< ဣဗြိဏး 2 >

1 အတော ဝယံ ယဒ် ဘြမသြောတသာ နာပနီယာမဟေ တဒရ္ထမသ္မာဘိ ရျဒျဒ် အၑြာဝိ တသ္မိန် မနာံသိ နိဓာတဝျာနိ၊
या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये.
2 ယတော ဟေတော ဒူတဲး ကထိတံ ဝါကျံ ယဒျမောဃမ် အဘဝဒ် ယဒိ စ တလ္လင်္ဃနကာရိဏေ တသျာဂြာဟကာယ စ သရွွသ္မဲ သမုစိတံ ဒဏ္ဍမ် အဒီယတ,
कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते.
3 တရှျသ္မာဘိသ္တာဒၖၑံ မဟာပရိတြာဏမ် အဝဇ္ဉာယ ကထံ ရက္ၐာ ပြာပ္သျတေ, ယတ် ပြထမတး ပြဘုနာ ပြောက္တံ တတော'သ္မာန် ယာဝတ် တသျ ၑြောတၖဘိး သ္ထိရီကၖတံ,
तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
4 အပရံ လက္ၐဏဲရဒ္ဘုတကရ္မ္မဘိ ရွိဝိဓၑက္တိပြကာၑေန နိဇေစ္ဆာတး ပဝိတြသျာတ္မနော ဝိဘာဂေန စ ယဒ် ဤၑွရေဏ ပြမာဏီကၖတမ် အဘူတ်၊
देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
5 ဝယံ တု ယသျ ဘာဝိရာဇျသျ ကထာံ ကထယာမး, တတ် တေန် ဒိဝျဒူတာနာမ် အဓီနီကၖတမိတိ နဟိ၊
आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही.
6 ကိန္တု ကုတြာပိ ကၑ္စိတ် ပြမာဏမ် ဤဒၖၑံ ဒတ္တဝါန်, ယထာ, "ကိံ ဝသ္တု မာနဝေါ ယတ် သ နိတျံ သံသ္မရျျတေ တွယာ၊ ကိံ ဝါ မာနဝသန္တာနော ယတ် သ အာလောစျတေ တွယာ၊
पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावा?
7 ဒိဝျဒတဂဏေဘျး သ ကိဉ္စိန် နျူနး ကၖတသ္တွယာ၊ တေဇောဂေါ်ရဝရူပေဏ ကိရီဋေန ဝိဘူၐိတး၊ သၖၐ္ဋံ ယတ် တေ ကရာဘျာံ သ တတ္ပြဘုတွေ နိယောဇိတး၊
थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
8 စရဏာဓၑ္စ တသျဲဝ တွယာ သရွွံ ဝၑီကၖတံ။ " တေန သရွွံ ယသျ ဝၑီကၖတံ တသျာဝၑီဘူတံ ကိမပိ နာဝၑေၐိတံ ကိန္တွဓုနာပိ ဝယံ သရွွာဏိ တသျ ဝၑီဘူတာနိ န ပၑျာမး၊
तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवलेस.” देवाने सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.
9 တထာပိ ဒိဝျဒူတဂဏေဘျော ယး ကိဉ္စိန် နျူနီကၖတော'ဘဝတ် တံ ယီၑုံ မၖတျုဘောဂဟေတောသ္တေဇောဂေါ်ရဝရူပေဏ ကိရီဋေန ဝိဘူၐိတံ ပၑျာမး, ယတ ဤၑွရသျာနုဂြဟာတ် သ သရွွေၐာံ ကၖတေ မၖတျုမ် အသွဒတ၊
परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचीत कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
10 အပရဉ္စ ယသ္မဲ ယေန စ ကၖတ္သ္နံ ဝသ္တု သၖၐ္ဋံ ဝိဒျတေ ဗဟုသန္တာနာနာံ ဝိဘဝါယာနယနကာလေ တေၐာံ ပရိတြာဏာဂြသရသျ ဒုးခဘောဂေန သိဒ္ဓီကရဏမပိ တသျောပယုက္တမ် အဘဝတ်၊
१०देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले.
11 ယတး ပါဝကး ပူယမာနာၑ္စ သရွွေ ဧကသ္မာဒေဝေါတ္ပန္နာ ဘဝန္တိ, ဣတိ ဟေတေား သ တာန် ဘြာတၖန် ဝဒိတုံ န လဇ္ဇတေ၊
११जो लोकांस पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही.
12 တေန သ ဥက္တဝါန်, ယထာ, "ဒျောတယိၐျာမိ တေ နာမ ဘြာတၖဏာံ မဓျတော မမ၊ ပရန္တု သမိတေ ရ္မဓျေ ကရိၐျေ တေ ပြၑံသနံ။ "
१२तो म्हणतो, मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन.
13 ပုနရပိ, ယထာ, "တသ္မိန် ဝိၑွသျ သ္ထာတာဟံ၊ " ပုနရပိ, ယထာ, "ပၑျာဟမ် အပတျာနိ စ ဒတ္တာနိ မဟျမ် ဤၑွရာတ်၊ "
१३तो आणखी म्हणतो, “मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन.” आणि तो पुन्हा म्हणतो, येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.
14 တေၐာမ် အပတျာနာံ ရုဓိရပလလဝိၑိၐ္ဋတွာတ် သော'ပိ တဒွတ် တဒွိၑိၐ္ဋော'ဘူတ် တသျာဘိပြာယော'ယံ ယတ် သ မၖတျုဗလာဓိကာရိဏံ ၑယတာနံ မၖတျုနာ ဗလဟီနံ ကုရျျာတ္
१४म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
15 ယေ စ မၖတျုဘယာဒ် ယာဝဇ္ဇီဝနံ ဒါသတွသျ နိဃ္နာ အာသန် တာန် ဥဒ္ဓါရယေတ်၊
१५आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय ठेवून त्याचे दास असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे.
16 သ ဒူတာနာမ် ဥပကာရီ န ဘဝတိ ကိန္တွိဗြာဟီမော ဝံၑသျဲဝေါပကာရီ ဘဝတီ၊
१६कारण खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नाही, तर अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो,
17 အတော ဟေတေား သ ယထာ ကၖပါဝါန် ပြဇာနာံ ပါပၑောဓနာရ္ထမ် ဤၑွရောဒ္ဒေၑျဝိၐယေ ဝိၑွာသျော မဟာယာဇကော ဘဝေတ် တဒရ္ထံ သရွွဝိၐယေ သွဘြာတၖဏာံ သဒၖၑီဘဝနံ တသျောစိတမ် အာသီတ်၊
१७या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा महायाजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते.
18 ယတး သ သွယံ ပရီက္ၐာံ ဂတွာ ယံ ဒုးခဘောဂမ် အဝဂတသ္တေန ပရီက္ၐာကြာန္တာန် ဥပကရ္တ္တုံ ၑက္နောတိ၊
१८कारण ज्याअर्थी येशूला स्वतः परीक्षेला व दुःखसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.

< ဣဗြိဏး 2 >