< Псалтирь 55 >
1 Начальнику хора. На струнных орудиях. Учение Давида. Услышь, Боже, молитву мою и не скрывайся от моления моего;
१मुख्य गायकासाठी; तंतूवाद्दावरचे दाविदाचे स्तोत्र. हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव, आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस.
2 внемли мне и услышь меня; я стенаю в горести моей, и смущаюсь
२देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे माझ्या संकटात मला विसावा नाही.
3 от голоса врага, от притеснения нечестивого, ибо они возводят на меня беззаконие и в гневе враждуют против меня.
३माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर संकट आणतात, आणि द्वेषात माझा पाठलाग करतात.
4 Сердце мое трепещет во мне, и смертные ужасы напали на меня;
४माझे हृदय फार दुखणाईत आहे, आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे.
5 страх и трепет нашел на меня, и ужас объял меня.
५भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, आणि भयाने मला ग्रासले आहे.
6 И я сказал: “кто дал бы мне крылья, как у голубя? я улетел бы и успокоился бы;
६मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो.
7 далеко удалился бы я, и оставался бы в пустыне;
७मी खूप दूर भटकत गेलो असतो. मी रानात राहिलो असतो.
8 поспешил бы укрыться от вихря, от бури”.
८वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो.
9 Расстрой, Господи, и раздели языки их, ибо я вижу насилие и распри в городе;
९प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर. कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत.
10 днем и ночью ходят они кругом по стенам его; злодеяния и бедствие посреди его;
१०दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात; अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत.
11 посреди его пагуба; обман и коварство не сходят с улиц его:
११दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे, जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही.
12 ибо не враг поносит меня, - это я перенес бы; не ненавистник мой величается надо мною, от него я укрылся бы;
१२कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते.
13 но ты, который был для меня то же, что я, друг мой и близкий мой,
१३परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त.
14 с которым мы разделяли искренние беседы и ходили вместе в дом Божий.
१४एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती. आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो.
15 Да найдет на них смерть; да сойдут они живыми в ад, ибо злодейство в жилищах их, посреди их. (Sheol )
१५मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो. जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे. (Sheol )
16 Я же воззову к Богу, и Господь спасет меня.
१६मी तर देवाला हाक मारीन, आणि परमेश्वर मला तारील.
17 Вечером и утром и в полдень буду умолять и вопиять, и Он услышит голос мой,
१७मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन. आणि तो माझी वाणी ऐकेल.
18 избавит в мире душу мою от восстающих на меня, ибо их много у меня;
१८माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे. कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते.
19 услышит Бог, и смирит их от века Живущий, потому что нет в них перемены; они не боятся Бога,
१९देव, जो पुरातन काळापासून आहे, तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला) ते मनुष्ये बदलत नाहीत; ती देवाला भीत नाहीत.
20 простерли руки свои на тех, которые с ними в мире, нарушили союз свой;
२०माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे. त्याने आपला करार मोडला आहे.
21 уста их мягче масла, а в сердце их вражда; слова их нежнее елея, но они суть обнаженные мечи.
२१त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे, परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे. त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत, तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे.
22 Возложи на Господа заботы твои, и Он поддержит тебя. Никогда не даст Он поколебаться праведнику.
२२तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुला आधार देईल. तो नितीमानाला कधी पडू देणार नाही.
23 Ты, Боже, низведешь их в ров погибели; кровожадные и коварные не доживут и до половины дней своих. А я на Тебя, Господи, уповаю.
२३परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील; घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन.