< Oufunuo 22 +
1 Shesho ontumi wandanga isoho elyemenze ege womi, amenze gali galabha nashi ebilauli. Gali afuma witengo elyeshimwene elya Ngolobhe na eshe Mwana Ngole.
१नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती.
2 Ashilile pahati piboma. Shila mshenje wisoho mwali nikwi elye womi, wawupapa ehaina ilongo na gabhele enzye mandondo, nakapupa shila mwezi. Amajani egikwi kwajili ya ponye we mataifa.
२नदीच्या दोन्ही काठांवर बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते प्रत्येक महिन्यास आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात,
3 Wala sepabhabhe namakhosi nantele. Itengo elyeshimwene elya Ngolobhe nelya Mwana Ngole libhabhe mhati eyemenze na asontozo bhakwe bhabhasontezewe.
३त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही; त्याच्यामध्ये देवाचे व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहिल. त्याचे दास त्याची सेवा करतील.
4 Bhayihulola pamaso na pa maso nanitawa lyakwe libhabhe pamwanya pamonji na maso gabho.
४आणि ते त्याचे मुख पाहतील व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल.
5 Sepaibha nosiku nantele; wala sepaibha na amahitaji egemwanga owetaala olwenje isanya husababu ya Gosi Ongolobhe ailavya pamwanya yabho bhape bhaitawala hani hani. (aiōn )
५त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील. (aiōn )
6 Ontumi wambozia, “Amazu ega gahwaminishe neloli. Ogosi Ongolobhe owe Mpepo ezia kuwa atumwilwe ontumi wakwe abhalanje asontezo bhakwe hahaibhoneha eshinanali.”
६नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू आहे, त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या दासांना कळवण्यासाठी आपला दूत पाठविला आहे.”
7 “Enya! Ewenza nanali! Abalikiwe yagogopa amazu gakuwa oweshitabu eshi.”
७“पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य! आहे.”
8 Awe, ne Yohana nengovwezye nagalolole amambo ega nehagovwa na galolele, nagwiye pansi nene pitagalila pamanama aga ntumi ahupute, ontumi yandanjile amambo ega.
८ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो.
9 Wambozia, “Osabhombe esho! Nane endisontezo nashi awe pandwemo na aholo bhahho asontezo, pandwemo nabhawogopa amazu ega egeshitabu eshi. Putaji Ongolobhe!”
९परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक दास आहे. देवाला नमन कर.”
10 Osaga, “Khome omhuri amazu agakuwa weshitabu eshi, maana ewakati upalamie.
१०नंतर देवदूत मला म्हणालाः “तू या संदेश वचनावर शिक्का मारून बंद करू नको; काळाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस; कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे.
11 Yashele sewe haki, ayedelelaje abhesewe haki. Yashele chafu eshe madili, na ayendelelaje abhechafu eshe madili. Owe haki. Ayendelele abhe haki yali takatifu, ayendelele abhe takatifu.”
११जो मनुष्य अनीतिमान आहे, तो अनीतिमान राहो, जो अमंगळ आहे, तो अमंगळ राहो. जो नीतिमान आहे तो नैतीक आचरण करीत राहो. जो पवित्र आहे, त्यास आणखी पवित्रपणाने चालू दे.”
12 “Enya! Ewenza nanali. Ne mposhezo zyane zilipandwemo nane, ahuposhezye shila omo alengane ne mbombo ya bhombile.
१२“पाहा, मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे,
13 Ane endi Alfa na Omega, wa Hwande na wa Malishilo, Wawande na Wamalishilo.
१३मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.
14 Bhabalikiwe bhala bhabhawoziwa amenda gabho aje bhapate ehaki eyalye afume hwikwi elye womi nahwinjile hwiboma ashilile humandyango.
१४आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत.
15 Hwonze huli embwa, abhitenga, amalaya, bhabhagoga, bhabhaputa esanamu, shila yagana nayashudila eshahidi owilenka.
१५परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.”
16 Ane, ne Yesu, etumile ontumi wane abhashudile ahusu amambo ega huu makanisa. Aneendi malaya humpapo ya Daudi, Entondwe eya Sapwiti yehwaha.”
१६“तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
17 Ompepo no bibi arusi ayanga, “Enzi!” Na omwene yatejelezyo ayanje, “Enzii!” Yayonti ya neshomela, na ayenze, yayonti yatiliha apate amenze ege womi wene.
१७आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
18 Ehusalifya shila mntu yahovwa amazu ya kuwa weshitabu eshi: Kama yeyote ataongeza katika hayo, Mungu atamuongezea mapigo yaliyoandikwa katika kitabu hiki.
१८या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्यास मी गंभीरपणे सावधान करतोः जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणील;
19 Nkashele omntu yoyonte abhawefye amazu aga mshitabu eshi esha ukuwa, Ongolobhe ayefya esehemu yakwe mwikwi elya womi na hwiboma ilinza, lyashele enongwa zyakwe zisimbilwe mhati yeshitabu eshi.
१९आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
20 Oyo yashuhudila amambo ega ayanga, “Ena! Ewenza nanali.” Ena! Enza, Ogosi oYesu!
२०जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.” आमेन, ये प्रभू येशू, ये.
21 Emposhelo ya Gosi oYesu ibhe na shila mntu lyoli. Amina.
२१प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो.