< Исаия 46 >
1 Пал Вил, низвергся Нево; истуканы их - на скоте и вьючных животных; ваша ноша сделалась бременем для усталых животных.
१बेल खाली वाकला आहे, नबो झुकला आहे; त्यांच्या मूर्तींचे ओझे जनावरांवर वाहून नेण्यासाठी लादले आहे. या वाहून नेण्याच्या मूर्त्यांचे भारी ओझे थकलेल्या जनावरांवर लादले आहे.
2 Низверглись, пали вместе; не могли защитить носивших, и сами пошли в плен.
२ते एकदम लवत आहेत, गुडघे टेकतात; ते प्रतिमा सांभाळू शकत नाहीत, परंतु ते स्वतःही बंदीवासात जातात.
3 Послушайте Меня, дом Иаковлев и весь остаток дома Израилева, принятые Мною от чрева, носимые Мною от утробы матерней:
३याकोबाच्या घराण्या आणि याकोबाच्या घराण्यातील वाचलेले सर्व तुम्ही, ज्या तुम्हास मी जन्माच्या पूर्वीपासून, गर्भापासून वाहीले आहे. माझे ऐका.
4 и до старости вашей Я тот же буду, и до седины вашей Я же буду носить вас; Я создал и буду носить, поддерживать и охранять вас.
४तुमच्या म्हातारपणापर्यंतही मी आहे आणि तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वाहून नेईन. मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल, मी वाहून तुमचे रक्षण करीन.
5 Кому уподобите Меня, и с кем сравните, и с кем сличите, чтобы мы были сходны?
५तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल? आणि मला कोणाशी सदृश्य लेखाल, या करता त्यांच्याशी आमची तुलना होईल?
6 Высыпают золото из кошелька и весят серебро на весах, и нанимают серебряника, чтобы он сделал из него бога; кланяются ему и повергаются перед ним;
६लोक पिशवीतून सोने ओततात आणि चांदी तराजूने तोलतात. ते सोनाराला मोलाने ठेवतात आणि तो त्यांचा देव करतो; ते नतमस्तक होतात आणि उपासना करतात.
7 поднимают его на плечи, несут его и ставят его на свое место; он стоит, с места своего не двигается; кричат к нему, - он не отвечает, не спасает от беды.
७ते आपल्या खांद्यांवर उचलून घेतात आणि वाहून नेतात; तो नेऊन त्याच्या जागी ठेवतात आणि तो त्याच्या जागेवर उभा राहतो व त्या जागेतून हालत नाही. ते त्यास आरोळी मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही किंवा कोणालाही त्याच्या संकटातून वाचवत नाही.
8 Вспомните это и покажите себя мужами; примите это, отступники, к сердцу;
८या गोष्टींबद्दल विचार करा; तुम्ही बंडखोरांनो! कधीही दुर्लक्ष करू नका.
9 вспомните прежде бывшее, от начала века, ибо Я Бог, и нет иного Бога, и нет подобного Мне.
९प्राचीन काळच्या, पूर्वीच्या गोष्टीबद्दल विचार करा, कारण मी देव आहे आणि दुसरा कोणी नाही, मी देव आहे आणि माझ्यासारखा कोणीच नाही.
10 Я возвещаю от начала, что будет в конце, и от древних времен то, что еще не сделалось, говорю: Мой совет состоится, и все, что Мне угодно, Я сделаю.
१०मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत, त्या मी आधीपासून सांगत आलो आहे. मी म्हणतो, “माझ्या योजना सिद्धीस जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन.”
11 Я воззвал орла от востока, из дальней страны, исполнителя определения Моего. Я сказал, и приведу это в исполнение; предначертал, и сделаю.
११मी पूर्वेककडून एका हिंस्त्र पक्षाला, माझ्या निवडीचा मनुष्य दूरच्या देशातून बोलावतो; होय, मी बोललो आहे; ते मी पूर्णही करीन; माझा उद्देश आहे, मी तोसुध्दा पूर्ण करीन.
12 Послушайте Меня, жестокие сердцем, далекие от правды:
१२चांगले करण्यापासून लांब राहणाऱ्या कठोर मनाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐका.
13 Я приблизил правду Мою, она не далеко, и спасение Мое не замедлит; и дам Сиону спасение, Израилю славу Мою.
१३मी आपला न्याय जवळ आणत आहे; तो फार दूर नाही आणि माझे तारण थांबणार नाही; आणि मी सियोनाला तारण देईन आणि माझी शोभा इस्राएलास देईन.