< Josué 7 >

1 Mas os filhos de Israel cometeram uma transgressão nas coisas dedicadas; pois Achan, o filho de Carmi, o filho de Zabdi, o filho de Zerah, da tribo de Judá, levou algumas das coisas dedicadas. Portanto, a raiva de Javé ardia contra os filhos de Israel.
परंतु इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला; यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला.
2 Josué enviou homens de Jericó para Ai, que fica ao lado da Avenida Beth, no lado leste de Betel, e falou com eles, dizendo: “Subam e espiem a terra”. Os homens subiram e espiaram o Ai.
बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले,
3 Eles voltaram para Josué, e disseram a ele: “Não deixe todo o povo subir, mas deixe cerca de dois ou três mil homens subir e atacar o Ai. Não obrigue todas as pessoas a trabalhar lá, pois são poucas”.
नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांनी तेथे जाऊ नये, “फक्त दोन तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांस जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही; कारण ते लोक थोडकेच आहेत.”
4 Assim, cerca de três mil homens do povo subiram lá, e fugiram diante dos homens de Ai.
म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या मनुष्यांपुढे त्यांना पळ काढावा लागला.
5 Os homens de Ai atacaram cerca de trinta e seis homens deles. Eles os perseguiram desde antes mesmo do portão até Shebarim, e os atingiram na descida. Os corações do povo derreteram, e se tornaram como água.
आय येथील मनुष्यांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले; आणि त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांचे धैर्य खचले.
6 Josué rasgou suas roupas, e caiu na terra em seu rosto diante da arca de Javé até a noite, ele e os anciãos de Israel; e puseram pó em suas cabeças.
यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्राएलाचे वडील संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले.
7 Josué disse: “Ai de mim, Senhor Javé, por que trouxe este povo sobre o Jordão, para nos entregar nas mãos dos amorreus, para nos fazer perecer? Gostaria que tivéssemos ficado satisfeitos e vivido além do Jordão!
मग यहोशवा म्हणाला, हायहाय! “हे प्रभू परमेश्वरा; तू या सर्व लोकांस यार्देन ओलांडून का आणले? अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करण्यासाठी आणलेस का? आम्ही समाधानी होऊन यार्देनेच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते!
8 Oh, Senhor, o que devo dizer, depois que Israel tiver virado as costas diante de seus inimigos?
हे प्रभू, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली; आता मी काय बोलू?
9 Pois os cananeus e todos os habitantes da terra ouvirão falar dela, e nos cercarão, e cortarão nosso nome da terra. O que você fará por seu grande nome?”.
कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरच्या लोकांस आमचे नाव विसरावयास लावतील. तेव्हा तू आपल्या महान नावासाठी काय करणार आहेस?”
10 Yahweh disse a Joshua: “Levante-se! Por que você caiu de cara assim?
१०तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, ऊठ, असा पालथा का पडलास?
11 Israel pecou. Sim, eles até transgrediram meu pacto que eu lhes ordenei. Sim, eles até tomaram algumas das coisas dedicadas, e também roubaram, e também enganaram. Eles até colocaram isso entre suas próprias coisas.
११इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला कराराचा त्यांनी भंग केला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.
12 Portanto, os filhos de Israel não podem ficar diante de seus inimigos. Eles viram as costas diante de seus inimigos, porque se tornaram devotados à destruição. Eu não estarei mais com vocês, a menos que vocês destruam as coisas devotadas de entre vocês.
१२त्याचा परिणाम म्हणून इस्राएल लोक आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरत नाहीत, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नाश केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्यामध्ये राहणार नाही.
13 Levantem-se! Santificai o povo, e dizei: 'Santificai-vos para amanhã, para Javé, o Deus de Israel, diz: “Há uma coisa devota entre vós, Israel”. Vocês não podem ficar diante de seus inimigos até que tirem a coisa devotada do meio de vocês”.
१३तर उठ, लोकांस पवित्र कर, त्यांना सांग उद्यासाठी स्वतःला पवित्र करा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू अजून आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करून त्यांचा नाश करा. त्या तुमच्यातून काढून त्यांचा सर्वनाश करीपर्यंत शत्रूपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.”
14 Pela manhã, portanto, vocês serão aproximados por suas tribos. Será que a tribo que Yahweh selecionar se aproximará por famílias. A família que Yahweh seleciona se aproximará por famílias. A família que Yahweh selecionar se aproximará de homem a homem.
