< Maluko 9 >
1 Ayanjile wabhene, “Lwoliiyanga hulimwi bhawili abhanthu abhabhimilile epha ambao hagabhaibhoja ufye shausilye utawala uwa Ngulubhi pawayinza wikhone.”
१येशू त्या लोकांस म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की, ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”
2 Na bada yinshikutanda, uYesu abhega aPetulo, Yakobo na Yohana palishimo numwene wigamba, bhene. Ndipo ahandile agaluhane mbele yao.
२सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले.
3 Amenda gakwe gaga luhana gana amulishe alabhe sana nabhe mazelu zaidi uzeluuwasa bhulavha wabhonthi munthi.
३त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शुभ्र करता येणार नाहीत, अशी झाली होती.
4 Phepo aEliya pamoja nu Mose bhahafumila witazi lwabho, bhali bhayanga nu Yesu.
४तेव्हा एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रकट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते.
5 U Petulo ajibula uYesu, “Umwalimo, shinza ati akhale epa, shimo shaliwe, shimo kwa ajili ya Mose na isha mwabhosha Eliya.”
५पेत्र येशूला म्हणाला, “रब्बी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
6 (Haga amenye ahawaziwa ayanje, bhahogopha sana.)
६पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्यास समजेना कारण ते भयभीत झाले होते.
7 Ibhingo lwa fumila nabha kwi shile. Ipo isauti ihafuma mwibhingo ihayanga, “Unu mwana wane uwingine. Mutejele zyaje yuyo.”
७तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
8 Ghafla, pali bha wenya sabha halola uyalinao palishimo, ila uYesu mwene.
८अचानक, त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही.
9 Pali bhahwiha afume wigamba, amulila huje bhasaheze hubhele umuntu numo gala gunti agabha galolile, paka Umwana wa Adamu piizhyuha afume wabhafwe.
९ते डोंगरावरून खाली येत असता, येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मरण पावलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”
10 Ipo paha ga uta amambo bhibho. Lelo bhayangana bhene kwa bhene lwenu imana yakwe “azyushe afume wa bhafwe”
१०म्हणून त्यांनीही गोष्ट त्यांच्यातच ठेवली, परंतु ते मरण पावलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते.
11 Bhaha bhuzya uYesu,”Yenu abhandishi bhaiga uEliya ayize nasonti?”
११त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?”
12 Abhabhula, “lwoli Eliya sagabhiza afume ivhintu vhunti. Yenu isimbilwe Mwana wa Adamu lazima apate amalabha gaminji navhitililwe?
१२तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?
13 Lelo iyanga hulimwi lelo uEliya ahezele, bhahabhomba shabhayingine nishishila shaiganile, nishi amasimbo shaga yanga ahusu umwene.”
१३मी तुम्हास सांगतो, एलीया आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे, त्यांना पाहिजे तसे त्यांनी त्याचे केले.”
14 Pabha habhuya wasudwa, bhaha ilola imbunga ingosi izyungulile na Masadukayo bhabisanyaga ahabho bhabisanyaga anabho.
१४नंतर ते शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांना त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय आहे आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्याच्याशी वाद करत आहेत असे त्यांना दिसले.
15 Pala pahalola, ibhunga yunti bhahashyiga nahunyilile hulamushe.
१५सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याचे स्वागत करण्यासाठी धावले.
16 Abha bhuzywa asundwa abhakwe, “Mubisanya nao kuhusu iyenu?”
१६येशूने शिष्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?”
17 Umuntu umo muhati yabho ahajibula, “Mwalimo ihale ta umwana wane huliwe; ana iroho iyithavu ihubhomba huje anganda yayanje,
१७तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही.
18 ihu fanya aje atete mamanje na hugwisye panzi, nafume ipofu mwilomu nasye amino naga gandane. Ihabhalabhile asundwa bhaho humwefye, lelo hagabhawezizwe.
१८आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”
19 Abhajibu, “Ishizazi ishasa shiwamini izakhale namwe humuda bhuli? Izawejelane namwe paka lii leti hulini? Mleteni kwangu.”
१९येशू त्यांना म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.”
20 Bhaleta umwana wakwe. Iroho inhavhu palalala uYesu, gafla ihapela ateteme. Usahala agwile paka panzi naafumhe ipovhu wilomu.
२०नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.
21 U Yesu ahabhuzya uyise, “Ihali ine ili awande muda ulyi?” Uyise ayanjile, “Aje afume uwana wakwe.
२१नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे.
22 Mumomumo itwala humwoto au mumenze naije la humwanga mizywe, kama uwezwa abhombe hahunthi utuhulumile natusaidile.”
२२पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.”
23 U Yesu abhulyile, “Akhashele uli tayali? Hala hantu hawezeha na waya yunthi uya wamini.”
२३येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.”
24 Ghafla uyise wa mwana ahalila nayanje huje, “Iwamini! Nisaidie asinte awamini wane.”
२४तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.”
25 Uwakati uYesu pahalola imbuga inyila abhale wabhene, ayikemela iroho inthavu nayanje, “awenohobubu uwasaga uhuvha, ihuwamuruleshe, usahinjile wamwene nanthele.”
