကၑ္စိတ် မမ သွရ္ဂသ္ထသျ ပိတုရိၐ္ဋံ ကရ္မ္မ ကုရုတေ, သဧဝ မမ ဘြာတာ ဘဂိနီ ဇနနီ စ၊
५०कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई.”