< ကလသိနး 2 >

1 ယုၐ္မာကံ လာယဒိကေယာသ္ထဘြာတၖဏာဉ္စ ကၖတေ ယာဝန္တော ဘြာတရၑ္စ မမ ၑာရီရိကမုခံ န ဒၖၐ္ဋဝန္တသ္တေၐာံ ကၖတေ မမ ကိယာန် ယတ္နော ဘဝတိ တဒ် ယုၐ္မာန် ဇ္ဉာပယိတုမ် ဣစ္ဆာမိ၊
कारण माझी इच्छा आहे की, तुमच्यासाठी व त्याचप्रमाणे जे लावदीकिया शहरात आहेत आणि ज्यांनी मला शारीरीकरित्या पाहिलेले नाही, अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हास समजून,
2 ဖလတး ပူရ္ဏဗုဒ္ဓိရူပဓနဘောဂါယ ပြေမ္နာ သံယုက္တာနာံ တေၐာံ မနာံသိ ယတ် ပိတုရီၑွရသျ ခြီၐ္ဋသျ စ နိဂူဎဝါကျသျ ဇ္ဉာနာရ္ထံ သာန္တွနာံ ပြာပ္နုယုရိတျရ္ထမဟံ ယတေ၊
ते परिश्रम ह्यांसाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुद्धीची पूर्ण खातरी विपुलतेने मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे.
3 ယတော ဝိဒျာဇ္ဉာနယေား သရွွေ နိဓယး ခြီၐ္ဋေ ဂုပ္တား သန္တိ၊
त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत.
4 ကော'ပိ ယုၐ္မာန် ဝိနယဝါကျေန ယန္န ဝဉ္စယေတ် တဒရ္ထမ် ဧတာနိ မယာ ကထျန္တေ၊
कोणी तुम्हास लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे.
5 ယုၐ္မတ္သန္နိဓော် မမ ၑရီရေ'ဝရ္တ္တမာနေ'ပိ မမာတ္မာ ဝရ္တ္တတေ တေန ယုၐ္မာကံ သုရီတိံ ခြီၐ္ဋဝိၑွာသေ သ္ထိရတွဉ္စ ဒၖၐ္ဋွာဟမ် အာနန္ဒာမိ၊
कारण मी देहाने दूर असलो तरी मनाने तुमच्याजवळ आहे आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे.
6 အတော ယူယံ ပြဘုံ ယီၑုခြီၐ္ဋံ ယာဒၖဂ် ဂၖဟီတဝန္တသ္တာဒၖက် တမ် အနုစရတ၊
आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला.
7 တသ္မိန် ဗဒ္ဓမူလား သ္ထာပိတာၑ္စ ဘဝတ ယာ စ ၑိက္ၐာ ယုၐ္မာဘိ ရ္လဗ္ဓာ တဒနုသာရာဒ် ဝိၑွာသေ သုသ္ထိရား သန္တသ္တေနဲဝ နိတျံ ဓနျဝါဒံ ကုရုတ၊
तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हास शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यामध्ये वाढत जा.
8 သာဝဓာနာ ဘဝတ မာနုၐိကၑိက္ၐာတ ဣဟလောကသျ ဝရ္ဏမာလာတၑ္စောတ္ပန္နာ ခြီၐ္ဋသျ ဝိပက္ၐာ ယာ ဒရ္ၑနဝိဒျာ မိထျာပြတာရဏာ စ တယာ ကော'ပိ ယုၐ္မာကံ က္ၐတိံ န ဇနယတု၊
तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्‍या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही.
9 ယတ ဤၑွရသျ ကၖတ္သ္နာ ပူရ္ဏတာ မူရ္တ္တိမတီ ခြီၐ္ဋေ ဝသတိ၊
कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते.
10 ယူယဉ္စ တေန ပူရ္ဏာ ဘဝထ ယတး သ သရွွေၐာံ ရာဇတွကရ္တ္တၖတွပဒါနာံ မူရ္ဒ္ဓါသ္တိ,
१०तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्याठायी तुम्ही पूर्ण झाला आहा,
11 တေန စ ယူယမ် အဟသ္တကၖတတွက္ဆေဒေနာရ္ထတော ယေန ၑာရီရပါပါနာံ ဝိဂြသတျဇျတေ တေန ခြီၐ္ဋသျ တွက္ဆေဒေန ဆိန္နတွစော ဇာတာ
११आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय दैहिक शरीर काढले जाऊन, कोणी हातांनी न केलेल्या सुंताविधीने तुमचीही त्यांच्यात सुंता झाली आहे.