२५येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”
26 Ahalila wikhone na huhangaisye umwana na iroho ihafumile. Umwana abhoneha uga afyile, Ipo abhinji bhayanjile, “Aje afyile,”
२६नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला.
27 Lelo uYesu amwega nukhono abhusywa, umwana ahimelila.
२७परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला.
28 Lula uYesu pahinjila muhatyi, asundwa bhakwe bhahabhuzya shisili, “Yenu satawezizye humwefye?”
२८नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्यास एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?”
29 Abhabhulile, “pipo ini haga iwepa ila pwavhile.”
२९येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचूनदुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.”
30 Bhahepa pala najendele wi Galilaya. Haga ahazanga umuntu yayuthi amanye pawilyi,
३०ते तेथून निघाले आणि गालील प्रांतातून प्रवास करीत चालले होते. हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती.
31 pipo amanyizywaga asudwa bhakwe. Abhabhulile, “Umwana wa Adamu atwalya makhono mwa bhantyu, nahugoje. Paivha afwile, baada yinsiku tatu aizyuha nanthele.”
३१कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्यास ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.”
32 Lelo haga bhaha mwelewa agawelezya iza, bhahogopa hubhuzywe.
३२पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते.
33 Ipo vhahafiha Karperinaumu. Wakati uhuo pali muhanthi nyumba abhuzizye, “Mwayanga naga yenu mwidala”?
३३पुढे ते कफर्णहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?”
34 Lelo bhaha puma mie. Yani bisanya mwidala huje yunanu uwazabhe gosi zaidi.
३४परंतु ते गप्प राहिले कारण वाटेत त्यांनी सर्वांत मोठा कोण याविषयी चर्चा चालली होती.
35 Ahakhala pansi abhakuga ilongo na bhamo bhabhilye pamo, ayanga nabho, “Umuntu khawaza abhe wa kwanza, nilazima abhe wa malishilo na wabhatumishile bha bhunthi.”
३५मग येशू खाली बसला, त्याने बाराजणांना बोलावून त्यांना म्हटले, “जर कोणाला पहिले व्हावयाचे असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
36 Ahamwanya umwana udodo abhiha pahati yabho. Amwega makhono gakwe, ayanga,
३६मग येशूने एक बालकास घेऊन त्यांच्यामध्ये उभे केले व त्यांना म्हणाला?
37 “Wabhodthi nishi unu witawa lyane, oyaabha amboshile ninengashele umuntu aposha, saga aphola nene tu, lelo nayula uwantumile.”
३७“जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठवले त्याचाही स्वीकार करतो.”
38 U Yohana abhula, “Umwalimu tulolile umuntu kwa wefya iphepo witawa lwaho tuhathubhila, pepo haga atidaga anti.”
३८योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूते काढताना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
39 Lelo uYesu ayanga, “Munganda hukhane pipo numo uwaibhomba imbombo ingosi witawa lwani na ipi pamandi ayanje injango imbivhi lwa lyunti.
३९परंतु येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही.
40 Wa bhuntyi uwasagali tofauti natwe ali hu pande witu.
४०जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
41 Wabhuntyi uya yipela ishikombe iminzye agamwele pipo uli Kilisite, lyoli imba bhala hagaitezya usahala gwakwe.
४१मी तुम्हास खरे सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हास जो कोणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.”
42 Wa bhuntyi uyakosezwa hawa bhali bhali bhadodo abhanamini anye, wali shinza wa mwene apinyilwe inganga ilwasyele huzhingo natagwe muzhumbi.
४२माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे.
43 Khamba ukhono gwaho kha hukosela gundumulaje. Hubha washi awinjile huwomi bila khono kwiko awinjile kwenye hulozi ulinamakhono gutyi. Mula mumwoto “ugwasaguzimiha”. (Geenna )
४३जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे. (Geenna )
44 (Inatila: Ulutanani ulu, “Pamahali ambapo intofyi sazifwa numwoto ugwasazimiha.” saga uwili katika nakala zakale).
४४
45 Igaga khashele likosezywa, lidumula. Je shiza huliwe awijile huwumi khalilema, kuliko atagwe hulozi namagaga gavhili. (Geenna )
४५आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे. (Geenna )
46 (Inatila: Ulutanani ulu, “Amahali itofi hazifwa numwoto usiyoweza azimishe hagagu wili nakala izihali).
४६
47 Kama iliso lwaho khahukosezwa lisenyaje shinza hwilwe awinjile Utawala uwa Ngulubhi uli niso limo, kuliko kwingia ukiwa maso guntyi ulaje huje mwoto. (Geenna )
४७जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे (Geenna )
48 Pala apali nintafyi izya sazifya, numwoto ugwa saguzimia.
४८
49 Lelo phipo shila muntyu aifyula numwoto.
४९कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल.
50 Umwonyi mwinza, lelo umwonyi khagutezye uwiza wakwe, gubhabhombe bhuli uwinza bhuye nathyena? Munje mwonyi muhatyi yinyu, na uwaushe wa shila umo.”
५०“मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने रहा.”