< လူကး 2 >

1 အပရဉ္စ တသ္မိန် ကာလေ ရာဇျသျ သရွွေၐာံ လောကာနာံ နာမာနိ လေခယိတုမ် အဂသ္တကဲသရ အာဇ္ဉာပယာမာသ၊
त्या दिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की, सर्व जगाची नावनोंदणी लिहिली जावी.
2 တဒနုသာရေဏ ကုရီဏိယနာမနိ သုရိယာဒေၑသျ ၑာသကေ သတိ နာမလေခနံ ပြာရေဘေ၊
ही पहिली नावनोंदणी होती जेव्हा क्वीरीनिय हा सिरीया प्रांताचा राज्यपाल होता.
3 အတော ဟေတော ရ္နာမ လေခိတုံ သရွွေ ဇနား သွီယံ သွီယံ နဂရံ ဇဂ္မုး၊
प्रत्येकजण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गांवी गेले.
4 တဒါနီံ ယူၐဖ် နာမ လေခိတုံ ဝါဂ္ဒတ္တယာ သွဘာရျျယာ ဂရ္ဗ္ဘဝတျာ မရိယမာ သဟ သွယံ ဒါယူဒး သဇာတိဝံၑ ဣတိ ကာရဏာဒ် ဂါလီလ္ပြဒေၑသျ နာသရတ္နဂရာဒ္
मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता.
5 ယိဟူဒါပြဒေၑသျ ဗဲတ္လေဟမာချံ ဒါယူဒ္နဂရံ ဇဂါမ၊
व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले.
6 အနျစ္စ တတြ သ္ထာနေ တယောသ္တိၐ္ဌတေား သတော ရ္မရိယမး ပြသူတိကာလ ဥပသ္ထိတေ
आणि असे झाले, ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन,
7 သာ တံ ပြထမသုတံ ပြာသောၐ္ဋ ကိန္တု တသ္မိန် ဝါသဂၖဟေ သ္ထာနာဘာဝါဒ် ဗာလကံ ဝသ္တြေဏ ဝေၐ္ဋယိတွာ ဂေါၑာလာယာံ သ္ထာပယာမာသ၊
तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
8 အနန္တရံ ယေ ကိယန္တော မေၐပါလကား သွမေၐဝြဇရက္ၐာယဲ တတ္ပြဒေၑေ သ္ထိတွာ ရဇနျာံ ပြာန္တရေ ပြဟရိဏး ကရ္မ္မ ကုရွွန္တိ,
त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते.
9 တေၐာံ သမီပံ ပရမေၑွရသျ ဒူတ အာဂတျောပတသ္ထော်; တဒါ စတုၐ္ပာရ္ၑွေ ပရမေၑွရသျ တေဇသး ပြကာၑိတတွာတ် တေ'တိၑၑင်္ကိရေ၊
अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले.
10 တဒါ သ ဒူတ ဥဝါစ မာ ဘဲၐ္ဋ ပၑျတာဒျ ဒါယူဒး ပုရေ ယုၐ္မန္နိမိတ္တံ တြာတာ ပြဘုး ခြီၐ္ဋော'ဇနိၐ္ဋ,
१०देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो.
11 သရွွေၐာံ လောကာနာံ မဟာနန္ဒဇနကမ် ဣမံ မင်္ဂလဝၖတ္တာန္တံ ယုၐ္မာန် ဇ္ဉာပယာမိ၊
११दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे.
12 ယူယံ (တတ္သ္ထာနံ ဂတွာ) ဝသ္တြဝေၐ္ဋိတံ တံ ဗာလကံ ဂေါၑာလာယာံ ၑယနံ ဒြက္ၐျထ ယုၐ္မာန် ပြတီဒံ စိဟ္နံ ဘဝိၐျတိ၊
१२तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल.
13 ဒူတ ဣမာံ ကထာံ ကထိတဝတိ တတြာကသ္မာတ် သွရ္ဂီယား ပၖတနာ အာဂတျ ကထာမ် ဣမာံ ကထယိတွေၑွရသျ ဂုဏာနနွဝါဒိၐုး, ယထာ,
१३मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले,
14 သရွွောရ္ဒွွသ္ထဲရီၑွရသျ မဟိမာ သမ္ပြကာၑျတာံ၊ ၑာန္တိရ္ဘူယာတ် ပၖထိဝျာသ္တု သန္တောၐၑ္စ နရာန် ပြတိ။
१४“परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.”
15 တတး ပရံ တေၐာံ သန္နိဓေ ရ္ဒူတဂဏေ သွရ္ဂံ ဂတေ မေၐပါလကား ပရသ္ပရမ် အဝေစန် အာဂစ္ဆတ ပြဘုး ပရမေၑွရော ယာံ ဃဋနာံ ဇ္ဉာပိတဝါန် တသျာ ယာထရျံ ဇ္ဉာတုံ ဝယမဓုနာ ဗဲတ္လေဟမ္ပုရံ ယာမး၊
१५मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट परमेश्वराने आम्हास कळवली ती बघू या.
16 ပၑ္စာတ် တေ တူရ္ဏံ ဝြဇိတွာ မရိယမံ ယူၐဖံ ဂေါၑာလာယာံ ၑယနံ ဗာလကဉ္စ ဒဒၖၑုး၊
१६तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले.
17 ဣတ္ထံ ဒၖၐ္ဋွာ ဗာလကသျာရ္ထေ ပြောက္တာံ သရွွကထာံ တေ ပြာစာရယာဉ္စကြုး၊
१७जेव्हा मेंढपाळांनी त्यास पाहिले तेव्हा त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते त्यांनी सर्वांना जाहीर केले.
18 တတော ယေ လောကာ မေၐရက္ၐကာဏာံ ဝဒနေဘျသ္တာံ ဝါရ္တ္တာံ ၑုၑြုဝုသ္တေ မဟာၑ္စရျျံ မေနိရေ၊
१८मग ऐकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले.
19 ကိန္တု မရိယမ် ဧတတ္သရွွဃဋနာနာံ တာတ္ပရျျံ ဝိဝိစျ မနသိ သ္ထာပယာမာသ၊
१९परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.
20 တတ္ပၑ္စာဒ် ဒူတဝိဇ္ဉပ္တာနုရူပံ ၑြုတွာ ဒၖၐ္ဋွာ စ မေၐပါလကာ ဤၑွရသျ ဂုဏာနုဝါဒံ ဓနျဝါဒဉ္စ ကုရွွာဏား ပရာဝၖတျ ယယုး၊
२०नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले.
21 အထ ဗာလကသျ တွက္ဆေဒနကာလေ'ၐ္ဋမဒိဝသေ သမုပသ္ထိတေ တသျ ဂရ္ဗ္ဘသ္ထိတေး ပုရွွံ သွရ္ဂီယဒူတော ယထာဇ္ဉာပယတ် တဒနုရူပံ တေ တန္နာမဓေယံ ယီၑုရိတိ စကြိရေ၊
२१आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते.
22 တတး ပရံ မူသာလိခိတဝျဝသ္ထာယာ အနုသာရေဏ မရိယမး ၑုစိတွကာလ ဥပသ္ထိတေ,
२२पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरूशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे.
23 "ပြထမဇး သရွွး ပုရုၐသန္တာနး ပရမေၑွရေ သမရ္ပျတာံ," ဣတိ ပရမေၑွရသျ ဝျဝသ္ထယာ
२३म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे.
24 ယီၑုံ ပရမေၑွရေ သမရ္ပယိတုမ် ၑာသ္တြီယဝိဓျုက္တံ ကပေါတဒွယံ ပါရာဝတၑာဝကဒွယံ ဝါ ဗလိံ ဒါတုံ တေ တံ ဂၖဟီတွာ ယိရူၑာလမမ် အာယယုး၊
२४आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा कबुतरांची दोन पिल्ले यांचा यज्ञ अर्पावा म्हणून त्यांनी त्यास तेथे आणले.
25 ယိရူၑာလမ္ပုရနိဝါသီ ၑိမိယောန္နာမာ ဓာရ္မ္မိက ဧက အာသီတ် သ ဣသြာယေလး သာန္တွနာမပေက္ၐျ တသ္ထော် ကိဉ္စ ပဝိတြ အာတ္မာ တသ္မိန္နာဝိရ္ဘူတး၊
२५तेव्हा पाहा, यरूशलेम त शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य होता. तो मनुष्य नीतिमान व भक्तिमान होता. तो इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता.
26 အပရံ ပြဘုဏာ ပရမေၑွရေဏာဘိၐိက္တေ တြာတရိ တွယာ န ဒၖၐ္ဋေ တွံ န မရိၐျသီတိ ဝါကျံ ပဝိတြေဏ အာတ္မနာ တသ္မ ပြာကထျတ၊
२६आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही असे पवित्र आत्म्याने त्यास प्रकट केले होते.
27 အပရဉ္စ ယဒါ ယီၑေား ပိတာ မာတာ စ တဒရ္ထံ ဝျဝသ္ထာနုရူပံ ကရ္မ္မ ကရ္တ္တုံ တံ မန္ဒိရမ် အာနိနျတုသ္တဒါ
२७आणि तो आत्म्यांत असता परमेश्वराच्या भवनात आला आणि जेव्हा आईवडीलांनी येशू बाळाला, त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरीता, आत आणले,
28 ၑိမိယောန် အာတ္မန အာကရ္ၐဏေန မန္ဒိရမာဂတျ တံ ကြောဍေ နိဓာယ ဤၑွရသျ ဓနျဝါဒံ ကၖတွာ ကထယာမာသ, ယထာ,
२८तेव्हा शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले आणि त्याने देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले,
29 ဟေ ပြဘော တဝ ဒါသောယံ နိဇဝါကျာနုသာရတး၊ ဣဒါနီန္တု သကလျာဏော ဘဝတာ သံဝိသၖဇျတာမ်၊
२९“हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासास शांतीने जाऊ देत आहेस.
30 ယတး သကလဒေၑသျ ဒီပ္တယေ ဒီပ္တိရူပကံ၊
३०कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,
31 ဣသြာယေလီယလောကသျ မဟာဂေါ်ရဝရူပကံ၊
३१ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले.
32 ယံ တြာယကံ ဇနာနာန္တု သမ္မုခေ တွမဇီဇနး၊ သဧဝ ဝိဒျတေ'သ္မာကံ ဓြဝံ နယနနဂေါစရေ။
३२ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”
33 တဒါနီံ တေနောက္တာ ဧတား သကလား ကထား ၑြုတွာ တသျ မာတာ ယူၐဖ် စ ဝိသ္မယံ မေနာတေ၊
३३त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले.
34 တတး ပရံ ၑိမိယောန် တေဘျ အာၑိၐံ ဒတ္တွာ တန္မာတရံ မရိယမမ် ဥဝါစ, ပၑျ ဣသြာယေလော ဝံၑမဓျေ ဗဟူနာံ ပါတနာယောတ္ထာပနာယ စ တထာ ဝိရောဓပါတြံ ဘဝိတုံ, ဗဟူနာံ ဂုပ္တမနောဂတာနာံ ပြကဋီကရဏာယ ဗာလကောယံ နိယုက္တောသ္တိ၊
३४आणि शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, पाहा, इस्राएलातील अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे यासाठी आणि ज्याविरूद्ध बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे.
35 တသ္မာတ် တဝါပိ ပြာဏား ၑူလေန ဝျတ္သျန္တေ၊
३५यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जिवांतून तलवार भोसकून जाईल.
36 အပရဉ္စ အာၑေရသျ ဝံၑီယဖိနူယေလော ဒုဟိတာ ဟန္နာချာ အတိဇရတီ ဘဝိၐျဒွါဒိနျေကာ ယာ ဝိဝါဟာတ် ပရံ သပ္တ ဝတ္သရာန် ပတျာ သဟ နျဝသတ် တတော ဝိဓဝါ ဘူတွာ စတုရၑီတိဝရ္ၐဝယးပရျျနတံ
३६तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली.
37 မန္ဒိရေ သ္ထိတွာ ပြာရ္ထနောပဝါသဲရ္ဒိဝါနိၑမ် ဤၑွရမ် အသေဝတ သာပိ သ္တြီ တသ္မိန် သမယေ မန္ဒိရမာဂတျ
३७ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे.
38 ပရမေၑွရသျ ဓနျဝါဒံ စကာရ, ယိရူၑာလမ္ပုရဝါသိနော ယာဝန္တော လောကာ မုက္တိမပေက္ၐျ သ္ထိတာသ္တာန် ယီၑောရွၖတ္တာန္တံ ဇ္ဉာပယာမာသ၊
३८तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरूशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
39 ဣတ္ထံ ပရမေၑွရသျ ဝျဝသ္ထာနုသာရေဏ သရွွေၐု ကရ္မ္မသု ကၖတေၐု တော် ပုနၑ္စ ဂါလီလော နာသရတ္နာမကံ နိဇနဂရံ ပြတသ္ထာတေ၊
३९जेव्हा त्यांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पूर्ण केल्यावर, ते गालील प्रांतातील आपले गाव नासरेथ येथे परत गेले.
40 တတ္ပၑ္စာဒ် ဗာလကး ၑရီရေဏ ဝၖဒ္ဓိမေတျ ဇ္ဉာနေန ပရိပူရ္ဏ အာတ္မနာ ၑက္တိမာံၑ္စ ဘဝိတုမာရေဘေ တထာ တသ္မိန် ဤၑွရာနုဂြဟော ဗဘူဝ၊
४०बालक मोठा होत गेला आणि बलवान झाला व ज्ञानातही वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.