१४सकाळी तुम्ही आपआपल्या वंशाप्रमाणे हजर राहा. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकाएका घराण्याने पुढे यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकाएका पुरुषाने पुढे यावे;
15 Será, que aquele que for levado com a coisa devota será queimado com fogo, ele e tudo o que tiver, porque transgrediu o pacto de Iavé, e porque fez uma coisa vergonhosa em Israel”.
१५ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्यास त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून त्याचा नाश करावा. कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूढपणाचे काम केले आहे.
16 Então Josué levantou-se cedo pela manhã e trouxe Israel para perto de suas tribos. A tribo de Judá foi selecionada.
१६यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्राएलाचा एकएक वंश समोर आणला, आणि यहूदा वंश पकडला गेला.
17 Ele aproximou-se da família de Judá e selecionou a família dos zerahitas. Ele aproximou-se da família dos zerahitas homem por homem, e Zabdi foi selecionado.
१७मग त्याने यहूदाची कुळे जवळ आणली, तेव्हा जेरह कूळ पकडले गेले. आणि जेरहाच्या कुळातले एकएक घराणे समोर आणण्यात आले तेव्हा जब्दीला पकडण्यात आले.
18 Aproximou-se de sua família homem por homem, e Achan, filho de Carmi, filho de Zabdi, filho de Zerah, da tribo de Judá, foi selecionado.
१८मग त्या घराण्यातील एकएका पुरुषास जवळ आणले तेव्हा यहूदा वंशातील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान हा पकडला गेला.
19 Josué disse a Achan: “Meu filho, por favor, dê glória a Javé, o Deus de Israel, e faça confissão a ele”. Diga-me agora o que você fez! Não o esconda de mim”!
१९तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर याला गौरव दे आणि तुझ्या गुन्ह्यांची कबुली कर; कृपा करून तू काय केले ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नको.”
20 Achan respondeu a Josué, e disse: “Eu pequei verdadeiramente contra Javé, o Deus de Israel, e foi isso que eu fiz.
२०आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, “मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध पाप केले आहे; आणि मी जे केले ते हे:
21 Quando vi entre os despojos um belo manto babilônico, duzentos siclos de prata e uma cunha de ouro pesando cinqüenta siclos, então eu os cobicei e os levei. Eis que estão escondidos no chão, no meio da minha tenda, com a prata debaixo dela”.
२१लुटीमध्ये एक सुंदर शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या तेव्हा मला त्या घेण्याची इच्छा झाली. माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत आणि रुपे त्याच्या खाली आहे.”
22 Então Joshua enviou mensageiros, e eles correram para a tenda. Eis que ela estava escondida em sua tenda, com a prata debaixo dela.
२२तेव्हा यहोशवाने दूत पाठवले. ते तंबूकडे धावत गेले, आणि पाहा, त्याच्या तंबूत त्या वस्तू लपवलेल्या होत्या व त्याच्या खाली रुपे होते.
23 Eles os levaram do meio da tenda, e os levaram a Josué e a todas as crianças de Israel. Eles os colocaram diante de Yahweh.
२३त्याने त्या तंबूतून काढून यहोशवा आणि सर्व इस्राएल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या.
24 Josué, e todo Israel com ele, levaram Achan, filho de Zerá, a prata, o manto, a cunha de ouro, seus filhos, suas filhas, seu gado, seus burros, suas ovelhas, sua tenda e tudo o que ele tinha; e os trouxeram para o vale de Acor.
२४त्यानंतर यहोशवाने व त्यासोबतच्या सर्व इस्राएल लोकांनी जेरहाचा पुत्र आखान याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याची मुले व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडेमेंढरांचे कळप, त्याचा तंबू व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले.
25 Josué disse: “Por que você nos incomodou? Yahweh vai incomodá-lo hoje”. Todo Israel o apedrejou com pedras, e eles as queimaram com fogo e as apedrejaram com pedras.
२५यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्यास दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.
26 Eles levantaram sobre ele um grande monte de pedras que permanece até hoje. Javé virou-se da ferocidade de sua ira. Por isso o nome daquele lugar foi chamado “O vale de Acor” até os dias de hoje.
२६त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली; ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला राग शांत झाला. यावरुन त्या स्थळाला आजपर्यंत अखोरचे खोरे असे म्हणतात.

< Josué 7 >