< လူကး 5 >
1 အနန္တရံ ယီၑုရေကဒါ ဂိနေၐရထ္ဒသျ တီရ ဥတ္တိၐ္ဌတိ, တဒါ လောကာ ဤၑွရီယကထာံ ၑြောတုံ တဒုပရိ ပြပတိတား၊
१मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले,
2 တဒါနီံ သ ဟ္ဒသျ တီရသမီပေ နော်ဒွယံ ဒဒရ္ၑ ကိဉ္စ မတ္သျောပဇီဝိနော နာဝံ ဝိဟာယ ဇာလံ ပြက္ၐာလယန္တိ၊
२तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते.
3 တတသ္တယောရ္ဒွယော ရ္မဓျေ ၑိမောနော နာဝမာရုဟျ တီရာတ် ကိဉ္စိဒ္ဒူရံ ယာတုံ တသ္မိန် ဝိနယံ ကၖတွာ နော်ကာယာမုပဝိၑျ လောကာန် ပြောပဒိၐ္ဋဝါန်၊
३त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला.
4 ပၑ္စာတ် တံ ပြသ္တာဝံ သမာပျ သ ၑိမောနံ ဝျာဇဟာရ, ဂဘီရံ ဇလံ ဂတွာ မတ္သျာန် ဓရ္တ္တုံ ဇာလံ နိက္ၐိပ၊
४त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, “होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”
5 တတး ၑိမောန ဗဘာၐေ, ဟေ ဂုရော ယဒျပိ ဝယံ ကၖတ္သ္နာံ ယာမိနီံ ပရိၑြမျ မတ္သျဲကမပိ န ပြာပ္တာသ္တထာပိ ဘဝတော နိဒေၑတော ဇာလံ က္ၐိပါမး၊
५शिमोनाने उत्तर दिले, “साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो.”
6 အထ ဇာလေ က္ၐိပ္တေ ဗဟုမတ္သျပတနာဒ် အာနာယး ပြစ္ဆိန္နး၊
६मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली
7 တသ္မာဒ် ဥပကရ္တ္တုမ် အနျနော်သ္ထာန် သင်္ဂိန အာယာတုမ် ဣင်္ဂိတေန သမာဟွယန် တတသ္တ အာဂတျ မတ္သျဲ ရ္နော်ဒွယံ ပြပူရယာမာသု ရျဲ ရ္နော်ဒွယံ ပြမဂ္နမ်၊
७तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या.
8 တဒါ ၑိမောန္ပိတရသ္တဒ် ဝိလောကျ ယီၑောၑ္စရဏယေား ပတိတွာ, ဟေ ပြဘောဟံ ပါပီ နရော မမ နိကဋာဒ် ဘဝါန် ယာတု, ဣတိ ကထိတဝါန်၊
८हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.”
9 ယတော ဇာလေ ပတိတာနာံ မတ္သျာနာံ ယူထာတ် ၑိမောန် တတ္သင်္ဂိနၑ္စ စမတ္ကၖတဝန္တး; ၑိမောနး သဟကာရိဏော် သိဝဒေး ပုတြော် ယာကူဗ် ယောဟန် စေမော် တာဒၖၑော် ဗဘူဝတုး၊
९कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.
10 တဒါ ယီၑုး ၑိမောနံ ဇဂါဒ မာ ဘဲၐီရဒျာရဘျ တွံ မနုၐျဓရော ဘဝိၐျသိ၊
१०तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”
11 အနန္တရံ သရွွာသု နော်သု တီရမ် အာနီတာသု တေ သရွွာန် ပရိတျဇျ တသျ ပၑ္စာဒ္ဂါမိနော ဗဘူဝုး၊
११मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
12 တတး ပရံ ယီၑော် ကသ္မိံၑ္စိတ် ပုရေ တိၐ္ဌတိ ဇန ဧကး သရွွာင်္ဂကုၐ္ဌသ္တံ ဝိလောကျ တသျ သမီပေ နျုဗ္ဇး ပတိတွာ သဝိနယံ ဝက္တုမာရေဘေ, ဟေ ပြဘော ယဒိ ဘဝါနိစ္ဆတိ တရှိ မာံ ပရိၐ္ကရ္တ္တုံ ၑက္နောတိ၊
१२आणि असे झाले की, येशू कोणाएका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालथा पडला आणि त्यास विनंती केली, “प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
13 တဒါနီံ သ ပါဏိံ ပြသာရျျ တဒင်္ဂံ သ္ပၖၑန် ဗဘာၐေ တွံ ပရိၐ္ကြိယသွေတိ မမေစ္ဆာသ္တိ တတသ္တတ္က္ၐဏံ သ ကုၐ္ဌာတ် မုက္တး၊
१३तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्यास स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे शुद्ध हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.
14 ပၑ္စာတ် သ တမာဇ္ဉာပယာမာသ ကထာမိမာံ ကသ္မဲစိဒ် အကထယိတွာ ယာဇကသျ သမီပဉ္စ ဂတွာ သွံ ဒရ္ၑယ, လောကေဘျော နိဇပရိၐ္ကၖတတွသျ ပြမာဏဒါနာယ မူသာဇ္ဉာနုသာရေဏ ဒြဝျမုတ္မၖဇသွ စ၊
१४मग येशूने त्यास निक्षून सांगितले की, “कोणालाही सांगू नकोस, पण जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”
15 တထာပိ ယီၑေား သုချာတိ ရ္ဗဟု ဝျာပ္တုမာရေဘေ ကိဉ္စ တသျ ကထာံ ၑြောတုံ သွီယရောဂေဘျော မောက္တုဉ္စ လောကာ အာဇဂ္မုး၊
१५परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व आपल्या रोगांपासून बरे होण्यासाठी जमू लागले.
16 အထ သ ပြာန္တရံ ဂတွာ ပြာရ္ထယာဉ္စကြေ၊
१६परंतु येशू रानांमध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करीत असे.
17 အပရဉ္စ ဧကဒါ ယီၑုရုပဒိၑတိ, ဧတရှိ ဂါလီလျိဟူဒါပြဒေၑယေား သရွွနဂရေဘျော ယိရူၑာလမၑ္စ ကိယန္တး ဖိရူၑိလောကာ ဝျဝသ္ထာပကာၑ္စ သမာဂတျ တဒန္တိကေ သမုပဝိဝိၑုး, တသ္မိန် ကာလေ လောကာနာမာရောဂျကာရဏာတ် ပြဘေား ပြဘာဝး ပြစကာၑေ၊
१७असे झाले की, एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते ते गालील आणि यहूदीया प्रांत व यरूशलेम शहर या भागातील कित्येक ठिकाणाहून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याठायी होते त्यामुळे तो रोग बरे करत असे.
18 ပၑ္စာတ် ကိယန္တော လောကာ ဧကံ ပက္ၐာဃာတိနံ ခဋွာယာံ နိဓာယ ယီၑေား သမီပမာနေတုံ သမ္မုခေ သ္ထာပယိတုဉ္စ ဝျာပြိယန္တ၊
१८काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्यास बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्यास आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.
19 ကိန္တု ဗဟုဇနနိဝဟသမွာဓာတ် န ၑက္နုဝန္တော ဂၖဟောပရိ ဂတွာ ဂၖဟပၖၐ္ဌံ ခနိတွာ တံ ပက္ၐာဃာတိနံ သခဋွံ ဂၖဟမဓျေ ယီၑေား သမ္မုခေ 'ဝရောဟယာမာသုး၊
१९परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना, म्हणून त्यांनी घराच्या छतावर चढून त्यास बाजे सकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले.
