< Provérbios 22 >
1 Um bom nome é mais desejável do que grandes riquezas, e favor amoroso é melhor do que prata e ouro.
१चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.
2 Os ricos e os pobres têm isso em comum: Yahweh é o criador de todos eles.
२गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.
3 Um homem prudente vê o perigo e se esconde; mas o simples passar adiante, e sofrer por ele.
३शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.
4 O resultado da humildade e do medo de Yahweh é riqueza, honra e vida.
४परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.
5 Espinhos e laços estão no caminho dos malvados; quem guarda sua alma, fica deles.
५कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो.
6 Treinar uma criança no caminho que ela deve seguir, e quando ele for velho, não se afastará dele.
६मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
7 Os ricos dominam sobre os pobres. O tomador do empréstimo é servo do doador.
७श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.
8 He que semeia a maldade colhe problemas, e a haste de sua fúria será destruída.
८जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल.
9 Aquele que tiver um olho generoso será abençoado, pois ele compartilha sua comida com os pobres.
९जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
10 Expulsar o escarnecedor, e a briga sairá; sim, as brigas e insultos vão parar.
१०निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात, मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील.
11 Aquele que ama a pureza de coração e fala graciosamente é o amigo do rei.
११ज्याला मनाची शुद्धता आवडते, आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो.
12 Os olhos de Yahweh zelam pelo conhecimento, mas ele frustra as palavras dos infiéis.
१२परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो.
13 O preguiçoso diz: “Há um leão lá fora! Eu serei morto nas ruas”!
१३आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”
14 A boca de uma adúltera é um poço profundo. Aquele que está sob a ira de Yahweh cairá nela.
१४व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे; ज्या कोणाच्याविरूद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो.
15 A loucura está ligada ao coração de uma criança; a vara da disciplina o afasta dele.
१५बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
16 Quem oprime os pobres por seu próprio aumento e quem dá aos ricos, ambos chegam à pobreza.
१६जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल.
17 Vire seu ouvido, e ouça as palavras dos sábios. Aplique seu coração ao meu ensino.
१७ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव.
18 Pois é uma coisa agradável se você os mantiver dentro de você, se todos eles estiverem prontos em seus lábios.
१८कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल.
19 Eu lhes ensino hoje, até mesmo vocês, para que sua confiança possa estar em Yahweh.
१९परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत.
20 Não lhe escrevi trinta coisas excelentes de conselhos e conhecimentos,
२०मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय?
21 Para lhe ensinar a verdade, palavras confiáveis, para dar boas respostas àqueles que o enviaram?
२१या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय?
22 Não explore os pobres porque ele é pobre; e não esmague os necessitados no tribunal;
२२गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.
23 para Yahweh defenderá seu caso, e saqueia a vida daqueles que os saqueiam.
२३कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.
24 Não seja amigo de um homem de temperamento quente. Não se associe com alguém que guarda a raiva,
२४जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस.
25 para que você não aprenda seus caminhos e ludibriar sua alma.
२५तुम्ही त्याचे मार्ग शिकाल, आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकवून घ्याल.
26 Não seja um daqueles que batem as mãos, daqueles que são garantia de dívidas.
२६दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात, आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला तू एक होऊ नको.
27 Se você não tiver meios para pagar, por que ele deveria tirar sua cama de baixo de você?
२७जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे?
28 Não mova a antiga pedra de fronteira que seus pais criaram.
२८तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे, तो दगड दूर करू नकोस.
29 Do você vê um homem hábil em seu trabalho? Ele servirá aos reis. Ele não servirá a homens obscuros.
२९जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही.