< Rute 1 >
1 Nos dias em que os juízes julgavam, havia uma fome na terra. Um certo homem de Belém Judá foi viver no país de Moab com sua esposa e seus dois filhos.
१मग असे झाले की शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला आणि यहूदातील बेथलेहेम नगरातील कोणी एक मनुष्य आपली पत्नी व दोन पुत्रांसह मवाब देशी गेला.
2 O nome do homem era Elimelech, e o nome de sua esposa Noemi. Os nomes de seus dois filhos eram Mahlon e Chilion, Efratitas de Belém de Judá. Eles vieram para o país de Moab e lá viveram.
२त्या मनुष्याचे नाव अलीमलेख व त्याच्या पत्नीचे नाव नामी होते, आणि त्याच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्लोन होते. ते एफ्राथी म्हणजे यहूदा प्रांतातील बेथलेहेम नगरात होते. ते मवाब देशी राहायला गेले.
3 Elimelech, marido de Noemi, morreu; e ela ficou com seus dois filhos.
३नामीचा पती अलीमलेख मरण पावला आणि तिच्या दोन पुत्रांबरोबर ती मागे राहिली.
4 Eles tomaram para si esposas das mulheres de Moab. O nome de uma era Orpah, e o nome da outra era Ruth. Elas viveram lá cerca de dez anos.
४त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले.
5 Mahlon e Chilion morreram ambos, e a mulher foi enlutada de seus dois filhos e de seu marido.
५मग महलोन व खिल्लोन मरण पावले. याप्रमाणे नामी आपला पती व दोन पुत्र यांच्यामागे एकटी राहिली.
6 Então ela se levantou com suas noras, para poder voltar do país de Moab; pois ela tinha ouvido no país de Moab como Yahweh tinha visitado seu povo ao dar-lhes pão.
६परमेश्वराने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहूदा देशात जायला निघाली.
7 Ela saiu do lugar onde estava, e suas duas noras com ela. Elas seguiram o caminho de volta à terra de Judá.
७ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्याठिकाणाहून परत यहूदा देशास जायला निघाली.
8 Naomi disse a suas duas noras: “Vão, devolvam cada uma à casa de sua mãe”. Que Yahweh lide gentilmente com vocês, assim como vocês lidaram com os mortos e comigo”.
८नामी आपल्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आपआपल्या आईच्या घरी जा. तुम्ही जशी मृतांवर आणि माझ्यावर दया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो.
9 Que Yahweh lhes conceda que possam encontrar descanso, cada uma de vocês na casa de seu marido”. Então ela os beijou, e eles levantaram a voz e choraram.
९परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या.
10 Eles disseram a ela: “Não, mas voltaremos com você para o seu povo”.
१०त्या तिला म्हणाल्या, “नाही, आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.”
11 Naomi disse: “Voltem, minhas filhas”. Por que vocês querem ir comigo? Eu ainda tenho filhos no meu ventre, para que eles possam ser seus maridos?
११नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील?
12 Voltem, minhas filhas, sigam seu caminho, pois sou muito velha para ter um marido. Se eu dissesse: “Tenho esperança”, se eu tivesse um marido esta noite, e também tivesse filhos,
१२माझ्या मुलींनो माघारी जा; मी आता म्हातारी झाले आहे, पती करण्याचे माझे वय नाही. जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि जरी मला पुत्रही झाले,
13 você então esperaria até que eles crescessem? Você se absteria então de ter maridos? Não, minhas filhas, pois isso me entristece seriamente por causa de vocês, pois a mão de Yahweh saiu contra mim”.
१३तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय रहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्याविरुद्ध फिरला आहे.”
14 Eles levantaram suas vozes e choraram novamente; depois Orpah beijou sua sogra, mas Ruth ficou com ela.
१४मग तिच्या सुना मोठा आवाज काढून पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले, पण रूथ तिच्या जवळ राहिली.
15 Ela disse: “Eis que sua cunhada voltou para seu povo e para seu deus”. Siga sua cunhada”.
१५ती तिला म्हणाली, “ऐक, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.”
16 Rute disse: “Não me exorte a deixá-lo, e a voltar de segui-lo, pois para onde você for, eu irei; e onde você ficar, eu ficarei”. Seu povo será meu povo, e seu Deus, meu Deus”.
१६रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा असे मला सांगू नका; तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे रहाल तिथे मी राहीन आणि तुमचे लोक ते माझे लोक व तुमचा देव तो माझा देव.
17 Onde você morrer, eu morrerei, e lá serei enterrado. Que Yahweh o faça comigo, e mais ainda, se tudo menos a morte nos separar”.
१७तुम्ही मराल तेथे मी मरेन व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कशानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो.”
18 Quando Naomi viu que estava determinada a ir com ela, ela parou de exortá-la.
१८रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्चय केला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिच्यासोबत वादविवाद करण्याचे थांबवले.
19 Então ambos foram até chegar a Belém. Quando chegaram a Belém, toda a cidade estava entusiasmada com eles, e perguntaram: “É esta Naomi?
१९मग त्या दोघी बेथलेहेमात पोहचल्या. बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्यांच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, “हीच का ती नामी?”
20 Ela disse a eles: “Não me chamem de Naomi”. Chamem-me Mara, pois o Todo-Poderoso tem lidado de forma muito amarga comigo.
२०आणि ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मला मारा (दु: खदायक) म्हणा कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेशमय वागवले आहे.
21 Eu saí cheio, e Yahweh me trouxe para casa novamente vazio. Por que me chamam Noemi, já que Javé testemunhou contra mim, e o Todo-Poderoso me afligiu”?
२१मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले, परमेश्वराने माझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे आणि त्या सर्वसमर्थाने मला दु: खित केले आहे तर तुम्ही मला नामी का म्हणता?”
22 Então Noemi voltou, e Ruth a moabita, sua nora, com ela, que voltou para fora do país de Moab. Eles vieram para Belém no início da colheita da cevada.
२२याप्रमाणे नामी तिची मवाबी सून रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेम नगरात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.