20 တဒါ ယီၑုသ္တေၐာမ် ဤဒၖၑံ ဝိၑွာသံ ဝိလောကျ တံ ပက္ၐာဃာတိနံ ဝျာဇဟာရ, ဟေ မာနဝ တဝ ပါပမက္ၐမျတ၊
२०त्यांचा विश्वास पाहून, येशू म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहेत.”
21 တသ္မာဒ် အဓျာပကား ဖိရူၑိနၑ္စ စိတ္တဲရိတ္ထံ ပြစိန္တိတဝန္တး, ဧၐ ဇန ဤၑွရံ နိန္ဒတိ ကောယံ? ကေဝလမီၑွရံ ဝိနာ ပါပံ က္ၐန္တုံ ကး ၑက္နောတိ?
२१नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी स्वतःशी विचार करू लागले, “हा दुर्भाषण करणारा कोण? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”
22 တဒါ ယီၑုသ္တေၐာမ် ဣတ္ထံ စိန္တနံ ဝိဒိတွာ တေဘျောကထယဒ် ယူယံ မနောဘိး ကုတော ဝိတရ္ကယထ?
२२पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता?
23 တဝ ပါပက္ၐမာ ဇာတာ ယဒွါ တွမုတ္ထာယ ဝြဇ ဧတယော ရ္မဓျေ ကာ ကထာ သုကထျာ?
२३तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा ऊठ आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे?
24 ကိန္တု ပၖထိဝျာံ ပါပံ က္ၐန္တုံ မာနဝသုတသျ သာမရ္ထျမသ္တီတိ ယထာ ယူယံ ဇ္ဉာတုံ ၑက္နုထ တဒရ္ထံ (သ တံ ပက္ၐာဃာတိနံ ဇဂါဒ) ဥတ္တိၐ္ဌ သွၑယျာံ ဂၖဟီတွာ ဂၖဟံ ယာဟီတိ တွာမာဒိၑာမိ၊
२४पण तुम्हास हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, म्हणून तो पक्षघात झालेल्या मनुष्यास म्हणाला, मी तुला सांगतो ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.”
25 တသ္မာတ် သ တတ္က္ၐဏမ် ဥတ္ထာယ သရွွေၐာံ သာက္ၐာတ် နိဇၑယနီယံ ဂၖဟီတွာ ဤၑွရံ ဓနျံ ဝဒန် နိဇနိဝေၑနံ ယယော်၊
२५ताबडतोब तो उभा राहिला व ज्या बाजेवर तो झोपला होता ती उचलून घेऊन देवाचे गौरव करीत आपल्या घरी गेला.
26 တသ္မာတ် သရွွေ ဝိသ္မယ ပြာပ္တာ မနးသု ဘီတာၑ္စ ဝယမဒျာသမ္ဘဝကာရျျာဏျဒရ္ၑာမ ဣတျုက္တွာ ပရမေၑွရံ ဓနျံ ပြောဒိတား၊
२६ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि देवाची स्तुती करू लागले, ते फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.
27 တတး ပရံ ဗဟိရ္ဂစ္ဆန် ကရသဉ္စယသ္ထာနေ လေဝိနာမာနံ ကရသဉ္စာယကံ ဒၖၐ္ဋွာ ယီၑုသ္တမဘိဒဓေ မမ ပၑ္စာဒေဟိ၊
२७या गोष्टी झाल्यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये!”
28 တသ္မာတ် သ တတ္က္ၐဏာတ် သရွွံ ပရိတျဇျ တသျ ပၑ္စာဒိယာယ၊
२८तेव्हा लेवीने सर्वकाही तेथेच सोडले आणि उठून त्याच्यामागे गेला.
29 အနန္တရံ လေဝိ ရ္နိဇဂၖဟေ တဒရ္ထံ မဟာဘောဇျံ စကာရ, တဒါ တဲး သဟာနေကေ ကရသဉ္စာယိနသ္တဒနျလောကာၑ္စ ဘောက္တုမုပဝိဝိၑုး၊
२९नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली आणि जकातदारांचा व इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता.
