< Иов 26 >
1 И отвечал Иов и сказал:
१नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 как ты помог бессильному, поддержал мышцу немощного!
२“बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले.
3 Какой совет подал ты немудрому и как во всей полноте объяснил дело!
३बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले.
4 Кому ты говорил эти слова, и чей дух исходил из тебя?
४तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले.
5 Рефаимы трепещут под водами, и живущие в них.
५बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत.
6 Преисподняя обнажена пред Ним, и нет покрывала Аваддону. (Sheol )
६देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत: ला झाकून घेवू शकत नाही. (Sheol )
7 Он распростер север над пустотою, повесил землю ни на чем.
७त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.
8 Он заключает воды в облаках Своих, и облако не расседается под ними.
८तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो, तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही.
9 Он поставил престол Свой, распростер над ним облако Свое.
९तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो.
10 Черту провел над поверхностью воды, до границ света со тьмою.
१०त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली.
11 Столпы небес дрожат и ужасаются от грозы Его.
११त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकीत होतात.
12 Силою Своею волнует море и разумом Своим сражает его дерзость.
१२तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो.
13 От духа Его - великолепие неба; рука Его образовала быстрого скорпиона.
१३त्याचा नि: श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
14 Вот, это части путей Его; и как мало мы слышали о Нем! А гром могущества Его кто может уразуметь?
१४पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?”