12 မဇ္ဇနေ စ တေန သာရ္ဒ္ဓံ ၑ္မၑာနံ ပြာပ္တား ပုန ရ္မၖတာနာံ မဓျာတ် တသျောတ္ထာပယိတုရီၑွရသျ ၑက္တေး ဖလံ ယော ဝိၑွာသသ္တဒွါရာ တသ္မိန္နေဝ မဇ္ဇနေ တေန သာရ္ဒ္ဓမ် ဥတ္ထာပိတာ အဘဝတ၊
१२त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यामध्येच त्याच्याबरोबर उठवले गेला,
13 သ စ ယုၐ္မာန် အပရာဓဲး ၑာရီရိကာတွက္ဆေဒေန စ မၖတာန် ဒၖၐ္ဋွာ တေန သာရ္ဒ္ဓံ ဇီဝိတဝါန် ယုၐ္မာကံ သရွွာန် အပရာဓာန် က္ၐမိတဝါန်,
१३आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे;
14 ယစ္စ ဒဏ္ဍာဇ္ဉာရူပံ ၒဏပတြမ် အသ္မာကံ ဝိရုဒ္ဓမ် အာသီတ် တတ် ပြမာရ္ဇ္ဇိတဝါန် ၑလာကာဘိး ကြုၑေ ဗဒ္ဓွာ ဒူရီကၖတဝါံၑ္စ၊
१४आणि आपल्या आड येणारा जो नियमांचा हस्तलेख आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व तो त्याने वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले.
15 ကိဉ္စ တေန ရာဇတွကရ္တ္တၖတွပဒါနိ နိသ္တေဇာံသိ ကၖတွာ ပရာဇိတာန် ရိပူနိဝ ပြဂလ္ဘတယာ သရွွေၐာံ ဒၖၐ္ဋိဂေါစရေ ဟြေပိတဝါန်၊
१५त्याने त्यावर सत्तांना व शक्तींना निःशस्त्र केले व त्यांच्यावर जय मिळवून त्यांचे उघड प्रदर्शन केले.
16 အတော ဟေတေား ခါဒျာခါဒျေ ပေယာပေယေ ဥတ္သဝး ပြတိပဒ် ဝိၑြာမဝါရၑ္စဲတေၐု သရွွေၐု ယုၐ္မာကံ နျာယာဓိပတိရူပံ ကမပိ မာ ဂၖဟ္လီတ၊
१६म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून, सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका.
17 ယတ ဧတာနိ ဆာယာသွရူပါဏိ ကိန္တု သတျာ မူရ္တ္တိး ခြီၐ္ဋး၊
१७या गोष्टी तर येणार्‍या गोष्टींची छाया अशा आहेत; पण शरीर ख्रिस्ताचे आहे.
18 အပရဉ္စ နမြတာ သွရ္ဂဒူတာနာံ သေဝါ စဲတာဒၖၑမ် ဣၐ္ဋကရ္မ္မာစရန် ယး ကၑ္စိတ် ပရောက္ၐဝိၐယာန် ပြဝိၑတိ သွကီယၑာရီရိကဘာဝေန စ မုဓာ ဂရွွိတး သန္
१८लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा मनुष्यास तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका;
19 သန္ဓိဘိး ၑိရာဘိၑ္စောပကၖတံ သံယုက္တဉ္စ ကၖတ္သ္နံ ၑရီရံ ယသ္မာတ် မူရ္ဒ္ဓတ ဤၑွရီယဝၖဒ္ဓိံ ပြာပ္နောတိ တံ မူရ္ဒ္ဓါနံ န ဓာရယတိ တေန မာနဝေန ယုၐ္မတ္တး ဖလာပဟရဏံ နာနုဇာနီတ၊
१९असा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या द्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची दैवी वाढ होते.
20 ယဒိ ယူယံ ခြီၐ္ဋေန သာရ္ဒ္ဓံ သံသာရသျ ဝရ္ဏမာလာယဲ မၖတာ အဘဝတ တရှိ ယဲ ရ္ဒြဝျဲ ရ္ဘောဂေန က္ၐယံ ဂန္တဝျံ
२०म्हणून जगाच्या मूलतत्त्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन का होता?
21 တာနိ မာ သ္ပၖၑ မာ ဘုံက္ၐွ မာ ဂၖဟာဏေတိ မာနဝဲရာဒိၐ္ဋာန် ၑိက္ၐိတာံၑ္စ ဝိဓီန္
२१शिवू नको, चाखू नको, हातात घेऊ नको
22 အာစရန္တော ယူယံ ကုတး သံသာရေ ဇီဝန္တ ဣဝ ဘဝထ?
२२अशा नियमांतील सर्व गोष्टी या उपभोगाने नष्ट होणार्‍या गोष्टी आहेत.
23 တေ ဝိဓယး သွေစ္ဆာဘက္တျာ နမြတယာ ၑရီရက္လေၑနေန စ ဇ္ဉာနဝိဓိဝတ် ပြကာၑန္တေ တထာပိ တေ'ဂဏျား ၑာရီရိကဘာဝဝရ္ဒ္ဓကာၑ္စ သန္တိ၊
२३या गोष्टींत स्वेच्छेची उपासना, मनाची लीनता व शरीराची उपेक्षा असल्यामुळे ह्यात खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही.

< ကလသိနး 2 >