< Josué 11 >
1 Quando Jabin, rei de Hazor, soube disso, enviou a Jobab rei de Madon, ao rei de Shimron, ao rei de Achshaph,
१जेव्हा हासोराचा राजा याबीन याने हे ऐकले तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना,
2 e aos reis que estavam ao norte, no país das colinas, no Arabah ao sul de Chinneroth, na planície, e nas alturas de Dor no oeste,
२आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात. तळवटीत आणि पश्चिमेकडील दोरात असलेल्या राजांना,
3 para o Canaanita no leste e no oeste, o Amorita, o Hittita, o Perizzite, o Jebusita na região montanhosa, e o Hivita sob Hermon na terra de Mizpah.
३आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रातांत राहणारे हिव्वी यांना बोलावणे पाठवले.
4 Eles saíram, eles e todos os seus exércitos com eles, muitas pessoas, mesmo como a areia que está na costa do mar em multidão, com muitos cavalos e carruagens.
४तेव्हा त्यांचे सर्व सैन्य समुद्रकिनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.
5 Todos estes reis se reuniram; e vieram e acamparam juntos nas águas de Merom, para lutar com Israel.
५या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढावयास मेरोम सरोवराजवळ तळ दिला.
6 Yahweh disse a Josué: “Não tenha medo por causa deles; pois amanhã, a esta hora, eu os entregarei todos mortos antes de Israel. Você vai prender os cavalos deles e queimar suas carruagens com fogo”.
६मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांच्या उपस्थितीला भिऊ नको, कारण उद्या मी या वेळी त्या सर्वांना इस्राएलाच्या हाती देऊन मारणार आहे. त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”
7 Então Josué veio de repente, com todos os guerreiros, contra eles pelas águas de Merom, e os atacou.
७तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम पाण्याजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.
8 Yahweh os entregou nas mãos de Israel, e eles os atacaram, e os perseguiram até o grande Sidon, e até Misrephoth Maim, e até o vale de Mizpah para o leste. Eles os atingiram até não deixarem mais ninguém.
८परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
9 Josué fez com eles como Yahweh lhe disse. Ele enforcou seus cavalos e queimou suas carruagens com fogo.
९परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.
10 Josué voltou atrás naquela época, pegou Hazor e golpeou seu rei com a espada; pois Hazor costumava ser a cabeça de todos aqueles reinos.
१०त्या वेळी यहोशवाने माघारी येऊन हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.
11 Eles atingiram todas as almas que estavam nele com o fio da espada, destruindo-as completamente. Não restava ninguém que respirava. Ele queimou Hazor com fogo.
११तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही; नंतर त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.
12 Josué capturou todas as cidades daqueles reis, com seus reis, e os atingiu com o fio da espada, e os destruiu totalmente, como ordenou Moisés, servo de Javé.
१२परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजासह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.
13 Mas quanto às cidades que estavam em seus montes, Israel não queimou nenhuma delas, exceto Hazor apenas. Josué queimou isso.
१३टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हासोर मात्र यहोशवाने जाळले.
14 Os filhos de Israel tomaram todas as pilhagens destas cidades, com o gado, como pilhagem para si mesmos; mas todos os homens que atingiram com o fio da espada, até que os destruíram. Eles não deixaram ninguém que respirasse.
१४या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक मनुष्य मारून टाकला, एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही.
15 Como Yahweh ordenou a Moisés, seu servo, assim Moisés ordenou a Josué. Josué o fez. Ele não deixou nada por fazer de tudo o que Iavé ordenou a Moisés.
१५परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली; आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. यहोशवाने मोशेला आज्ञा दिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
16 Então Josué capturou toda aquela terra, a região montanhosa, todo o Sul, toda a terra de Gósen, a planície, o Arabah, a região montanhosa de Israel, e a planície do mesmo,
१६अशा प्रकारे यहोशवाने इस्राएलाचा डोंगरी मुलूख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, असा सर्व देश घेतला.
17 do Monte Halak, que vai até Seir, até Baal Gad, no vale do Líbano sob o Monte Hermon. Ele pegou todos os seus reis, golpeou-os, e os matou.
१७तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.
18 Josué fez guerra por muito tempo com todos esses reis.
१८त्या सर्व राजाशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.
19 Não havia uma cidade que fizesse as pazes com os filhos de Israel, exceto os hivitas, os habitantes de Gibeon. Eles levaram todos em batalha.
१९गिबोनात राहणाऱ्या हिव्व्याखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी समेट केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,
20 Pois era de Javé para endurecer seus corações, para vir contra Israel em batalha, para que ele pudesse destruí-los totalmente, para que eles não tivessem nenhum favor, mas para que ele os destruísse, como Javé ordenou a Moisés.
२०कारण परमेश्वराने त्यांची मने कठीण केली होती, अशासाठी की त्यांनी इस्राएलाविरुद्ध युद्ध करण्यासाठी पुढे यावे आणि त्याने त्यांचा समूळ नाश करावा. परमेश्वराने मोशेला अज्ञापिल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करण्याच्या निर्णयापर्यंत, त्याने त्यांच्या दया-याचनेची गय केली नाही.
21 Josué veio naquela época, e cortou os Anakim da região montanhosa, de Hebron, de Debir, de Anab, e de toda a região montanhosa de Judá, e de toda a região montanhosa de Israel. Josué os destruiu totalmente com suas cidades.
२१तेव्हा यहोशवाने डोंगराळ प्रदेशांत जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब यहूदा व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या अनाकी लोकांचा नाश केला. त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.
22 Não restava nenhum dos Anakim na terra dos filhos de Israel. Somente em Gaza, em Gate, e em Ashdod, alguns ficaram.
२२इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद यांतले थोडे उरले.
23 Então Josué tomou a terra inteira, de acordo com tudo o que Javé falou a Moisés; e Josué a deu em herança a Israel de acordo com suas divisões por suas tribos. Então a terra teve descanso da guerra.
२३परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएल लोकांस वंशांच्या नियमाप्रमाणे वाटून वतन करून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.