< ၂ ကရိန္ထိနး 10 >

1 ယုၐ္မတ္ပြတျက္ၐေ နမြး ကိန္တု ပရောက္ၐေ ပြဂလ္ဘး ပေါ်လော'ဟံ ခြီၐ္ဋသျ က္ၐာန္တျာ ဝိနီတျာ စ ယုၐ္မာန် ပြာရ္ထယေ၊
पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
2 မမ ပြာရ္ထနီယမိဒံ ဝယံ ယဲး ၑာရီရိကာစာရိဏော မနျာမဟေ တာန် ပြတိ ယာံ ပြဂလ္ဘတာံ ပြကာၑယိတုံ နိၑ္စိနောမိ သာ ပြဂလ္ဘတာ သမာဂတေန မယာစရိတဝျာ န ဘဝတု၊
माझे मागणे असे आहे, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात, त्यांच्याबरोबर कडकपणे बोलण्याचा मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मला त्यांच्याविरुद्ध कडक होण्याची गरज पडू नये.
3 ယတး ၑရီရေ စရန္တော'ပိ ဝယံ ၑာရီရိကံ ယုဒ္ဓံ န ကုရ္မ္မး၊
कारण, आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो.
4 အသ္မာကံ ယုဒ္ဓါသ္တြာဏိ စ န ၑာရီရိကာနိ ကိန္တွီၑွရေဏ ဒုရ္ဂဘဉ္ဇနာယ ပြဗလာနိ ဘဝန္တိ,
कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही.
5 တဲၑ္စ ဝယံ ဝိတရ္ကာန် ဤၑွရီယတတ္တွဇ္ဉာနသျ ပြတိဗန္ဓိကာံ သရွွာံ စိတ္တသမုန္နတိဉ္စ နိပါတယာမး သရွွသင်္ကလ္ပဉ္စ ဗန္ဒိနံ ကၖတွာ ခြီၐ္ဋသျာဇ္ဉာဂြာဟိဏံ ကုရ္မ္မး,
तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो.
6 ယုၐ္မာကမ် အာဇ္ဉာဂြာဟိတွေ သိဒ္ဓေ သတိ သရွွသျာဇ္ဉာလင်္ဃနသျ ပြတီကာရံ ကရ္တ္တုမ် ဥဒျတာ အာသ္မဟေ စ၊
आणि तुम्ही आज्ञापालनांत पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत.
7 ယဒ် ဒၖၐ္ဋိဂေါစရံ တဒ် ယုၐ္မာဘိ ရ္ဒၖၑျတာံ၊ အဟံ ခြီၐ္ဋသျ လောက ဣတိ သွမနသိ ယေန ဝိဇ္ဉာယတေ သ ယထာ ခြီၐ္ဋသျ ဘဝတိ ဝယမ် အပိ တထာ ခြီၐ္ဋသျ ဘဝါမ ဣတိ ပုနရွိဝိစျ တေန ဗုဓျတာံ၊
डोळ्यांपुढे आहे ते पाहा; आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी विश्वास असेल तर त्याने आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहोत.
8 ယုၐ္မာကံ နိပါတာယ တန္နဟိ ကိန္တု နိၐ္ဌာယဲ ပြဘုနာ ဒတ္တံ ယဒသ္မာကံ သာမရ္ထျံ တေန ယဒျပိ ကိဉ္စိဒ် အဓိကံ ၑ္လာဃေ တထာပိ တသ္မာန္န တြပိၐျေ၊
कारण, प्रभूने आम्हास जो अधिकार दिलेला आहे, तो तुमची उन्नती व्हावी म्हणून दिलेला आहे, तुमचा नाश करण्यास दिलेला नाही, त्याचा मी अधिक अभिमान मिरवल्यास मला लाज वाटणार नाही;
9 အဟံ ပတြဲ ရျုၐ္မာန် တြာသယာမိ ယုၐ္မာဘိရေတန္န မနျတာံ၊
म्हणजे मी पत्रांद्वारे भीती घालू पाहतो असे माझ्याविषयी कोणास वाटू नये.
10 တသျ ပတြာဏိ ဂုရုတရာဏိ ပြဗလာနိ စ ဘဝန္တိ ကိန္တု တသျ ၑာရီရသာက္ၐာတ္ကာရော ဒုရ္ဗ္ဗလ အာလာပၑ္စ တုစ္ဆနီယ ဣတိ ကဲၑ္စိဒ် ဥစျတေ၊
१०कारण ते म्हणतात की, “त्यांची पत्रे गंभीर व जोरदार असतात, पण तो शरीराने अशक्त आहे आणि त्याचे बोलणे ऐकण्याच्या लायकीचे नसते.”
11 ကိန္တု ပရောက္ၐေ ပတြဲ ရ္ဘာၐမာဏာ ဝယံ ယာဒၖၑား ပြကာၑာမဟေ ပြတျက္ၐေ ကရ္မ္မ ကုရွွန္တော'ပိ တာဒၖၑာ ဧဝ ပြကာၑိၐျာမဟေ တတ် တာဒၖၑေန ဝါစာလေန ဇ္ဉာယတာံ၊
११अशा लोकांनी हे समजून घ्यावे की, आम्ही जसे दूर असताना आमच्या पत्रांतील बोलण्यात असतो, तसे आम्ही जवळ असताना कृतीत असतो.
12 သွပြၑံသကာနာံ ကေၐာဉ္စိန္မဓျေ သွာန် ဂဏယိတုံ တဲး သွာန် ဥပမာတုံ ဝါ ဝယံ ပြဂလ္ဘာ န ဘဝါမး, ယတသ္တေ သွပရိမာဏေန သွာန် ပရိမိမတေ သွဲၑ္စ သွာန် ဥပမိဘတေ တသ္မာတ် နိရ္ဗ္ဗောဓာ ဘဝန္တိ စ၊
१२जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतःस स्वतःकडूनच मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबरच तुलना करीत असतात हा शहाणपणा नाही.
13 ဝယမ် အပရိမိတေန န ၑ္လာဃိၐျာမဟေ ကိန္တွီၑွရေဏ သွရဇ္ဇွာ ယုၐ္မဒ္ဒေၑဂါမိ ယတ် ပရိမာဏမ် အသ္မဒရ္ထံ နိရူပိတံ တေနဲဝ ၑ္လာဃိၐျာမဟေ၊
१३आम्ही आमच्या मर्यादेबाहेर अभिमान मिरवणार नाही; तर देवाने आम्हास लावून दिलेल्या आमच्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.
14 ယုၐ္မာကံ ဒေၑော'သ္မာဘိရဂန္တဝျသ္တသ္မာဒ် ဝယံ သွသီမာမ် ဥလ္လင်္ဃာမဟေ တန္နဟိ ယတး ခြီၐ္ဋသျ သုသံဝါဒေနာပရေၐာံ ပြာဂ် ဝယမေဝ ယုၐ္မာန် ပြာပ္တဝန္တး၊
१४कारण जणू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, अशाप्रकारे आम्ही मर्यादेबाहेर जात नाही कारण आम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवीत तुमच्यापर्यंत प्रथम पोहचलोच आहोत.
15 ဝယံ သွသီမာမ် ဥလ္လင်္ဃျ ပရက္ၐေတြေဏ ၑ္လာဃာမဟေ တန္နဟိ, ကိဉ္စ ယုၐ္မာကံ ဝိၑွာသေ ဝၖဒ္ဓိံ ဂတေ ယုၐ္မဒ္ဒေၑေ'သ္မာကံ သီမာ ယုၐ္မာဘိရ္ဒီရ္ဃံ ဝိသ္တာရယိၐျတေ,
१५आम्ही मर्यादा सोडून दुसर्‍यांच्या कामात अभिमान मिरवीत नाही; पण आम्हास आशा आहे की, जसा तुमचा विश्वास वाढेल तसा, आमच्या कामाच्या मर्यादेचे प्रमाण अधिक पसरत जाईल.
16 တေန ဝယံ ယုၐ္မာကံ ပၑ္စိမဒိက္သ္ထေၐု သ္ထာနေၐု သုသံဝါဒံ ဃောၐယိၐျာမး, ဣတ္ထံ ပရသီမာယာံ ပရေဏ ယတ် ပရိၐ္ကၖတံ တေန န ၑ္လာဃိၐျာမဟေ၊
१६म्हणजे, दुसर्‍यांच्या कार्यक्षेत्रात आधीच करण्यात आलेल्या कामाचा अभिमान न मिरवता, आम्ही तुमच्या पलीकडील प्रांतांत शुभवर्तमान सांगावे.
17 ယး ကၑ္စိတ် ၑ္လာဃမာနး သျာတ် ၑ္လာဃတာံ ပြဘုနာ သ ဟိ၊
१७पवित्र शास्त्र सांगते, “पण जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा.”
18 သွေန ယး ပြၑံသျတေ သ ပရီက္ၐိတော နဟိ ကိန္တု ပြဘုနာ ယး ပြၑံသျတေ သ ဧဝ ပရီက္ၐိတး၊
१८कारण स्वतःची प्रशंसा करणारा स्वीकृत नाही पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच स्वीकृत आहे.

< ၂ ကရိန္ထိနး 10 >