< ၁ ကရိန္ထိနး 3 >
1 ဟေ ဘြာတရး, အဟမာတ္မိကဲရိဝ ယုၐ္မာဘိး သမံ သမ္ဘာၐိတုံ နာၑက္နဝံ ကိန္တု ၑာရီရိကာစာရိဘိး ခြီၐ္ဋဓရ္မ္မေ ၑိၑုတုလျဲၑ္စ ဇနဲရိဝ ယုၐ္မာဘိး သဟ သမဘာၐေ၊
१बंधूंनो, आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले.
2 ယုၐ္မာန် ကဌိနဘက္ၐျံ န ဘောဇယန် ဒုဂ္ဓမ် အပါယယံ ယတော ယူယံ ဘက္ၐျံ ဂြဟီတုံ တဒါ နာၑက္နုတ ဣဒါနီမပိ န ၑက္နုထ, ယတော ဟေတောရဓုနာပိ ၑာရီရိကာစာရိဏ အာဓွေ၊
२मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही.
3 ယုၐ္မန္မဓျေ မာတ္သရျျဝိဝါဒဘေဒါ ဘဝန္တိ တတး ကိံ ၑာရီရိကာစာရိဏော နာဓွေ မာနုၐိကမာရ္ဂေဏ စ န စရထ?
३तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय व जगातील लोकांसारखे चालत नाही काय?
4 ပေါ်လသျာဟမိတျာပလ္လောရဟမိတိ ဝါ ယဒွါကျံ ယုၐ္မာကံ ကဲၑ္စိတ် ကဲၑ္စိတ် ကထျတေ တသ္မာဒ် ယူယံ ၑာရီရိကာစာရိဏ န ဘဝထ?
४कारण जेव्हा एक म्हणतो, “मी पौलाचा आहे,” आणि दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही साधारण मानवच आहात की नाही?
5 ပေါ်လး ကး? အာပလ္လော ရွာ ကး? တော် ပရိစာရကမာတြော် တယောရေကဲကသ္မဲ စ ပြဘု ရျာဒၖက် ဖလမဒဒါတ် တဒွတ် တယောရ္ဒွါရာ ယူယံ ဝိၑွာသိနော ဇာတား၊
५तर मग अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत.
6 အဟံ ရောပိတဝါန် အာပလ္လောၑ္စ နိၐိက္တဝါန် ဤၑွရၑ္စာဝရ္ဒ္ဓယတ်၊
६मी बी लावले, अपुल्लोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.
7 အတော ရောပယိတၖသေက္တာရာဝသာရော် ဝရ္ဒ္ဓယိတေၑွရ ဧဝ သာရး၊
७तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे.
8 ရောပယိတၖသေက္တာရော် စ သမော် တယောရေကဲကၑ္စ သွၑြမယောဂျံ သွဝေတနံ လပ္သျတေ၊
८जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत आणि प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजूरी मिळेल.
9 အာဝါမီၑွရေဏ သဟ ကရ္မ္မကာရိဏော်, ဤၑွရသျ ယတ် က္ၐေတြမ် ဤၑွရသျ ယာ နိရ္မ္မိတိး သာ ယူယမေဝ၊
९कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
10 ဤၑွရသျ ပြသာဒါတ် မယာ ယတ် ပဒံ လဗ္ဓံ တသ္မာတ် ဇ္ဉာနိနာ ဂၖဟကာရိဏေဝ မယာ ဘိတ္တိမူလံ သ္ထာပိတံ တဒုပရိ စာနျေန နိစီယတေ၊ ကိန္တု ယေန ယန္နိစီယတေ တတ် တေန ဝိဝိစျတာံ၊
१०देवाच्या कृपेद्वारे जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत, ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी.
11 ယတော ယီၑုခြီၐ္ဋရူပံ ယဒ် ဘိတ္တိမူလံ သ္ထာပိတံ တဒနျတ် ကိမပိ ဘိတ္တိမူလံ သ္ထာပယိတုံ ကေနာပိ န ၑကျတေ၊
११येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे, त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही.