30 တသ္မာတ် ကာရဏာတ် စဏ္ဍာလာနာံ ပါပိလောကာနာဉ္စ သင်္ဂေ ယူယံ ကုတော ဘံဂ္ဓွေ ပိဝထ စေတိ ကထာံ ကထယိတွာ ဖိရူၑိနော'ဓျာပကာၑ္စ တသျ ၑိၐျဲး သဟ ဝါဂျုဒ္ဓံ ကရ္တ္တုမာရေဘိရေ၊
३०परंतु परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली, ते म्हणाले, तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता?
31 တသ္မာဒ် ယီၑုသ္တာန် ပြတျဝေါစဒ် အရောဂလောကာနာံ စိကိတ္သကေန ပြယောဇနံ နာသ္တိ ကိန္တု သရောဂါဏာမေဝ၊
३१येशू त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत, त्यांना वैद्याची गरज आहे.
32 အဟံ ဓာရ္မ္မိကာန် အာဟွာတုံ နာဂတောသ္မိ ကိန္တု မနး ပရာဝရ္တ္တယိတုံ ပါပိန ဧဝ၊
३२मी नीतिमानास बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
33 တတသ္တေ ပြောစုး, ယောဟနး ဖိရူၑိနာဉ္စ ၑိၐျာ ဝါရံဝါရမ် ဥပဝသန္တိ ပြာရ္ထယန္တေ စ ကိန္တု တဝ ၑိၐျား ကုတော ဘုဉ္ဇတေ ပိဝန္တိ စ?
३३ते त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपवास आणि प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य तर खातपीत असतात.
34 တဒါ သ တာနာစချော် ဝရေ သင်္ဂေ တိၐ္ဌတိ ဝရသျ သခိဂဏံ ကိမုပဝါသယိတုံ ၑက္နုထ?
३४येशू त्यांना म्हणाला, “कोण असे करेल? वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय?
35 ကိန္တု ယဒါ တေၐာံ နိကဋာဒ် ဝရော နေၐျတေ တဒါ တေ သမုပဝတ္သျန္တိ၊
३५पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसात ते उपवास करतील.”
36 သောပရမပိ ဒၖၐ္ဋာန္တံ ကထယာမ္ဗဘူဝ ပုရာတနဝသ္တြေ ကောပိ နုတနဝသ္တြံ န သီဝျတိ ယတသ္တေန သေဝနေန ဇီရ္ဏဝသ္တြံ ဆိဒျတေ, နူတနပုရာတနဝသ္တြယော ရ္မေလဉ္စ န ဘဝတိ၊
३६त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही.
37 ပုရာတနျာံ ကုတွာံ ကောပိ နုတနံ ဒြာက္ၐာရသံ န နိဒဓာတိ, ယတော နဝီနဒြာက္ၐာရသသျ တေဇသာ ပုရာတနီ ကုတူ ရွိဒီရျျတေ တတော ဒြာက္ၐာရသး ပတတိ ကုတူၑ္စ နၑျတိ၊
३७आणि कोणीही नवा द्राक्षरस जुन्या द्राक्षरसाच्या कातडी पिशवीत ठेवत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षरस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल.
38 တတော ဟေတော ရ္နူတနျာံ ကုတွာံ နဝီနဒြာက္ၐာရသး နိဓာတဝျသ္တေနောဘယသျ ရက္ၐာ ဘဝတိ၊
३८नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे.
39 အပရဉ္စ ပုရာတနံ ဒြာက္ၐာရသံ ပီတွာ ကောပိ နူတနံ န ဝါဉ္ဆတိ, ယတး သ ဝက္တိ နူတနာတ် ပုရာတနမ် ပြၑသ္တမ်၊
३९कोणालाही जुना द्राक्षरस प्याल्यानंतर त्यांना नवा नको असतो कारण तो म्हणतो, जुना द्राक्षरसच चांगला आहे.”