< Псалтирь 138 >
1 Давида. Славлю Тебя всем сердцем моим, пред богами пою Тебе, что Ты услышал все слова уст моих.
१दाविदाचे स्तोत्र मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
2 Поклоняюсь пред святым храмом Твоим и славлю имя Твое за милость Твою и за истину Твою, ибо Ты возвеличил слово Твое превыше всякого имени Твоего.
२मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहेस.
3 В день, когда я воззвал, Ты услышал меня, вселил в душу мою бодрость.
३मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
4 Прославят Тебя, Господи, все цари земные, когда услышат слова уст Твоих
४हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
5 и воспоют пути Господни, ибо велика слава Господня.
५खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
6 Высок Господь: и смиренного видит, и гордого узнает издали.
६कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
7 Если я пойду посреди напастей, Ты оживишь меня, прострешь на ярость врагов моих руку Твою, и спасет меня десница Твоя.
७जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
8 Господь совершит за меня! Милость Твоя, Господи, вовек: дело рук Твоих не оставляй.
८परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.