< Псалтирь 45 >
1 Начальнику хора. На музыкальном орудии Шошан. Учение. Сынов Кореевых. Песнь любви. Излилось из сердца моего слово благое; я говорю: песнь моя о Царе; язык мой - трость скорописца.
१मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे शोशन्नीम (म्हणजे भूकमले) या नावाच्या रागावर बसवलेले मस्कील (शिक्षण) प्रीतीचे स्तोत्र. माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते, राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन, लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात.
2 Ты прекраснее сынов человеческих; благодать излилась из уст Твоих; посему благословил Тебя Бог на веки.
२तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस. तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे, यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे.
3 Препояшь Себя по бедру мечом Твоим, Сильный, славою Твоею и красотою Твоею,
३हे बलवाना, तू आपली तलवार मांडीला बांध, आपले वैभव आणि आपला प्रताप धारण कर.
4 и в сем украшении Твоем поспеши, воссядь на колесницу ради истины и кротости и правды, и десница Твоя покажет Тебе дивные дела.
४तू आपल्या सत्याने, नम्रतेने, न्यायीपणामध्ये विजयाने स्वारी कर, तुझा उजवा हात तुला भयानक गोष्टी शिकवेल.
5 Остры стрелы Твои; - народы падут пред Тобою, - они - в сердце врагов Царя.
५तुझे बाण तीक्ष्ण आहेत. लोक तुझ्या पायाखाली पडतील. तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत.
6 Престол Твой, Боже, вовек; жезл правоты - жезл царства Твоего.
६देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे. तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे.
7 Ты возлюбил правду и возненавидел беззаконие, посему помазал Тебя, Боже, Бог Твой елеем радости более соучастников Твоих.
७तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला. यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे.
8 Все одежды Твои, как смирна и алой и касия; из чертогов слоновой кости увеселяют Тебя.
८तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे.
9 Дочери царей между почетными у Тебя; стала царица одесную Тебя в Офирском золоте.
९राजांच्या मुली तुझ्या सन्मान्य स्रीयांच्यामध्ये आहेत. राणी ओफिराच्या सोन्याने शृंगारलेली तुझ्या उजव्या बाजूस उभी आहे.
10 Слыши, дщерь, и смотри, и приклони ухо твое, и забудь народ твой и дом отца твоего.
१०मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.
11 И возжелает Царь красоты твоей; ибо Он Господь твой, и ты поклонись Ему.
११अशाने राजा तुझ्या सौंदर्याची आवड धरणार, तो तुझा स्वामी आहे, तू त्याचा आदर कर.
12 И дочь Тира с дарами, и богатейшие из народа будут умолять лице Твое.
१२सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
13 Вся слава дщери Царя внутри; одежда ее шита золотом;
१३राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे, तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत.
14 в испещренной одежде ведется она к Царю; за нею ведутся к Тебе девы, подруги ее,
१४तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल. तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील.
15 приводятся с весельем и ликованьем, входят в чертог Царя.
१५ते आनंदात व हर्षात नेल्या जातील. ते राजाच्या महालात प्रवेश करतील.
16 Вместо отцов Твоих, будут сыновья Твои; Ты поставишь их князьями по всей земле.
१६तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले राज्य करतील. ज्यांना तू सर्व पृथ्वीत अधिपती करशील.
17 Сделаю имя Твое памятным в род и род; посему народы будут славить Тебя во веки и веки.
१७तुझे नाव सर्व पिढ्या आठवतील असे मी करीन. म्हणून लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील.