< လူကး 13 >
1 အပရဉ္စ ပီလာတော ယေၐာံ ဂါလီလီယာနာံ ရက္တာနိ ဗလီနာံ ရက္တဲး သဟာမိၑြယတ် တေၐာံ ဂါလီလီယာနာံ ဝၖတ္တာန္တံ ကတိပယဇနာ ဥပသ္ထာပျ ယီၑဝေ ကထယာမာသုး၊
१त्यावेळी येशूला तेथे उपस्थित लोकांनी, पिलाताने गालील प्रांतातील मनुष्यांचे रक्त त्यांच्याच यज्ञपशूंच्या रक्तात कसे मिसळले होते, त्याविषयी सांगितले,
2 တတး သ ပြတျုဝါစ တေၐာံ လောကာနာမ် ဧတာဒၖၑီ ဒုရ္ဂတိ ရ္ဃဋိတာ တတ္ကာရဏာဒ် ယူယံ ကိမနျေဘျော ဂါလီလီယေဘျောပျဓိကပါပိနသ္တာန် ဗောဓဓွေ?
२त्याने त्यांना उत्तर दिले, “या गालीलकरांनी हे जे दुःख भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते, असे तुम्हास वाटते का?
3 ယုၐ္မာနဟံ ဝဒါမိ တထာ န ကိန္တု မနးသု န ပရာဝရ္တ္တိတေၐု ယူယမပိ တထာ နံက္ၐျထ၊
३मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल.
4 အပရဉ္စ ၑီလောဟနာမ္န ဥစ္စဂၖဟသျ ပတနာဒ် ယေ'ၐ္ဋာဒၑဇနာ မၖတာသ္တေ ယိရူၑာလမိ နိဝါသိသရွွလောကေဘျော'ဓိကာပရာဓိနး ကိံ ယူယမိတျံ ဗောဓဓွေ?
४किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठराजण यरूशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का?
5 ယုၐ္မာနဟံ ဝဒါမိ တထာ န ကိန္တု မနးသု န ပရိဝရ္တ္တိတေၐု ယူယမပိ တထာ နံက္ၐျထ၊
५नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.”
6 အနန္တရံ သ ဣမာံ ဒၖၐ္ဋာန္တကထာမကထယဒ် ဧကော ဇနော ဒြာက္ၐာက္ၐေတြမဓျ ဧကမုဍုမ္ဗရဝၖက္ၐံ ရောပိတဝါန်၊ ပၑ္စာတ် သ အာဂတျ တသ္မိန် ဖလာနိ ဂဝေၐယာမာသ,
६नंतर येशूने हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने त्याच्या द्राक्षमळ्यात अंजिराचे झाड लावले होते, त्यावर काही फळ असेल म्हणून तो ते पाहावयास आला परंतु त्यास काहीही आढळले नाही.
7 ကိန္တု ဖလာပြာပ္တေး ကာရဏာဒ် ဥဒျာနကာရံ ဘၖတျံ ဇဂါဒ, ပၑျ ဝတ္သရတြယံ ယာဝဒါဂတျ ဧတသ္မိန္နုဍုမ္ဗရတရော် က္ၐလာနျနွိစ္ဆာမိ, ကိန္တု နဲကမပိ ပြပ္နောမိ တရုရယံ ကုတော ဝၖထာ သ္ထာနံ ဝျာပျ တိၐ္ဌတိ? ဧနံ ဆိန္ဓိ၊
७म्हणून तो माळ्याला म्हणाला, पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?
8 တတော ဘၖတျး ပြတျုဝါစ, ဟေ ပြဘော ပုနရွရ္ၐမေကံ သ္ထာတုမ် အာဒိၑ; ဧတသျ မူလသျ စတုရ္ဒိက္ၐု ခနိတွာဟမ် အာလဝါလံ သ္ထာပယာမိ၊
८माळ्याने उत्तर दिले, मालक, हे एवढे एक वर्षभर ते राहू द्या. म्हणजे मी त्याच्याभोवती खणून त्यास खत घालीन.
9 တတး ဖလိတုံ ၑက္နောတိ ယဒိ န ဖလတိ တရှိ ပၑ္စာတ် ဆေတ္သျသိ၊
९मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”
10 အထ ဝိၑြာမဝါရေ ဘဇနဂေဟေ ယီၑုရုပဒိၑတိ
१०आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता.
11 တသ္မိတ် သမယေ ဘူတဂြသ္တတွာတ် ကုဗ္ဇီဘူယာၐ္ဋာဒၑဝရ္ၐာဏိ ယာဝတ် ကေနာပျုပါယေန ၒဇု ရ္ဘဝိတုံ န ၑက္နောတိ ယာ ဒုရ္ဗ္ဗလာ သ္တြီ,
११तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते.
12 တာံ တတြောပသ္ထိတာံ ဝိလောကျ ယီၑုသ္တာမာဟူယ ကထိတဝါန် ဟေ နာရိ တဝ ဒေါ်ရ္ဗ္ဗလျာတ် တွံ မုက္တာ ဘဝ၊
१२येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.”
13 တတး ပရံ တသျာ ဂါတြေ ဟသ္တာရ္ပဏမာတြာတ် သာ ၒဇုရ္ဘူတွေၑွရသျ ဓနျဝါဒံ ကရ္တ္တုမာရေဘေ၊
१३नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली.
14 ကိန္တု ဝိၑြာမဝါရေ ယီၑုနာ တသျား သွာသ္ထျကရဏာဒ် ဘဇနဂေဟသျာဓိပတိး ပြကုပျ လောကာန် ဥဝါစ, ၐဋ္သု ဒိနေၐု လောကဲး ကရ္မ္မ ကရ္တ္တဝျံ တသ္မာဒ္ဓေတေား သွာသ္ထျာရ္ထံ တေၐု ဒိနေၐု အာဂစ္ဆတ, ဝိၑြာမဝါရေ မာဂစ္ဆတ၊
१४नंतर, येशूने तिला बरे केले होते तो शब्बाथाचा दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये असा यहूद्यांचा नियम आहे. तो लोकांस म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”
15 တဒါ ပဘုး ပြတျုဝါစ ရေ ကပဋိနော ယုၐ္မာကမ် ဧကဲကော ဇနော ဝိၑြာမဝါရေ သွီယံ သွီယံ ဝၖၐဘံ ဂရ္ဒဘံ ဝါ ဗန္ဓနာန္မောစယိတွာ ဇလံ ပါယယိတုံ ကိံ န နယတိ?
१५येशूने त्यास उत्तर दिले आणि म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येकजण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का?
16 တရှျာၐ္ဋာဒၑဝတ္သရာန် ယာဝတ် ၑဲတာနာ ဗဒ္ဓါ ဣဗြာဟီမး သန္တတိရိယံ နာရီ ကိံ ဝိၑြာမဝါရေ န မောစယိတဝျာ?
१६ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?”
17 ဧၐု ဝါကျေၐု ကထိတေၐု တသျ ဝိပက္ၐား သလဇ္ဇာ ဇာတား ကိန္တု တေန ကၖတသရွွမဟာကရ္မ္မကာရဏာတ် လောကနိဝဟး သာနန္ဒော'ဘဝတ်၊
१७तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला.
18 အနန္တရံ သောဝဒဒ် ဤၑွရသျ ရာဇျံ ကသျ သဒၖၑံ? ကေန တဒုပမာသျာမိ?
१८मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्यास कशाची उपमा देऊ.
19 ယတ် သရ္ၐပဗီဇံ ဂၖဟီတွာ ကၑ္စိဇ္ဇန ဥဒျာန ဥပ္တဝါန် တဒ် ဗီဇမင်္ကုရိတံ သတ် မဟာဝၖက္ၐော'ဇာယတ, တတသ္တသျ ၑာခါသု ဝိဟာယသီယဝိဟဂါ အာဂတျ နျူၐုး, တဒြာဇျံ တာဒၖၑေန သရ္ၐပဗီဇေန တုလျံ၊
१९देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला व ते वाढून त्याचे मोठे झाड झाले आणि आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”
20 ပုနး ကထယာမာသ, ဤၑွရသျ ရာဇျံ ကသျ သဒၖၑံ ဝဒိၐျာမိ? ယတ် ကိဏွံ ကာစိတ် သ္တြီ ဂၖဟီတွာ ဒြောဏတြယပရိမိတဂေါဓူမစူရ္ဏေၐု သ္ထာပယာမာသ,
२०तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला आणखी कशाची उपमा देऊ?
21 တတး ကြမေဏ တတ် သရွွဂေါဓူမစူရ္ဏံ ဝျာပ္နောတိ, တသျ ကိဏွသျ တုလျမ် ဤၑွရသျ ရာဇျံ၊
२१ते खमिरासारखे पिठ किंवा इतर पदार्थांना आंबविण्यासाठी उपयोगात येणारा पदार्थ आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”
22 တတး သ ယိရူၑာလမ္နဂရံ ပြတိ ယာတြာံ ကၖတွာ နဂရေ နဂရေ ဂြာမေ ဂြာမေ သမုပဒိၑန် ဇဂါမ၊
२२येशू यरूशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांस शिकवीत होता.
23 တဒါ ကၑ္စိဇ္ဇနသ္တံ ပပြစ္ဆ, ဟေ ပြဘော ကိံ ကေဝလမ် အလ္ပေ လောကား ပရိတြာသျန္တေ?
२३कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला,
24 တတး သ လောကာန် ဥဝါစ, သံကီရ္ဏဒွါရေဏ ပြဝေၐ္ဋုံ ယတဃွံ, ယတောဟံ ယုၐ္မာန် ဝဒါမိ, ဗဟဝး ပြဝေၐ္ဋုံ စေၐ္ဋိၐျန္တေ ကိန္တု န ၑက္ၐျန္တိ၊
२४“अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.
