< ဣဗြိဏး 9 >

1 သ ပြထမော နိယမ အာရာဓနာယာ ဝိဝိဓရီတိဘိရဲဟိကပဝိတြသ္ထာနေန စ ဝိၑိၐ္ဋ အာသီတ်၊
आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते
2 ယတော ဒူၐျမေကံ နိရမီယတ တသျ ပြထမကောၐ္ဌသျ နာမ ပဝိတြသ္ထာနမိတျာသီတ် တတြ ဒီပဝၖက္ၐော ဘောဇနာသနံ ဒရ္ၑနီယပူပါနာံ ၑြေဏီ စာသီတ်၊
कारण मंडपामध्ये खोल्या तयार केल्या होत्या, बाहेरील खोली त्यास पवित्रस्थान असे म्हणले आहे. त्यामध्ये दिव्यांचे झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या.
3 တတ္ပၑ္စာဒ် ဒွိတီယာယာသ္တိရၐ္ကရိဏျာ အဘျန္တရေ 'တိပဝိတြသ္ထာနမိတိနာမကံ ကောၐ္ဌမာသီတ်,
आणि दुसऱ्या पडद्यामागे एक मंडप होता, त्यास परमपवित्रस्थान म्हणत
4 တတြ စ သုဝရ္ဏမယော ဓူပါဓာရး ပရိတး သုဝရ္ဏမဏ္ဍိတာ နိယမမဉ္ဇူၐာ စာသီတ် တန္မဓျေ မာန္နာယား သုဝရ္ဏဃဋော ဟာရောဏသျ မဉ္ဇရိတဒဏ္ဍသ္တက္ၐိတော် နိယမပြသ္တရော်,
त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची धूपाटणे आणि संपूर्ण सोन्याने मढवलेला कराराचा कोष लाकडी पेटी होती. त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात मान्ना होता, तसेच कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या.
5 တဒုပရိ စ ကရုဏာသနေ ဆာယာကာရိဏော် တေဇောမယော် ကိရူဗာဝါသ္တာမ်, ဧတေၐာံ ဝိၑေၐဝၖတ္တာန္တကထနာယ နာယံ သမယး၊
या कोषावर गौरवाचे करुबीम दयासनावर सावली करीत होते. परंतु आता याबाबत सविस्तर सांगत नाही.
6 ဧတေၐွီဒၖက် နိရ္မ္မိတေၐု ယာဇကာ ဤၑွရသေဝါမ် အနုတိၐ္ဌနတော ဒူၐျသျ ပြထမကောၐ္ဌံ နိတျံ ပြဝိၑန္တိ၊
या वस्तूंच्या अशा व्यवस्थेनुसार याजकगण उपासना करायला पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत.
7 ကိန္တု ဒွိတီယံ ကောၐ္ဌံ ပြတိဝရ္ၐမ် ဧကကၖတွ ဧကာကိနာ မဟာယာဇကေန ပြဝိၑျတေ ကိန္တွာတ္မနိမိတ္တံ လောကာနာမ် အဇ္ဉာနကၖတပါပါနာဉ္စ နိမိတ္တမ် ဥတ္သရ္ဇ္ဇနီယံ ရုဓိရမ် အနာဒါယ တေန န ပြဝိၑျတေ၊
पण केवळ एकटा महायाजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या मंडपात जाई, तो स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय तो आत जात नाही.
8 ဣတျနေန ပဝိတြ အာတ္မာ ယတ် ဇ္ဉာပယတိ တဒိဒံ တတ် ပြထမံ ဒူၐျံ ယာဝတ် တိၐ္ဌတိ တာဝတ် မဟာပဝိတြသ္ထာနဂါမီ ပန္ထာ အပြကာၑိတသ္တိၐ္ဌတိ၊
याद्वारे पवित्र आत्मा दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानाची वाट प्रकट झाली नाही.
9 တစ္စ ဒူၐျံ ဝရ္တ္တမာနသမယသျ ဒၖၐ္ဋာန္တး, ယတော ဟေတေား သာမ္ပြတံ သံၑောဓနကာလံ ယာဝဒ် ယန္နိရူပိတံ တဒနုသာရာတ် သေဝါကာရိဏော မာနသိကသိဒ္ဓိကရဏေ'သမရ္ထာဘိး
तो मंडप वर्तमान काळात दृष्टांतरूप आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्यास वाहिलेली अर्पणे यामुळे उपासना करणाऱ्यांचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत ती अर्पिण्यात येतात.
