< Mathayo 27 >

1 Amasala gishandabhe akhafikha, khabhagosi wonti bha makuhani na bhazee bha bhantu bhakhaliye injama juu ya Yesu wapate hubude.
जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक लोक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला.
2 Bhakhapinya, bhakhanongozya, bhafishia hwa liwali u Pilato.
त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले.
3 Nantele u Yuda, yahali msaliti, akhalolile aje u Yesu tayari alomgwile, akhazungumie wawezya ivipande selasini ivi hela, hwabhagosi wa makuhani na bhazee,
तेव्हा येशू दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्यास शत्रूच्या हाती देणारा यहूदा पस्तावला, म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलांकडे परत आला.
4 na akhayanga, “Imbombile imbibhi ya huisaliti idada yisanga ilimbibhi.” Lakini bhakhamonzya, “lihutuhusu lyenu ate? Genyaye ego wewe.”
तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”
5 Nantele wavitanga pasi vila ivipande vinhela hwishibhanza, na ahasogola na huiyoje mwene.
तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.
6 Ugosi wa makuhani ahavyenga vila ivipande vi hela na ahayanga, “Sagashiza kuibheshe ihela ine mhazina, kwa sababu yi danda.”
मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे परमेश्वराच्या भवनाच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमांविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.”
7 Bhakhayangana peka ihela itumishe akalile ugonda gwa whumbile azyeshele abhajenu.
तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली.
8 Kwa sababu eyo ugunda ugwa likwiziwa “Guda gwi danda” hadi ilelo eshe.
त्यामुळे आजही त्या जागेला रक्ताचे शेत असे म्हणतात.
9 Nantele ela inongwa yikhayangwile na abhatumii u Yeremia liahatimila, aje, “Bhakhejile ivipande selasini ivi hela, ibeyi yihapangwilwe na bhantu bha Israeli hwa ajili yakwe,
तेव्हा यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण झाले त्याने म्हणले आहे की, “आणि इस्राएलाच्या काही वंशजांनी ज्याचे मोल ठरवले होते, त्याचे मोल ते तीस शेकेल, त्यांनी घेतले.
10 bhakhatumie ugonda gwa muwhumbaji nazi u Bwana shakhelezezye.”
१०मला प्रभू परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी ते कुंभाराच्या शेतासाठी दिले.”
11 Eshi u Yesu ahemeleye hwilongolela lya Liwali na uliwali akhamwozya, “Je! Awe uli mwene wa Wayahudi?” U Yesu akhajibu, “Awe uyejesho.”
११मग राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्यास प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
12 Lakini lwawasitakiwa na bhagosi wa makuhani na bhazee, saga ahajibu lyolyonti.
१२पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
13 Nantele u Pilato akhamuozya, “Sagauyuvyezye amashitaka gonti agakho?”
१३म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”
14 Lakini sanga akhajibu ineno hala lyenka akhaswinga uliwali.
१४परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही आणि पिलात आश्चर्यचकित झाला.
15 Hwisiku zisikulukulu ihali kawaida uliwali humungulile yapimyilwe weka yasalulilwe na winchi.
१५वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकांसाठी राज्यपालाने त्यांच्या निवडीप्रमाणे तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.
16 Uwakati uwo bhahali nuyoapinyilwe wimatata ilawa lyakwe yu Baraba.
१६तेव्हा तेथे एक बरब्बा नावाचा कुप्रसिद्ध कैदी होता.
17 Lwabhawungene peka upilato akhabha wuzya yunanu yamuhunza imungulile kwa ajili yunyu?” Ubaraba au Uyesu yahwetwa Klisiti?”
१७म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?”
18 Maana akhamenye aje tayari bhakhe kwa sababu bhavitililwe.
१८कारण त्यास कळले होते की, त्यांनी त्यास मत्सराने धरून दिले होते.
19 Wakati akheye hwitengo ililonzi, ushe wakwe akhatwalila ineno aje, “Usakawombe lyolyonti hwa muntu uyo yasanga alini mbibhi. Yaani indawile hani ilelo mundonto kwa ajili yakwe.”
१९तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.”
20 Ndipo abhagosi wa makuhani na bhazee bhakhabhakondelezya amakutano aje bhanabhe u Baraba, u Yesu afye.
२०पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व वडीलजनांनी लोकसमुदायाचे मन वळवले.
21 Uliwali akhabhawuzya, “Yunani kati ya bhabhile yamuhwa nza amwe ineshele?” Bhakhayanga, “Ubaraba.”
२१राज्यपालाने त्यांना विचारले, “मी या दोघांतून तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले, “बरब्बाला.”
22 U Pilato ahawawuzya, “Imombe wele u Yesu yahwetwa Klisiti?” Wonti bhahamuozyo, “Amayembe”
२२पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
23 Nape ahayanga, “Shunu likosashi awombile?” Lakini bhahojelela apwaje isauti hata humwanya hani, “Ayembe.”
२३आणि तो म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
24 Epo Upilato lwa saga awajiye awombe lyolyonti, ivurugu ziahandile ahenga amenze ahazuguzila inyobhe zyakwe hwilogolela ilya winchi, na yanje aje, “Ane sagandi ninogwa juu yi danda iya muntu uno yasanga alinibibhi. Genyanji ega mwe mwemwe.”
