< Псалтирь 92 >
1 Псалом. Песнь на день субботний. Благо есть славить Господа и петь имени Твоему, Всевышний,
१शब्बाथ दिवसाचे स्तोत्र परमेश्वराची उपकारस्तुती करणे आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे.
2 возвещать утром милость Твою и истину Твою в ночи,
२सकाळी तुझे वात्सल्य, आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे.
3 на десятиструнном и псалтири, с песнью на гуслях.
३दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे.
4 Ибо Ты возвеселил меня, Господи, творением Твоим: я восхищаюсь делами рук Твоих.
४कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन.
5 Как велики дела Твои, Господи! дивно глубоки помышления Твои!
५हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.
6 Человек несмысленный не знает, и невежда не разумеет того.
६पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,
7 Тогда как нечестивые возникают, как трава, и делающие беззаконие цветут, чтобы исчезнуть на веки,
७दुष्ट गवताप्रमाणे उगवले, आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.
8 Ты, Господи, высок во веки!
८परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील.
9 Ибо вот, враги Твои, Господи, - вот, враги Твои гибнут, и рассыпаются все делающие беззаконие;
९हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत.
10 а мой рог Ты возносишь, как рог единорога, и я умащен свежим елеем;
१०पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.
11 и око мое смотрит на врагов моих, и уши мои слышат о восстающих на меня злодеях.
११माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.
12 Праведник цветет, как пальма, возвышается подобно кедру на Ливане.
१२नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.
13 Насажденные в доме Господнем, они цветут во дворах Бога нашего;
१३जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.
14 они и в старости плодовиты, сочны и свежи,
१४वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील.
15 чтобы возвещать, что праведен Господь, твердыня моя, и нет неправды в Нем.
१५हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.