< Zacarias 12 >

1 Uma revelação da palavra de Iavé a respeito de Israel: Javé, que estende os céus e lança os alicerces da terra, e forma o espírito do homem dentro dele diz:
इस्राएलाबद्दल परमेश्वराचे वचन: ज्याने आकाश विस्तारले आणि पृथ्वीचे पाये घातले, जो मनुष्याच्या आत त्यांच्या आत्म्याची निर्मिती करतो, तो परमेश्वर म्हणतो:
2 “Eis que farei de Jerusalém um cálice de roda para todos os povos vizinhos, e será também sobre Judá no cerco contra Jerusalém.
“पाहा! मी यरूशलेमेला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांना गुंगी आणणारा प्याला बनवीन. यरूशलेमेला वेढतील तेव्हा यहूदाचेही तसेच होईल.
3 Acontecerá nesse dia que farei de Jerusalém uma pedra pesada para todos os povos. Todos os que se sobrecarregarem com ela serão gravemente feridos, e todas as nações da terra serão reunidas contra ela.
त्या दिवसात मी यरूशलेमेला सर्व राष्ट्रांसाठी एक प्रचंड मोठ्या दगडाप्रमाणे करीन, तो त्या सर्वांना भारी होईल. जो त्या दगडाला उचलण्याचा प्रयत्न करील, तो स्वत: च जखमी होईल आणि जगातील सर्व राष्ट्रे यरूशलेमेच्या विरुध्द लढावयास एकत्र येतील.”
4 Naquele dia”, diz Yahweh, “eu atacarei cada cavalo com terror e seu cavaleiro com loucura”. Abrirei meus olhos sobre a casa de Judá, e baterei em todos os cavalos dos povos com cegueira”.
“पण, त्या दिवसामध्ये, मी घोड्याला भीतीने बिथरवीन आणि त्यामुळे प्रत्येक घोडेस्वाराचा गोंधळ उडेल. मी माझी कृपामय दृष्टी यहूदाच्या घराण्याकडे लावीन आणि मी शत्रूच्या प्रत्येक घोड्यांला अंधळे करीन, असे परमेश्वर म्हणतो.
5 Os chefes de Judá dirão em seu coração: “Os habitantes de Jerusalém são minha força em Iavé dos Exércitos seu Deus”.
मग यहूदाचे पुढारी आपापल्या मनात विचार करतील, ‘यरूशलेमेतील राहणारे रहिवासी त्यांचा देव सैन्यांचा परमेश्वर, याच्या ठायी माझे सामर्थ्य असे आहेत.’
6 Naquele dia farei os chefes de Judá como uma panela de fogo entre lenha, e como uma tocha flamejante entre feixes. Eles devorarão todos os povos vizinhos à direita e à esquerda; e Jerusalém habitará mais uma vez em seu próprio lugar, mesmo em Jerusalém.
त्या दिवसामध्ये मी यहूदाच्या पुढाऱ्यांना लाकडांमधील आगीप्रमाणे बनवीन. वणव्यात उभे पीक जसे भस्मसात होते, तसे ते त्यांच्या सभोवतीच्या सर्व शत्रूंचा नाश करतील. यरूशलेमवासी पुन्हा आपल्या स्वतःच्या पूर्वीच्या जागी वसतील.”
7 Yahweh também salvará primeiro as tendas de Judá, que a glória da casa de Davi e a glória dos habitantes de Jerusalém não sejam ampliadas acima de Judá.
परमेश्वर, प्रथम, यहूदाच्या तंबूंना वाचवील म्हणजे यरूशलेमेमधील राहणाऱ्यांचे आणि दावीदाच्या घराण्यातील लोकांचे गौरव यहूदापेक्षा मोठे होणार नाही.
8 Naquele dia, Javé defenderá os habitantes de Jerusalém. Aquele que for fraco entre eles naquele dia será como Davi, e a casa de Davi será como Deus, como o anjo de Javé diante deles.
त्या दिवशी, परमेश्वर यरूशलेमेतील रहिवाश्यांना वाचवील; त्यातील जो अतिदुर्बल मनुष्यसुध्दा दावीदासारखा वीर बनेल आणि दावीदाचे घराणे देवासमान होईल म्हणजे ते परमेश्वराच्या दूताप्रमाणे पुढे चालणारे होतील.
9 Acontecerá naquele dia, que procurarei destruir todas as nações que vierem contra Jerusalém.
परमेश्वर म्हणतो, त्यादिवशी, यरूशलेमेशी युध्द करण्यास आलेल्या राष्ट्रांना नाश करण्याचा मी निर्धार करीन.
10 derramarei sobre a casa de Davi e sobre os habitantes de Jerusalém o espírito de graça e de súplica. Eles olharão para mim quem trespassaram; e chorarão por ele como se chorasse por seu único filho, e chorarão amargamente por ele como se chorasse por seu primogênito.
१०“मी दावीदाच्या घराण्यात आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकात करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ ला भोसकले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु: ख होते, तेवढेच दु: ख त्यांना होईल.
11 Naquele dia haverá um grande luto em Jerusalém, como o luto de Hadadrimmon no vale de Megiddo.
११त्यावेळी यरूशलेमेची शोककळा मगिद्दोनच्या सपाट भूमीत हदाद्रिम्मोनाच्या मृत्यूसमयी झालेल्या आक्रोशासारखी असेल.
12 A terra chorará, cada família à parte; a família da casa de Davi à parte, e suas esposas à parte; a família da casa de Natã à parte, e suas esposas à parte;
१२देश विलाप करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे होतील, आक्रोश करतील. दावीदाच्या कुळातील पुरुष एकीकडे, तर त्यांच्या स्त्रिया दुसरीकडे आक्रंदन करतील. नाथानाचे घराणे व त्यांच्या बायकादेखील वेगवेगळा विलाप करतील.
13 a família da casa de Levi à parte, e suas esposas à parte; a família dos Shimeítas à parte, e suas esposas à parte;
१३लेवी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगवेगळा शोक करतील. शिमी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगवेगळा शोक करतील.
14 todas as famílias que permanecerem, cada família à parte, e suas esposas à parte.
१४आणि इतर सर्व कुळांतले लोक व त्यांच्या स्त्रिया स्वतंत्रपणे शोक करतील.”

< Zacarias 12 >