10 ကေဝလံ ခါဒျပေယေၐု ဝိဝိဓမဇ္ဇနေၐု စ ၑာရီရိကရီတိဘိ ရျုက္တာနိ နဲဝေဒျာနိ ဗလိဒါနာနိ စ ဘဝန္တိ၊
१०हे विधी केवळ दैहिक बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे केवळ सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.
11 အပရံ ဘာဝိမင်္ဂလာနာံ မဟာယာဇကး ခြီၐ္ဋ ဥပသ္ထာယာဟသ္တနိရ္မ္မိတေနာရ္ထတ ဧတတ္သၖၐ္ဋေ ရ္ဗဟိရ္ဘူတေန ၑြေၐ္ဌေန သိဒ္ဓေန စ ဒူၐျေဏ ဂတွာ
११पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा महायाजक म्हणून आला आहे आणि अधिक मोठा व अधिक पूर्ण, मनुष्याच्या हातांनी केलेला नव्हे, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा मंडपाच्याव्दारे,
12 ဆာဂါနာံ ဂေါဝတ္သာနာံ ဝါ ရုဓိရမ် အနာဒါယ သွီယရုဓိရမ် အာဒါယဲကကၖတွ ဧဝ မဟာပဝိတြသ္ထာနံ ပြဝိၑျာနန္တကာလိကာံ မုက္တိံ ပြာပ္တဝါန်၊ (aiōnios g166)
१२बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला; (aiōnios g166)
13 ဝၖၐဆာဂါနာံ ရုဓိရေဏ ဂဝီဘသ္မနး ပြက္ၐေပေဏ စ ယဒျၑုစိလောကား ၑာရီရိၑုစိတွာယ ပူယန္တေ,
१३कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात,
14 တရှိ ကိံ မနျဓွေ ယး သဒါတနေနာတ္မနာ နိၐ္ကလင်္ကဗလိမိဝ သွမေဝေၑွရာယ ဒတ္တဝါန်, တသျ ခြီၐ္ဋသျ ရုဓိရေဏ ယုၐ္မာကံ မနာံသျမရေၑွရသျ သေဝါယဲ ကိံ မၖတျုဇနကေဘျး ကရ္မ္မဘျော န ပဝိတြီကာရိၐျန္တေ? (aiōnios g166)
१४तर ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पिले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेकभावांस जिवंत देवाची सेवा करण्यासाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील? (aiōnios g166)
15 သ နူတနနိယမသျ မဓျသ္ထော'ဘဝတ် တသျာဘိပြာယော'ယံ ယတ် ပြထမနိယမလင်္ဃနရူပပါပေဘျော မၖတျုနာ မုက္တော် ဇာတာယာမ် အာဟူတလောကာ အနန္တကာလီယသမ္ပဒး ပြတိဇ္ဉာဖလံ လဘေရန်၊ (aiōnios g166)
१५ख्रिस्त याकरिता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की, पहिल्या करारासंबंधी जी उल्लंघने झाली त्यापासून खंडणी भरून मिळवलेली सुटका होण्यासाठी आपले मरण झाल्याने, जे बोलावलेले त्यांना सार्वकालिक वतनाचे वचन मिळावे. (aiōnios g166)
16 ယတြ နိယမော ဘဝတိ တတြ နိယမသာဓကသျ ဗလေ ရ္မၖတျုနာ ဘဝိတဝျံ၊
१६जेथे मृत्युपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाऱ्याचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते.
17 ယတော ဟတေန ဗလိနာ နိယမး သ္ထိရီဘဝတိ ကိန္တု နိယမသာဓကော ဗလိ ရျာဝတ် ဇီဝတိ တာဝတ် နိယမော နိရရ္ထကသ္တိၐ္ဌတိ၊
१७कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही.
18 တသ္မာတ် သ ပူရွွနိယမော'ပိ ရုဓိရပါတံ ဝိနာ န သာဓိတး၊
१८म्हणून पहिल्या कराराची स्थापना रक्तावाचून झाली नाही.
