< မာရ္ကး 2 >
1 တဒနန္တရံ ယီၑဲ ကတိပယဒိနာနိ ဝိလမ္ဗျ ပုနး ကဖရ္နာဟူမ္နဂရံ ပြဝိၐ္ဋေ သ ဂၖဟ အာသ္တ ဣတိ ကိံဝဒန္တျာ တတ္က္ၐဏံ တတ္သမီပံ ဗဟဝေါ လောကာ အာဂတျ သမုပတသ္ထုး,
१काही दिवसानी येशू कफर्णहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले.
2 တသ္မာဒ် ဂၖဟမဓျေ သရွွေၐာံ ကၖတေ သ္ထာနံ နာဘဝဒ် ဒွါရသျ စတုရ္ဒိက္ၐွပိ နာဘဝတ်, တတ္ကာလေ သ တာန် ပြတိ ကထာံ ပြစာရယာဉ္စကြေ၊
२तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता.
3 တတး ပရံ လောကာၑ္စတုရ္ဘိ ရ္မာနဝဲရေကံ ပက္ၐာဃာတိနံ ဝါဟယိတွာ တတ္သမီပမ် အာနိနျုး၊
३मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते.
4 ကိန္တု ဇနာနာံ ဗဟုတွာတ် တံ ယီၑေား သမ္မုခမာနေတုံ န ၑက္နုဝန္တော ယသ္မိန် သ္ထာနေ သ အာသ္တေ တဒုပရိဂၖဟပၖၐ္ဌံ ခနိတွာ ဆိဒြံ ကၖတွာ တေန မာရ္ဂေဏ သၑယျံ ပက္ၐာဃာတိနမ် အဝရောဟယာမာသုး၊
४परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली.
5 တတော ယီၑုသ္တေၐာံ ဝိၑွာသံ ဒၖၐ္ဋွာ တံ ပက္ၐာဃာတိနံ ဗဘာၐေ ဟေ ဝတ္သ တဝ ပါပါနာံ မာရ္ဇနံ ဘဝတု၊
५त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
6 တဒါ ကိယန္တော'ဓျာပကာသ္တတြောပဝိၑန္တော မနောဘိ ရွိတရ္ကယာဉ္စကြုး, ဧၐ မနုၐျ ဧတာဒၖၑီမီၑွရနိန္ဒာံ ကထာံ ကုတး ကထယတိ?
६तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की,
7 ဤၑွရံ ဝိနာ ပါပါနိ မာရ္ၐ္ဋုံ ကသျ သာမရ္ထျမ် အာသ္တေ?
७“हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”
8 ဣတ္ထံ တေ ဝိတရ္ကယန္တိ ယီၑုသ္တတ္က္ၐဏံ မနသာ တဒ် ဗုဒွွာ တာနဝဒဒ် ယူယမန္တးကရဏဲး ကုတ ဧတာနိ ဝိတရ္ကယထ?
८आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता?
9 တဒနန္တရံ ယီၑုသ္တတ္သ္ထာနာတ် ပုနး သမုဒြတဋံ ယယော်; လောကနိဝဟေ တတ္သမီပမာဂတေ သ တာန် သမုပဒိဒေၑ၊
९तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?”
10 ကိန္တု ပၖထိဝျာံ ပါပါနိ မာရ္ၐ္ဋုံ မနုၐျပုတြသျ သာမရ္ထျမသ္တိ, ဧတဒ် ယုၐ္မာန် ဇ္ဉာပယိတုံ (သ တသ္မဲ ပက္ၐာဃာတိနေ ကထယာမာသ)
१०परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला,
11 ဥတ္တိၐ္ဌ တဝ ၑယျာံ ဂၖဟီတွာ သွဂၖဟံ ယာဟိ, အဟံ တွာမိဒမ် အာဇ္ဉာပယာမိ၊
११“मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.”
12 တတး သ တတ္က္ၐဏမ် ဥတ္ထာယ ၑယျာံ ဂၖဟီတွာ သရွွေၐာံ သာက္ၐာတ် ဇဂါမ; သရွွေ ဝိသ္မိတာ ဧတာဒၖၑံ ကရ္မ္မ ဝယမ် ကဒါပိ နာပၑျာမ, ဣမာံ ကထာံ ကထယိတွေၑွရံ ဓနျမဗြုဝန်၊
१२मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
13 တဒနန္တရံ ယီၑုသ္တတ္သ္ထာနာတ် ပုနး သမုဒြတဋံ ယယော်; လောကနိဝဟေ တတ္သမီပမာဂတေ သ တာန် သမုပဒိဒေၑ၊
१३येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिक्षण दिले.
14 အထ ဂစ္ဆန် ကရသဉ္စယဂၖဟ ဥပဝိၐ္ဋမ် အာလ္ဖီယပုတြံ လေဝိံ ဒၖၐ္ဋွာ တမာဟူယ ကထိတဝါန် မတ္ပၑ္စာတ် တွာမာမစ္ဆ တတး သ ဥတ္ထာယ တတ္ပၑ္စာဒ် ယယော်၊
१४नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला.
15 အနန္တရံ ယီၑော် တသျ ဂၖဟေ ဘောက္တုမ် ဥပဝိၐ္ဋေ ဗဟဝး ကရမဉ္စာယိနး ပါပိနၑ္စ တေန တစ္ဆိၐျဲၑ္စ သဟောပဝိဝိၑုး, ယတော ဗဟဝသ္တတ္ပၑ္စာဒါဇဂ္မုး၊
१५नंतर असे झाले की येशू लेवीच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते.
