< ဣဗြိဏး 4 >

1 အပရံ တဒွိၑြာမပြာပ္တေး ပြတိဇ္ဉာ ယဒိ တိၐ္ဌတိ တရှျသ္မာကံ ကၑ္စိတ် စေတ် တသျား ဖလေန ဝဉ္စိတော ဘဝေတ် ဝယမ် ဧတသ္မာဒ် ဗိဘီမး၊
म्हणून देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी देवापासून मिळालेले अभिवचन अजूनही आहे आणि यास्तव तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
2 ယတော 'သ္မာကံ သမီပေ ယဒွတ် တဒွတ် တေၐာံ သမီပေ'ပိ သုသံဝါဒး ပြစာရိတော 'ဘဝတ် ကိန္တု တဲး ၑြုတံ ဝါကျံ တာန် ပြတိ နိၐ္ဖလမ် အဘဝတ်, ယတသ္တေ ၑြောတာရော ဝိၑွာသေန သာရ္ဒ္ဓံ တန္နာမိၑြယန်၊
कारण आम्हास सुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांस सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही.
3 တဒ် ဝိၑြာမသ္ထာနံ ဝိၑွာသိဘိရသ္မာဘိး ပြဝိၑျတေ ယတသ္တေနောက္တံ, "အဟံ ကောပါတ် ၑပထံ ကၖတဝါန် ဣမံ, ပြဝေက္ၐျတေ ဇနဲရေတဲ ရ္န ဝိၑြာမသ္ထလံ မမ၊ " ကိန္တု တသျ ကရ္မ္မာဏိ ဇဂတး သၖၐ္ဋိကာလာတ် သမာပ္တာနိ သန္တိ၊
ज्या आपण विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. असे देवाने म्हणले आहे. “म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत” जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला.
4 ယတး ကသ္မိံၑ္စိတ် သ္ထာနေ သပ္တမံ ဒိနမဓိ တေနေဒမ် ဥက္တံ, ယထာ, "ဤၑွရး သပ္တမေ ဒိနေ သွကၖတေဘျး သရွွကရ္မ္မဘျော ဝိၑၑြာမ၊ "
कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसाबद्दल असे बोलला आहे कीः “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”
5 ကိန္တွေတသ္မိန် သ္ထာနေ ပုနသ္တေနောစျတေ, ယထာ, "ပြဝေက္ၐျတေ ဇနဲရေတဲ ရ္န ဝိၑြာမသ္ထလံ မမ၊ "
आणि पुन्हा तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत.”
6 ဖလတသ္တတ် သ္ထာနံ ကဲၑ္စိတ် ပြဝေၐ္ဋဝျံ ကိန္တု ယေ ပုရာ သုသံဝါဒံ ၑြုတဝန္တသ္တဲရဝိၑွာသာတ် တန္န ပြဝိၐ္ဋမ်,
ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासामुळे त्यामध्ये प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे.
7 ဣတိ ဟေတေား သ ပုနရဒျနာမကံ ဒိနံ နိရူပျ ဒီရ္ဃကာလေ ဂတေ'ပိ ပူရွွောက္တာံ ဝါစံ ဒါယူဒါ ကထယတိ, ယထာ, "အဒျ ယူယံ ကထာံ တသျ ယဒိ သံၑြောတုမိစ္ဆထ, တရှိ မာ ကုရုတေဒါနီံ ကဌိနာနိ မနာံသိ ဝး၊ "
त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्चित केली असून त्यास तो “आज” हा एक असा दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्या द्वारे असे म्हणतो, “आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
8 အပရံ ယိဟောၑူယော ယဒိ တာန် ဝျၑြာမယိၐျတ် တရှိ တတး ပရမ် အပရသျ ဒိနသျ ဝါဂ် ဤၑွရေဏ နာကထယိၐျတ၊
कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता.
9 အတ ဤၑွရသျ ပြဇာဘိး ကရ္တ္တဝျ ဧကော ဝိၑြာမသ္တိၐ္ဌတိ၊
म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही विसाव्याचा दिवस आहे.
10 အပရမ် ဤၑွရော ယဒွတ် သွကၖတကရ္မ္မဘျော ဝိၑၑြာမ တဒွတ် တသျ ဝိၑြာမသ္ထာနံ ပြဝိၐ္ဋော ဇနော'ပိ သွကၖတကရ္မ္မဘျော ဝိၑြာမျတိ၊
१०कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वतःच्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता.
11 အတော ဝယံ တဒ် ဝိၑြာမသ္ထာနံ ပြဝေၐ္ဋုံ ယတာမဟဲ, တဒဝိၑွာသောဒါဟရဏေန ကော'ပိ န ပတတု၊
११म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
12 ဤၑွရသျ ဝါဒေါ'မရး ပြဘာဝဝိၑိၐ္ဋၑ္စ သရွွသ္မာဒ် ဒွိဓာရခင်္ဂါဒပိ တီက္ၐ္ဏး, အပရံ ပြာဏာတ္မနော ရ္ဂြန္ထိမဇ္ဇယောၑ္စ ပရိဘေဒါယ ဝိစ္ဆေဒကာရီ မနသၑ္စ သင်္ကလ္ပာနာမ် အဘိပြေတာနာဉ္စ ဝိစာရကး၊
१२कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे.
13 အပရံ ယသျ သမီပေ သွီယာ သွီယာ ကထာသ္မာဘိး ကထယိတဝျာ တသျာဂေါစရး ကော'ပိ ပြာဏီ နာသ္တိ တသျ ဒၖၐ္ဋော် သရွွမေဝါနာဝၖတံ ပြကာၑိတဉ္စာသ္တေ၊
१३आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
14 အပရံ ယ ဥစ္စတမံ သွရ္ဂံ ပြဝိၐ္ဋ ဧတာဒၖၑ ဧကော ဝျက္တိရရ္ထတ ဤၑွရသျ ပုတြော ယီၑုရသ္မာကံ မဟာယာဇကော'သ္တိ, အတော ဟေတော ရွယံ ဓရ္မ္မပြတိဇ္ဉာံ ဒၖဎမ် အာလမ္ဗာမဟဲ၊
१४म्हणून, ज्याअर्थी आम्हास येशू देवाचा पुत्र हा महान महायाजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या.
15 အသ္မာကံ ယော မဟာယာဇကော 'သ္တိ သော'သ္မာကံ ဒုးခဲ ရ္ဒုးခိတော ဘဝိတုမ် အၑက္တော နဟိ ကိန္တု ပါပံ ဝိနာ သရွွဝိၐယေ ဝယမိဝ ပရီက္ၐိတး၊
१५कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.
16 အတဧဝ ကၖပါံ ဂြဟီတုံ ပြယောဇနီယောပကာရာရ္ထမ် အနုဂြဟံ ပြာပ္တုဉ္စ ဝယမ် ဥတ္သာဟေနာနုဂြဟသိံဟာသနသျ သမီပံ ယာမး၊
१६तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व कृपा प्राप्त व्हावी.

< ဣဗြိဏး 4 >