< Juízes 15 >

1 Mas depois de um tempo, na época da colheita do trigo, Samson visitou sua esposa com um cabrito jovem. Ele disse: “Vou para o quarto da minha esposa”. Mas seu pai não permitiria que ele entrasse.
काही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या पत्नीला भेटण्यास गेला; तेव्हा तो स्वत: शी म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जाईन” परंतु तिच्या पित्याने त्यास आत जाऊ दिले नाही.
2 O pai dela disse: “Eu certamente pensava que você a odiava totalmente; por isso a entreguei ao seu companheiro”. Sua irmã mais nova não é mais bonita do que ela? Por favor, leve-a no lugar dela”.
तिचा पिता म्हणाला, “मला वाटले तू तिचा अगदी द्वेष करतोस, म्हणून मी तिला तुझ्या मित्राला देऊन टाकली; तिची लहान बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे, आहे की नाही? तिच्याऐवजी तिला घे.”
3 Sansão disse a eles: “Desta vez serei irrepreensível no caso dos filisteus quando os prejudicar”.
तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “या वेळेस मी पलिष्ट्यांची हानी केली, तरी त्यासंबंधी मी निर्दोष राहीन.”
4 Sansão foi e pegou trezentas raposas, pegou tochas, virou cauda a cauda, e colocou uma tocha no meio entre cada duas caudas.
शमशोन गेला आणि त्याने जाऊन तीनशे कोल्हे पकडले, आणि शेपटाला शेपूट अशी एकएक जोडीच्या बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या.
5 Quando ele pegou fogo às tochas, deixou-as ir para o grão em pé dos filisteus e queimou tanto os choques como o grão em pé, e também os olivais.
मग मशाली पेटवून त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात सोडले, आणि त्यांनी दोन्ही उभे पिके आणि धान्याच्या रचलेल्या सुड्यांसह जाळली आणि त्याबरोबर जैतूनाचे मळेही जाळले.
6 Então os filisteus disseram: “Quem fez isso?” Eles disseram: “Sansão, o genro do Timnite, porque ele levou sua esposa e a entregou ao seu companheiro”. Os filisteus apareceram e queimaram-na e ao pai dela com fogo.
तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” नंतर त्यांनी म्हटले, “तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची पत्नी घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ट्यांनी जाऊन तिला व तिच्या पित्याला आग लावून जाळून टाकले.
7 Samson disse a eles: “Se vocês se comportarem assim, certamente me vingarei de vocês e, depois disso, cessarei”.
शमशोन त्यांना म्हणाला, जरी तुम्ही हे केले, तरी त्याचा मी तुमच्याविरुध्द सूड घेईन, आणि ते केल्यानंतरच मग मी थांबेन.”
8 Ele bateu-lhes no quadril e na coxa com uma grande matança; e desceu e viveu na caverna na rocha de Etam.
नंतर त्याने त्यांना मांडीवर व कंबरेवर मारून त्यांचे तुकडे तुकडे करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली गेला आणि उंच कड्याच्या एटाम दरीत गुहेमध्ये जाऊन राहिला.
9 Então os filisteus subiram, acamparam em Judá, e se espalharam em Lehi.
मग पलिष्टी बाहेर आले आणि त्यांनी यहूदामध्ये येऊन लढाईची तयारी केली, आणि त्यांनी लेहीत त्यांच्या सैन्याची व्यूहरचना केली.
10 Os homens de Judah disseram: “Por que você se deparou conosco?” Eles disseram: “Nós viemos para amarrar Sansão, para fazer com ele como ele fez conosco”.
१०तेव्हा यहूदी माणसे म्हणाली, “तुम्ही आमच्यावर का हल्ला केला आहे?” तेव्हा ते म्हणाले, “शमशोनाला पकडण्यासाठी म्हणून आम्ही हल्ला केला आहे; त्याने आमच्याशी जसे केले, तसेच त्याच्याशी करण्यासाठी आम्ही आलो आहो.”
11 Então três mil homens de Judá desceram à caverna na rocha de Etam e disseram a Sansão: “Você não sabe que os filisteus são os governantes sobre nós? Então o que é isso que vocês nos fizeram?” Ele lhes disse: “Como eles fizeram comigo, assim eu fiz com eles”.
११नंतर यहूदातली तीन हजार माणसे खाली एटाम दरीच्या उंच कड्याजवळ जाऊन शमशोनाला म्हणाली, “पलिष्टी आमच्यावर राज्य करतात, हे तुला माहीत नाही काय? तर तू हे काय केले?” शमशोन त्यांना म्हणाला, “जसे त्यांनी माझे केले, तसे मी त्यांचे केले आहे.”
12 Disseram-lhe: “Descemos para amarrá-lo, para que o entreguemos na mão dos filisteus”. Sansão disse-lhes: “Jurem-me que vocês mesmos não me atacarão”.
१२ते शमशोनाला म्हणाले, “आम्ही तुला बांधून पलिष्ट्यांच्या हाती देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला,” तुम्ही स्वत: मला मारून टाकणार नाही, “अशी माझ्याजवळ शपथ घ्या.”
13 Eles falaram com ele, dizendo: “Não, mas nós o amarraremos com segurança e o entregaremos em suas mãos; mas certamente não o mataremos”. Amarraram-no com duas novas cordas e o trouxeram da rocha.
१३मग त्यांनी त्यास सांगितले की, “नाही, आम्ही फक्त तुला दोरीने बांधू आणि तुला त्यांच्या हाती सोपवू. आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही.” तेव्हा त्यांनी दोन नव्या दोरांनी त्यास बांधून खडकातून वर नेले.
14 Quando ele chegou a Lehi, os filisteus gritaram quando o conheceram. Então o Espírito de Yahweh veio poderosamente sobre ele, e as cordas que estavam em seus braços se tornaram como linho que foi queimado com fogo; e suas faixas caíram de suas mãos.
१४जेव्हा तो लेहीस पोहचला, तेव्हा पलिष्ट्यांनी त्यास पाहून पलिष्टी आनंदाने ओरडू लागले; आणि परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातांना बांधलेले दोर ताग जळतो तसे झाले आणि दोर हातातून गळून पडले.
15 Ele encontrou uma mandíbula fresca de um burro, estendeu sua mão, pegou-a e bateu em mil homens com ela.
१५नंतर त्यास गाढवाचे ताजे जाभाड सापडले आणि त्याने ते उचलले आणि त्याच्याने एक हजार माणसे मारली.
16 Sansão disse: “Com a mandíbula de um burro, montões em montões; com a mandíbula de um burro, bati em mil homens”.
१६शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने ढिगावर ढिग, गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे मारली.”
17 Quando terminou de falar, ele atirou a mandíbula da mão; e aquele lugar se chamava Ramath Lehi.
१७शमशोनाने बोलणे संपवल्यावर, आपल्या हातातून ते जाभाड फेकून दिले, यावरुन त्या ठिकाणाचे नाव रामाथ-लेही ठेवले.
18 Ele estava muito sedento, chamou Javé e disse: “Você deu esta grande libertação pela mão de seu servo; e agora morrerei de sede e cairei nas mãos dos incircuncisos”...
१८तेव्हा शमशोनाला फार तहान लागली आणि त्याने परमेश्वरास हाक मारून म्हटले, “तू आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे; परंतु आता मी तहानेने मरत आहे आणि न्यायासाठी बेसुंती लोकांच्या हाती पडत आहे.”
19 Mas Deus dividiu o lugar oco que está em Lehi, e a água saiu dele. Quando ele tinha bebido, seu espírito veio novamente, e ele reviveu. Portanto, seu nome era En Hakkore, que está em Lehi, até os dias de hoje.
१९तेव्हा देवाने लेहीमधील खोलगट जागा दुभंगून फोडली, आणि त्यातून पाणी निघाले; जेव्हा तो ते प्याला, तेव्हा त्यास परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरुन त्या जागेचे नाव एन-हक्कोरे पडले; ती जागा आजपर्यंत लेहीमध्ये आहे.
20 Ele julgou Israel durante vinte anos nos dias dos filisteus.
२०शमशोनाने पलिष्ट्यांच्या काळात इस्राएलाचा वीस वर्षे न्याय केला.

< Juízes 15 >