२४लोकांच्या पुढे आपले काही चालत नाही हे पिलाताने पाहिले. पण उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले व म्हटले, “या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा.”
25 Awanti wonti bhahayanga, “Idanda lyakwe liwe juu yetu na bhana wetu.”
२५सर्व लोक म्हणू लागले, “त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.”
26 Epo ahamungulila u Baraba wao, lakini ahakhoma amijeledi u Yesu na ahabhapela awene abhale hukhobhehanye.
२६मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. पण येशूला चाबकाचे फटके मारले व त्यास वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्याहाती सोपवून दिले.
27 Nantele abharugu bha liwali bhahamwenga u Yesu mpaka Praitorio ni kundi igosi lya bhalongu wonti bhakhamunganila.
२७नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाड्यात घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळी शिपायांची तुकडी जमवली.
28 Bhahavula amenda gwakwe na hukwatizye igololeli langi ishamamu.
२८त्यांनी त्याचे कपडे काढून व त्यास एक किरमिजी झगा घातला.
29 Tena bhahagomba itaji yi mivwa na bhaiwehe hwitwe lyakwe na hususye, bhahayanga, “Salamu, Wamwene wa Wayahudi?”
२९मग एक काट्यांचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेत दिला. मग शिपाई त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, “यहूद्यांचा राजा चिरायू होवो!”
30 Na bhaswelela amate, na bhahenga imwanzi na hukhome hwitwe.
३०आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेत घेऊन त्याच्या डोक्यावर मारले.
31 Wakati bhahususya bhakhavulile igolole na hukwatizye amenda gakwe, na hunogole abhale hukhobhehanye.
३१येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्यास घातले. मग ते त्यास वधस्तंभावर खिळायला घेऊन गेले.
32 Lwabhafuma hoze, bhahanola umuntu afume ilawa Krene ilawa likwa yu Simeoni, uyo bhakhanazimisya abhale nao ili anyumule ishikhomehayo shakwe.
३२ते बाहेर जात असता त्यांना एक शिमोन कुरनेकर नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्यास धरून त्याचा वधस्तंभ वाहायला लावले.
33 Lwabhafikha pala Pagaligotha, imaana yakwe, “Ieneo lya ifupa litwe.”
३३जेव्हा ते गुलगुथा “म्हणजे कवटीची जागा” नावाच्या ठिकाणी आले.
34 Bhakhapela siki yabhasnganyenye ni nyongo amwele. Lakini lwawonga saga ahamwela.
३४तेव्हा त्यांनी त्यास पित्तमिश्रित द्राक्षरस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
35 Lwabha khomehanya, bhahagabhana amenda gakwe bhahahoma ikura.
३५त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले.
36 Na bhahakhala na humwenye.
३६शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले.
37 Hwitwe lya Yesu bhahaweshele inongwa yakwe ihabhaziwanga, “Uno yu Yesu, umwene wa Wayahudi.”
३७आणि “हा यहूद्यांचा राजा येशू आहे” असे लिहिलेले आरोपपत्रक डोक्याच्या वरच्या बाजूला लावले.
38 Bhabhahupa bhabhile bhahakhobhe nywepeka numwene, weka ahali upande wa nelo wakwe na uwamwao wa humongo.
३८दोघां चोरांना, एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आले.
39 Bhala bhabhashilanga bhasosyanga bhahayizianga amatwe gao
३९जे जवळून जात होते ते आपली डोकी हलवून त्याची निंदा करून
40 na humozya, “Awe wawazaga anaganye ishibhanza na azenye husiku zitatu uyokole wewe! Nkuli mwana wa Ngulubhe, ikha pasi uyepe mumalabha!”
४०म्हणू लागले, हे परमेश्वराचे भवन मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या, स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.
41 Katika ihali yiyela abhagosi wa makuhani bhasosyanga peka na abhasimbi na abhazee, na humuozye,
४१तसेच मुख्य याजकांसह, नियमशास्त्र शिक्षक व वडीलासह इतरांसारखी त्याची चेष्टा करीत म्हणाले,
42 “Ahokoye abhanche. Yu mwene wa Wayahudi. Na ayishi pasi afume mumalabha, epo tinza humweteshe.
४२याने दुसऱ्यांना वाचवले, परंतु तो स्वतःला वाचवू शकत नाही. हा इस्राएलाचा राजा आहे. असेल, त्याने वधस्तंभावरून खाली यावे आणि मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.
43 Ahasobhenye Ungulobhe. Lekha Ungolobhe amwokole eshi nkashele ahuanza, nkashele ahuanza, nkashila ahayenje, 'Ane nene mwana wa Ngolobhe.”
४३तो देवावर विश्वास ठेवतो, देवाला तो पाहिजे असेल तर त्याने त्यास वाचवावे कारण तो म्हणत होता, मी देवाचा पुत्र आहे.
44 Na wala bhabhahupa bhabhakhomagenywe peka nu Yesu nape bhahayenje hususye.
४४तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.