12 ဧတဒ္ဘိတ္တိမူလသျောပရိ ယဒိ ကေစိတ် သွရ္ဏရူပျမဏိကာၐ္ဌတၖဏနလာန် နိစိနွန္တိ,
१२जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो,
13 တရှျေကဲကသျ ကရ္မ္မ ပြကာၑိၐျတေ ယတး သ ဒိဝသသ္တတ် ပြကာၑယိၐျတိ၊ ယတော ဟတောသ္တန ဒိဝသေန ဝဟ္နိမယေနောဒေတဝျံ တတ ဧကဲကသျ ကရ္မ္မ ကီဒၖၑမေတသျ ပရီက္ၐာ ဗဟ္နိနာ ဘဝိၐျတိ၊
१३तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील.
14 ယသျ နိစယနရူပံ ကရ္မ္မ သ္ထာသ္နု ဘဝိၐျတိ သ ဝေတနံ လပ္သျတေ၊
१४ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल, त्यास प्रतिफळ मिळेल.
15 ယသျ စ ကရ္မ္မ ဓက္ၐျတေ တသျ က္ၐတိ ရ္ဘဝိၐျတိ ကိန္တု ဝဟ္နေ ရ္နိရ္ဂတဇန ဣဝ သ သွယံ ပရိတြာဏံ ပြာပ္သျတိ၊
१५पण एखाद्याचे काम जळून जाईल व त्याचे नुकसान होईल तथापि तो स्वतः तारला जाईल परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.
16 ယူယမ် ဤၑွရသျ မန္ဒိရံ ယုၐ္မန္မဓျေ စေၑွရသျာတ္မာ နိဝသတီတိ ကိံ န ဇာနီထ?
१६तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय?
17 ဤၑွရသျ မန္ဒိရံ ယေန ဝိနာၑျတေ သော'ပီၑွရေဏ ဝိနာၑယိၐျတေ ယတ ဤၑွရသျ မန္ဒိရံ ပဝိတြမေဝ ယူယံ တု တန္မန္ဒိရမ် အာဓွေ၊
१७जर कोणी देवाच्या निवासस्थानाचा नाश करतो तर देव त्या व्यक्तीचा नाश करील; कारण देवाचे निवास्थान पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.
18 ကောပိ သွံ န ဝဉ္စယတာံ၊ ယုၐ္မာကံ ကၑ္စန စေဒိဟလောကသျ ဇ္ဉာနေန ဇ္ဉာနဝါနဟမိတိ ဗုဓျတေ တရှိ သ ယတ် ဇ္ဉာနီ ဘဝေတ် တဒရ္ထံ မူဎော ဘဝတု၊ (aiōn )
१८कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे. (aiōn )
19 ယသ္မာဒိဟလောကသျ ဇ္ဉာနမ် ဤၑွရသျ သာက္ၐာတ် မူဎတွမေဝ၊ ဧတသ္မိန် လိခိတမပျာသ္တေ, တီက္ၐ္ဏာ ယာ ဇ္ဉာနိနာံ ဗုဒ္ဓိသ္တယာ တာန် ဓရတီၑွရး၊
१९कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे; कारण असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.”
20 ပုနၑ္စ၊ ဇ္ဉာနိနာံ ကလ္ပနာ ဝေတ္တိ ပရမေၑော နိရရ္ထကား၊
२०आणि पुन्हा “परमेश्वर जाणतो की, ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत.”
21 အတဧဝ ကော'ပိ မနုဇဲရာတ္မာနံ န ၑ္လာဃတာံ ယတး သရွွာဏိ ယုၐ္မာကမေဝ,
२१म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारू नये कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
22 ပေါ်လ ဝါ အာပလ္လော ရွာ ကဲဖာ ဝါ ဇဂဒ် ဝါ ဇီဝနံ ဝါ မရဏံ ဝါ ဝရ္တ္တမာနံ ဝါ ဘဝိၐျဒွါ သရွွာဏျေဝ ယုၐ္မာကံ,
२२तर तो पौल किंवा अपुल्लोस किंवा केफा, जग, जीवन किंवा मरण असो, आताच्या गोष्टी असोत अथवा येणाऱ्या गोष्टी असोत, हे सर्व तुमचे आहे.
23 ယူယဉ္စ ခြီၐ္ဋသျ, ခြီၐ္ဋၑ္စေၑွရသျ၊
२३तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.