19 ဖလတး သရွွလောကာန် ပြတိ ဝျဝသ္ထာနုသာရေဏ သရွွာ အာဇ္ဉား ကထယိတွာ မူသာ ဇလေန သိန္ဒူရဝရ္ဏလောမ္နာ ဧၐောဝတၖဏေန စ သာရ္ဒ္ဓံ ဂေါဝတ္သာနာံ ဆာဂါနာဉ္စ ရုဓိရံ ဂၖဟီတွာ ဂြန္ထေ သရွွလောကေၐု စ ပြက္ၐိပျ ဗဘာၐေ,
१९कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमिजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले.
20 ယုၐ္မာန် အဓီၑွရော ယံ နိယမံ နိရူပိတဝါန် တသျ ရုဓိရမေတတ်၊
२०तो म्हणाला, “जो करार पाळण्याची देवाने तुम्हास आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे.”
21 တဒွတ် သ ဒူၐျေ'ပိ သေဝါရ္ထကေၐု သရွွပါတြေၐု စ ရုဓိရံ ပြက္ၐိပ္တဝါန်၊
२१त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंवर ते रक्त शिंपडले.
22 အပရံ ဝျဝသ္ထာနုသာရေဏ ပြာယၑး သရွွာဏိ ရုဓိရေဏ ပရိၐ္ကြိယန္တေ ရုဓိရပါတံ ဝိနာ ပါပမောစနံ န ဘဝတိ စ၊
२२खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षालन होत नाही.
23 အပရံ ယာနိ သွရ္ဂီယဝသ္တူနာံ ဒၖၐ္ဋာန္တာသ္တေၐာမ် ဧတဲး ပါဝနမ် အာဝၑျကမ် အာသီတ် ကိန္တု သာက္ၐာတ် သွရ္ဂီယဝသ္တူနာမ် ဧတေဘျး ၑြေၐ္ဌေ ရ္ဗလိဒါနဲး ပါဝနမာဝၑျကံ၊
२३म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात.
24 ယတး ခြီၐ္ဋး သတျပဝိတြသ္ထာနသျ ဒၖၐ္ဋာန္တရူပံ ဟသ္တကၖတံ ပဝိတြသ္ထာနံ န ပြဝိၐ္ဋဝါန် ကိန္တွသ္မန္နိမိတ္တမ် ဣဒါနီမ် ဤၑွရသျ သာက္ၐာဒ် ဥပသ္ထာတုံ သွရ္ဂမေဝ ပြဝိၐ္ဋး၊
२४कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.
25 ယထာ စ မဟာယာဇကး ပြတိဝရ္ၐံ ပရၑောဏိတမာဒါယ မဟာပဝိတြသ္ထာနံ ပြဝိၑတိ တထာ ခြီၐ္ဋေန ပုနး ပုနရာတ္မောတ္သရ္ဂော န ကရ္တ္တဝျး,
२५जसा महायाजक दरवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो तसे त्यास पुन्हा पुन्हा स्वतःचे अर्पण करायचे नव्हते.
26 ကရ္တ္တဝျေ သတိ ဇဂတး သၖၐ္ဋိကာလမာရဘျ ဗဟုဝါရံ တသျ မၖတျုဘောဂ အာဝၑျကော'ဘဝတ်; ကိန္တွိဒါနီံ သ အာတ္မောတ္သရ္ဂေဏ ပါပနာၑာရ္ထမ် ဧကကၖတွော ဇဂတး ၑေၐကာလေ ပြစကာၑေ၊ (aiōn g165)
२६तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे. (aiōn g165)
27 အပရံ ယထာ မာနုၐသျဲကကၖတွော မရဏံ တတ် ပၑ္စာဒ် ဝိစာရော နိရူပိတော'သ္တိ,
२७ज्याअर्थी लोकांस एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,
28 တဒွတ် ခြီၐ္ဋော'ပိ ဗဟူနာံ ပါပဝဟနာရ္ထံ ဗလိရူပေဏဲကကၖတွ ဥတ္သသၖဇေ, အပရံ ဒွိတီယဝါရံ ပါပါဒ် ဘိန္နး သန် ယေ တံ ပြတီက္ၐန္တေ တေၐာံ ပရိတြာဏာရ္ထံ ဒရ္ၑနံ ဒါသျတိ၊
२८तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.

< ဣဗြိဏး 9 >