< 1-я Паралипоменон 10 >
1 Филистимляне воевали с Израилем, и побежали Израильтяне от Филистимлян, и падали пораженные на горе Гелвуе.
१आणि पलिष्टी इस्राएलाविरूद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले.
2 И погнались Филистимляне за Саулом и сыновьями его, и убили Филистимляне Ионафана и Авинадава и Мелхисуя, сыновей Сауловых.
२पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले.
3 Сражение против Саула усилилось, и стрелки устремились на него, так что он изранен был стрелками.
३शौलाविरूद्ध त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्यास गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता.
4 И сказал Саул оруженосцу своему: обнажи меч твой и заколи меня им, чтобы не пришли эти необрезанные и не надругались надо мною. Но оруженосец не решился, потому что очень испугался. Тогда Саул взял меч и пал на него.
४नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक. नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाइट रीतीने वागतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही, तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वत: ची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला.
5 Оруженосец его, увидев, что Саул умер, и сам пал на меч и умер.
५जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले, तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेही तलवार उपसून त्यावर पडला व मेला.
6 И умер Саул, и три сына его, и весь дом его вместе с ним умер.
६अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले.
7 Когда увидели Израильтяне, которые были в долине, что все бегут и что Саул и сыновья его умерли, то оставили города свои и разбежались; а Филистимляне пришли и поселились в них.
७जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्राएल मनुष्याने पाहिले की, शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यामध्ये राहू लागले.
8 На другой день пришли Филистимляне обирать убитых, и нашли Саула и сыновей его, павших на горе Гелвуйской,
८मग असे झाले की, दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले.
9 и раздели его, и сняли с него голову его и оружие его, и послали по земле Филистимской, чтобы возвестить о сем пред идолами их и пред народом.
९त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकांस कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले.
10 И положили оружие его в капище богов своих, и голову его воткнули в доме Дагона.
१०त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.
11 И услышал весь Иавис Галаадский все, что сделали Филистимляне с Саулом.
११पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले.
12 И поднялись все люди сильные, взяли тело Саулово и тела сыновей его, и принесли их в Иавис, и похоронили кости их под дубом в Иависе, и постились семь дней.
१२तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनिक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एला वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
13 Так умер Саул за свое беззаконие, которое он сделал пред Господом, за то, что не соблюл слова Господня и обратился к волшебнице с вопросом,
१३शौल परमेश्वराशी अविश्वासू होता म्हणून त्यास मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पाळन केले नाही, परंतु भूतविद्या प्रवीण स्रिकडे सल्ला विचारण्यास गेला.
14 а не взыскал Господа. За то Он и умертвил его, и передал царство Давиду, сыну Иессееву.
१४त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही. म्हणून परमेश्वराने त्यास मारले आणि इशायाचा पुत्र दावीद याच्याकडे राज्य सोपवले.