45 Eshi afume msaa sita hwahali ahinsi munsi yonti hata saa tisa.
४५मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता.
46 Lwayafiha saa tisa, u Yesu ahalila husauti ingosi, “Eloi, Eloi, lama thabakithan?” Imana yakwe, “Ngolobhe wane, Ngolobhe wane mbona undeshile?”
४६सुमारे नवव्या ताशी, येशू मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
47 Uwakati uwo bhahali awamo bhemeleye pala bhahovya lwayanga, “Ahukwinza u Eliya.”
४७जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला बोलावत आहे.”
48 Haraka weka ahashembela ahwenje isifongo na huimyeme isha mwele ishikhali, ahaibhiha huwanya yikwi na hupele ili amwele.
४८त्यांच्यातला एक लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून त्यास प्यायला दिला.
49 Nape bhabhahasageye bhahayanga, “Neshe mwene, leshe tenye u Eliya nkahwenza humwokole.”
४९परंतु त्यांतील दुसरे म्हणाले, “त्याला एकटे राहू द्या, एलीया येऊन त्यास वाचवतो काय, ते आपण पाहू.”
50 Nantele u Yesu ahalila husauti ingosi aifumya iloho yakwe.
५०पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि त्याचा प्राण सोडला.
51 Enya, ipazia lya mshibhanza lyahazembukha isehemu zibhile, afume humwanya mpaka pasi. Na insi ihayingile, na amawe gahabazushe vipande.
५१पाहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला गेला, भूमी कापली, खडक फुटले.
52 Amakaburi gahugushe amabele gabhagolosu wichi bhabhahagonile utulo bhahazyoshile.
५२कबरी उघडल्या आणि जे पवित्रजन मरण पावले होते, ते उठवले गेले.
53 Bhahafumile mumakaburi lwawazyoha, bhahawinjila umji ugolosu, na bhahakhoneha na winchi.
५३ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशूचे पुनरूत्थान झाल्यावर ते लोक पवित्र नगरीत गेले आणि अनेकांनी त्यांना पाहिले.
54 Basi ula uakida na walabhahamwenyaga u Yesu bhahalola itetemeko na amambo gagahafumiye, bhahabha nuwongo sana nayanji aje, “Lyoli onu ahali mwana wa Ngolobhe.”
५४आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.”
55 Awashe winchi bhahafuatile u Yesu afume Hugalilaya ili humwombele bhahali pala humwenye afume hulali.
५५तेथे बऱ्याच स्त्रिया काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करीत या स्त्रिया गालील प्रांताहून त्याच्या मागोमाग आल्या होत्या.
56 Mhati yao bhahali, Umariam Magdarena, Umariamu umaye wa Yakobo na Josefu, na umaye wa wana wa Zebedayo.
५६त्यांच्यात मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई या तेथे होत्या.
57 Lwayafiha ilyebhela umuntu utajili afume Arimathayo, yahetelwa u Yusufu, nantele ahali mwanafunzi wa Yesu.
५७संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा अरिमथाईचा, एक धनवान मनुष्य तेथे आला. तो येशूचा अनुयायी होता.
58 Ahamalila u Pilato hunabhe ubele gwa Yesu. Upilato ahalajizya bhapele.
५८तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याचा हुकूम केला.
59 Uyusufu ahawejile ubele ahaupinya na menda gi sufi inzeru,
५९नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले.
60 ahaugonya mwikaburi lyakwe ipya lyalyahachonjilwe mwiwe, alafu ahawungulusya iwe igosi lyahazinga uniongo gwi kaburi ahasogolo.
६०आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला.
61 Umariamu Magdalena na Umariamu uweche bhahali pala, bhahenye pikaburi.
६१मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया कबरेसमोर बसल्या होत्या.
62 Isiku lilyahafuata lyahali lisiku lya maandalizi, abhagosi wa makuhani na Mafarisayo bhahawungeni peka hwa Pilato.
६२त्या दिवसास तयारीचा दिवस म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक लोक व परूशी पिलाताकडे गेले.
63 Bhahamuozya, “Bwana, tuzushe aje ula wilenkho lwahali momi ahajile, 'Baada yi siku zitatu anzazyoshe.'
६३ते म्हणाले, “साहेब, आम्हास आठवण आहे की, तो लबाड जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी तीन दिवसानी परत जीवनात येईल.’
64 Eshi lajizya aje ikaburi bhalinde sallama mpaka isiku ilyatatu. Nkasanga shisheshe abhanafunzi wakwe bhanza hweze humwibhe na wazayanje hwa wantu aje azyoshele afume mfye, na ilenkha ilyamwisho linzabhe libhibhi ashile ilyahwande.”
६४म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याची आज्ञा करा. कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांस सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”
65 U Pilato ahabhawuozya, “Eji abhalizi. Bhalaji muweshe usalama shamulolile.”
६५पिलात म्हणाला, “तुमच्याबरोबर पहारा घ्या, जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.”
66 Basi bhahabhalile aweshe usalama hwikaburi iwe lyahahomwa umuhuri naweshe abhalinzi.
६६म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.

< Mathayo 27 >