41 တသျ ပိတာ မာတာ စ ပြတိဝရ္ၐံ နိသ္တာရောတ္သဝသမယေ ယိရူၑာလမမ် အဂစ္ဆတာမ်၊
४१प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरूशलेम शहरास जात.
42 အပရဉ္စ ယီၑော် ဒွါဒၑဝရ္ၐဝယသ္ကေ သတိ တော် ပရွွသမယသျ ရီတျနုသာရေဏ ယိရူၑာလမံ ဂတွာ
४२जेव्हा तो बारा वर्षांचा झाला, ते सणाच्या रीतीप्रमाणे वर यरूशलेम शहरास गेले.
43 ပါရွွဏံ သမ္ပာဒျ ပုနရပိ ဝျာဃုယျ ယာတး ကိန္တု ယီၑုရ္ဗာလကော ယိရူၑာလမိ တိၐ္ဌတိ၊ ယူၐဖ် တန္မာတာ စ တဒ် အဝိဒိတွာ
४३मग सणाचे पूर्ण दिवस तेथे घालविल्या नंतर ते घराकडे परत येण्यास निघाले. परंतु मुलगा येशू मात्र यरूशलेमेतच मागे राहिला आणि हे त्याच्या आई-वडीलांना माहीत नव्हते.
44 သ သင်္ဂိဘိး သဟ ဝိဒျတ ဧတစ္စ ဗုဒွွာ ဒိနဲကဂမျမာရ္ဂံ ဇဂ္မတုး၊ ကိန္တု ၑေၐေ ဇ္ဉာတိဗန္ဓူနာံ သမီပေ မၖဂယိတွာ တဒုဒ္ဒေၑမပြာပျ
४४तो बरोबर प्रवास करणाऱ्या घोळक्या सोबत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर त्यांनी नातलग व मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
45 တော် ပုနရပိ ယိရူၑာလမမ် ပရာဝၖတျာဂတျ တံ မၖဂယာဉ္စကြတုး၊
४५जेव्हा तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते यरूशलेम शहरास परत आले आणि तेथे त्यांनी त्याचा शोध घेतला.
46 အထ ဒိနတြယာတ် ပရံ ပဏ္ဍိတာနာံ မဓျေ တေၐာံ ကထား ၑၖဏွန် တတ္တွံ ပၖစ္ဆံၑ္စ မန္ဒိရေ သမုပဝိၐ္ဋး သ တာဘျာံ ဒၖၐ္ဋး၊
४६असे घडले की, तीन दिवसानंतर तो त्यांना परमेश्वराच्या भवनात सापडला, तो शिक्षकांमध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता.
47 တဒါ တသျ ဗုဒ္ဓျာ ပြတျုတ္တရဲၑ္စ သရွွေ ၑြောတာရော ဝိသ္မယမာပဒျန္တေ၊
४७ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले.
48 တာဒၖၑံ ဒၖၐ္ဋွာ တသျ ဇနကော ဇနနီ စ စမစ္စကြတုး ကိဉ္စ တသျ မာတာ တမဝဒတ်, ဟေ ပုတြ, ကထမာဝါံ ပြတီတ္ထံ သမာစရသ္တွမ်? ပၑျ တဝ ပိတာဟဉ္စ ၑောကာကုလော် သန္တော် တွာမနွိစ္ဆာဝး သ္မ၊
४८जेव्हा त्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्यास म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का वागलास? ऐक, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.”
49 တတး သောဝဒတ် ကုတော မာမ် အနွဲစ္ဆတံ? ပိတုရ္ဂၖဟေ မယာ သ္ထာတဝျမ် ဧတတ် ကိံ ယုဝါဘျာံ န ဇ္ဉာယတေ?
४९येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का करीत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुम्हास माहीत नव्हते काय?”
50 ကိန္တု တော် တသျဲတဒွါကျသျ တာတ္ပရျျံ ဗောဒ္ဓုံ နာၑက္နုတာံ၊
५०परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही.
51 တတး ပရံ သ တာဘျာံ သဟ နာသရတံ ဂတွာ တယောရွၑီဘူတသ္တသ္ထော် ကိန္တု သရွွာ ဧတား ကထာသ္တသျ မာတာ မနသိ သ္ထာပယာမာသ၊
५१मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या.
52 အထ ယီၑော ရ္ဗုဒ္ဓိး ၑရီရဉ္စ တထာ တသ္မိန် ဤၑွရသျ မာနဝါနာဉ္စာနုဂြဟော ဝရ္ဒ္ဓိတုမ် အာရေဘေ၊
५२येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.

< လူကး 2 >