< Jó 8 >
1 Então Bildad, o Shuhite, respondeu,
१नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 “Por quanto tempo você vai falar estas coisas? Será que as palavras de sua boca serão um vento forte?
२“तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील.
3 Será que Deus perverte a justiça? Ou será que o Todo-Poderoso perverte a justiça?
३देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय?
4 Se seus filhos tiverem pecado contra ele, ele os entregou na mão de sua desobediência.
४तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा केली.
5 Se você quiser buscar a Deus com diligência, faça sua súplica ao Todo-Poderoso.
५परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
6 Se você fosse puro e íntegro, certamente agora ele despertaria para você, e fazer prosperar a habitação de sua retidão.
६तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.
7 Though seu início foi pequeno, no entanto, seu último fim aumentaria muito.
७जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल.
8 “Por favor, informe-se sobre as gerações passadas. Saiba mais sobre o aprendizado de seus pais.
८मी तुला विनंती करतो वडिलांच्या वेळेची माहिती विचार, त्यांनी जो शोध लावला तो तुझ्यासाठी लागू करून घे.
9 (Pois nós somos apenas de ontem, e não sabemos nada, porque nossos dias na terra são uma sombra).
९आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही, कारण छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस आहेत.
10 Não lhe ensinarão, diga-lhe, e proferir palavras do coração deles?
१०ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का?
11 “O papiro pode crescer sem lama? Os juncos podem crescer sem água?
११लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
12 Enquanto ainda está em seu verde, não cortado, ele murcha antes de qualquer outra palheta.
१२ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात.
13 Assim são os caminhos de todos os que se esquecem de Deus. A esperança do homem sem Deus perecerá,
१३म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल.
14 cuja confiança se desfará, cuja confiança é uma teia de aranha.
१४ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे.
15 Ele se apoiará em sua casa, mas ela não vai ficar de pé. Ele se agarrará a ela, mas ela não perdurará.
१५तो आपल्या घरावर टेकला असता परंतू ते त्यास आधार देऊ शकणार नाही, त्याने ते पकडून धरले असता ते स्थिर राहायचे नाही.
16 Ele está verde antes do sol. Seus rebentos saem ao longo de seu jardim.
१६तो सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा हिरवागार आहे, तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
17 Suas raízes estão enroladas ao redor da pilha de rochas. Ele vê o lugar das pedras.
१७तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
18 Se ele for destruído de seu lugar, então o negará, dizendo: “Eu não o vi”.
१८परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’
19 Eis aqui a alegria de seu caminho. Fora da terra, outros irão brotar.
१९पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील.
20 “Vejam, Deus não vai jogar fora um homem irrepreensível, nem defenderá os malfeitores.
२०पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही.
21 Ele ainda vai encher sua boca de risos, seus lábios com gritos.
२१देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील!
22 Aqueles que o odeiam estarão vestidos de vergonha. A tenda dos ímpios não será mais”.
२२जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.”