25 ဂၖဟပတိနောတ္ထာယ ဒွါရေ ရုဒ္ဓေ သတိ ယဒိ ယူယံ ဗဟိး သ္ထိတွာ ဒွါရမာဟတျ ဝဒထ, ဟေ ပြဘော ဟေ ပြဘော အသ္မတ္ကာရဏာဒ် ဒွါရံ မောစယတု, တတး သ ဣတိ ပြတိဝက္ၐျတိ, ယူယံ ကုတြတျာ လောကာ ဣတျဟံ န ဇာနာမိ၊
२५घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.
26 တဒါ ယူယံ ဝဒိၐျထ, တဝ သာက္ၐာဒ် ဝယံ ဘေဇနံ ပါနဉ္စ ကၖတဝန္တး, တွဉ္စာသ္မာကံ နဂရသျ ပထိ သမုပဒိၐ္ဋဝါန်၊
२६नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!
27 ကိန္တု သ ဝက္ၐျတိ, ယုၐ္မာနဟံ ဝဒါမိ, ယူယံ ကုတြတျာ လောကာ ဣတျဟံ န ဇာနာမိ; ဟေ ဒုရာစာရိဏော ယူယံ မတ္တော ဒူရီဘဝတ၊
२७आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा.
28 တဒါ ဣဗြာဟီမံ ဣသှာကံ ယာကူဗဉ္စ သရွွဘဝိၐျဒွါဒိနၑ္စ ဤၑွရသျ ရာဇျံ ပြာပ္တာန် သွာံၑ္စ ဗဟိၐ္ကၖတာန် ဒၖၐ္ဋွာ ယူယံ ရောဒနံ ဒန္တဲရ္ဒန္တဃရ္ၐဏဉ္စ ကရိၐျထ၊
२८तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल.
29 အပရဉ္စ ပူရွွပၑ္စိမဒက္ၐိဏောတ္တရဒိဂ္ဘျော လောကာ အာဂတျ ဤၑွရသျ ရာဇျေ နိဝတ္သျန္တိ၊
२९आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील.
30 ပၑျတေတ္ထံ ၑေၐီယာ လောကာ အဂြာ ဘဝိၐျန္တိ, အဂြီယာ လောကာၑ္စ ၑေၐာ ဘဝိၐျန္တိ၊
३०जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.”
31 အပရဉ္စ တသ္မိန် ဒိနေ ကိယန္တး ဖိရူၑိန အာဂတျ ယီၑုံ ပြောစုး, ဗဟိရ္ဂစ္ဆ, သ္ထာနာဒသ္မာတ် ပြသ္ထာနံ ကုရု, ဟေရောဒ် တွာံ ဇိဃာံသတိ၊
३१त्यावेळी काही परूशी येशूकडे आले आणि ते त्यास म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हास ठार मारणार आहे.”
32 တတး သ ပြတျဝေါစတ် ပၑျတာဒျ ၑွၑ္စ ဘူတာန် ဝိဟာပျ ရောဂိဏော'ရောဂိဏး ကၖတွာ တၖတီယေဟ္နိ သေတ္သျာမိ, ကထာမေတာံ ယူယမိတွာ တံ ဘူရိမာယံ ဝဒတ၊
३२येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’
33 တတြာပျဒျ ၑွး ပရၑွၑ္စ မယာ ဂမနာဂမနေ ကရ္တ္တဝျေ, ယတော ဟေတော ရျိရူၑာလမော ဗဟိး ကုတြာပိ ကောပိ ဘဝိၐျဒွါဒီ န ဃာနိၐျတေ၊
३३तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरूशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही.”
34 ဟေ ယိရူၑာလမ် ဟေ ယိရူၑာလမ် တွံ ဘဝိၐျဒွါဒိနော ဟံသိ တဝါန္တိကေ ပြေရိတာန် ပြသ္တရဲရ္မာရယသိ စ, ယထာ ကုက္ကုဋီ နိဇပက္ၐာဓး သွၑာဝကာန် သံဂၖဟ္လာတိ, တထာဟမပိ တဝ ၑိၑူန် သံဂြဟီတုံ ကတိဝါရာန် အဲစ္ဆံ ကိန္တု တွံ နဲစ္ဆး၊
३४यरूशलेमे, यरूशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकांस एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती.
35 ပၑျတ ယုၐ္မာကံ ဝါသသ္ထာနာနိ ပြောစ္ဆိဒျမာနာနိ ပရိတျက္တာနိ စ ဘဝိၐျန္တိ; ယုၐ္မာနဟံ ယထာရ္ထံ ဝဒါမိ, ယး ပြဘော ရ္နာမ္နာဂစ္ဆတိ သ ဓနျ ဣတိ ဝါစံ ယာဝတ္ကာလံ န ဝဒိၐျထ, တာဝတ္ကာလံ ယူယံ မာံ န ဒြက္ၐျထ၊
३५“पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हास सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”