16 တဒါ သ ကရမဉ္စာယိဘိး ပါပိဘိၑ္စ သဟ ခါဒတိ, တဒ် ဒၖၐ္ဋွာဓျာပကား ဖိရူၑိနၑ္စ တသျ ၑိၐျာနူစုး ကရမဉ္စာယိဘိး ပါပိဘိၑ္စ သဟာယံ ကုတော ဘုံက္တေ ပိဝတိ စ?
१६तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांना म्हणाले, “हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवतो?”
17 တဒွါကျံ ၑြုတွာ ယီၑုး ပြတျုဝါစ, အရောဂိလောကာနာံ စိကိတ္သကေန ပြယောဇနံ နာသ္တိ, ကိန္တု ရောဂိဏာမေဝ; အဟံ ဓာရ္မ္မိကာနာဟွာတုံ နာဂတး ကိန္တု မနော ဝျာဝရ္တ္တယိတုံ ပါပိန ဧဝ၊
१७हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकांस नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे.”
18 တတး ပရံ ယောဟနး ဖိရူၑိနာဉ္စောပဝါသာစာရိၑိၐျာ ယီၑေား သမီပမ် အာဂတျ ကထယာမာသုး, ယောဟနး ဖိရူၑိနာဉ္စ ၑိၐျာ ဥပဝသန္တိ ကိန္တု ဘဝတး ၑိၐျာ နောပဝသန္တိ ကိံ ကာရဏမသျ?
१८जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपवास करीत होते तेव्हा काहीजण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?”
19 တဒါ ယီၑုသ္တာန် ဗဘာၐေ ယာဝတ် ကာလံ သခိဘိး သဟ ကနျာယာ ဝရသ္တိၐ္ဌတိ တာဝတ္ကာလံ တေ ကိမုပဝသ္တုံ ၑက္နုဝန္တိ? ယာဝတ္ကာလံ ဝရသ္တဲး သဟ တိၐ္ဌတိ တာဝတ္ကာလံ တ ဥပဝသ္တုံ န ၑက္နုဝန္တိ၊
१९येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणे त्यांना शक्य आहे काय? वर बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही.
20 ယသ္မိန် ကာလေ တေဘျး သကာၑာဒ် ဝရော နေၐျတေ သ ကာလ အာဂစ္ဆတိ, တသ္မိန် ကာလေ တေ ဇနာ ဥပဝတ္သျန္တိ၊
२०परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवसांत उपवास करतील.
21 ကောပိ ဇနး ပုရာတနဝသ္တြေ နူတနဝသ္တြံ န သီဝျတိ, ယတော နူတနဝသ္တြေဏ သဟ သေဝနေ ကၖတေ ဇီရ္ဏံ ဝသ္တြံ ဆိဒျတေ တသ္မာတ် ပုန ရ္မဟတ် ဆိဒြံ ဇာယတေ၊
२१कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड जुन्या कापडाला फाडील व छिद्र मोठे होईल.
22 ကောပိ ဇနး ပုရာတနကုတူၐု နူတနံ ဒြာက္ၐာရသံ န သ္ထာပယတိ, ယတော နူတနဒြာက္ၐာရသသျ တေဇသာ တား ကုတွော ဝိဒီရျျန္တေ တတော ဒြာက္ၐာရသၑ္စ ပတတိ ကုတွၑ္စ နၑျန္တိ, အတဧဝ နူတနဒြာက္ၐာရသော နူတနကုတူၐု သ္ထာပနီယး၊
२२तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात.”
23 တဒနန္တရံ ယီၑု ရျဒါ ဝိၑြာမဝါရေ ၑသျက္ၐေတြေဏ ဂစ္ဆတိ တဒါ တသျ ၑိၐျာ ဂစ္ဆန္တး ၑသျမဉ္ဇရီၑ္ဆေတ္တုံ ပြဝၖတ္တား၊
२३नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, त्याचे शिष्य कणसे मोडू लागले.
24 အတး ဖိရူၑိနော ယီၑဝေ ကထယာမာသုး ပၑျတု ဝိၑြာမဝါသရေ ယတ် ကရ္မ္မ န ကရ္တ္တဝျံ တဒ် ဣမေ ကုတး ကုရွွန္တိ?
२४तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”
25 တဒါ သ တေဘျော'ကထယတ် ဒါယူဒ် တတ္သံင်္ဂိနၑ္စ ဘက္ၐျာဘာဝါတ် က္ၐုဓိတား သန္တော ယတ် ကရ္မ္မ ကၖတဝန္တသ္တတ် ကိံ ယုၐ္မာဘိ ရ္န ပဌိတမ်?
२५येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय?
26 အဗိယာထရ္နာမကေ မဟာယာဇကတာံ ကုရွွတိ သ ကထမီၑွရသျာဝါသံ ပြဝိၑျ ယေ ဒရ္ၑနီယပူပါ ယာဇကာန် ဝိနာနျသျ ကသျာပိ န ဘက္ၐျာသ္တာနေဝ ဗုဘုဇေ သင်္ဂိလောကေဘျော'ပိ ဒဒေါ်၊
२६अब्याथार महायाजक असताना, तो देवाच्या भवनात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?”
27 သော'ပရမပိ ဇဂါဒ, ဝိၑြာမဝါရော မနုၐျာရ္ထမေဝ နိရူပိတော'သ္တိ ကိန္တု မနုၐျော ဝိၑြာမဝါရာရ္ထံ နဲဝ၊
२७तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही.
28 မနုၐျပုတြော ဝိၑြာမဝါရသျာပိ ပြဘုရာသ္တေ၊
२८म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा देखील प्रभू आहे.”