< Псалтирь 149 >

1 Аллилуия. Пойте Господу песнь новую; хвала Ему в собрании святых.
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
2 Да веселится Израиль о Создателе своем; сыны Сиона да радуются о Царе своем.
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
3 да хвалят имя Его с ликами, на тимпане и гуслях да поют Ему,
ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
4 ибо благоволит Господь к народу Своему, прославляет смиренных спасением.
कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.
5 Да торжествуют святые во славе, да радуются на ложах своих.
भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
6 Да будут славословия Богу в устах их, и меч обоюдоострый в руке их,
देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
7 для того, чтобы совершать мщение над народами, наказание над племенами,
यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी.
8 заключать царей их в узы и вельмож их в оковы железные,
ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
9 производить над ними суд писанный. Честь сия - всем святым Его. Аллилуия.
ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा.

< Псалтирь 149 >