< 14 >

1 “O homem, que nasce de uma mulher, é de poucos dias, e cheio de problemas.
“मानव स्त्री पासून जन्मलेला आहे. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.
2 Ele cresce como uma flor, e é cortado. Ele também foge como uma sombra, e não continua.
तो फुलासारखा फुलतो व खुडल्या जातो, त्याचे आयुष्य छायेसारखे आहे ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.
3 Você abre seus olhos para tal, e me levar a julgamento com você?
अशाकडे तुझे डोळे लागतील काय? अशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय?
4 Quem pode trazer uma coisa limpa de uma coisa impura? Nem um.
अशुद्धांतून शुद्ध पदार्थ कोण काढील? कोणीही नाही.
5 Seeing seus dias estão determinados, o número de seus meses está com você, e você indicou seus limites que ele não pode passar.
मनुष्याचे आयुष्य मर्यादित आहे, मनुष्याने किती जगायचे ते तूच ठरवतोस. तूच त्याची मर्यादा निश्चित करतोस आणि ती तो बदलू शकत नाही.
6 Desvie o olhar dele, para que ele possa descansar, até que ele cumpra, como um mercenário, seu dia.
तू त्याजवर नजर ठेवणे बंद कर, म्हणजे त्यास शांती मिळेल, मजुर जसे रोज भरतो तसे त्यास त्याचे दिवस भरू दे म्हणजे तो आनंद पावेल.
7 “Pois há esperança para uma árvore se ela for cortada, que brotará novamente, que o seu ramo de oferta não cessará.
वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्यास नवीन फांद्या फुटतच राहतात.
8 Embora sua raiz envelheça na terra, e seu estoque morre no chão,
त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले.
9 yet através do cheiro da água, ela irá brotar, e brotam ramos como uma planta.
तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते. आणि त्यास नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात.
10 Mas o homem morre, e é colocado em baixo. Sim, o homem desiste do espírito, e onde ele está?
१०परंतु मनुष्य मरतो आणि तो संपतो. खरोखर मनुष्य मरतो तेव्हा तो कोठे जातो.
11 Como as águas falham a partir do mar, e o rio desperdiça e seca,
११जसे तलाव पाण्याशिवाय सुकून जातात, तसे नदी पाण्याशिवाय आटते.
12 para que o homem se deite e não se levante. Até que os céus não estejam mais acordados, nem serem despertados do sono.
१२मनुष्य मरतो तेव्हा तो झोपतो आणि पुन्हा कधीही उठत नाही. आकाश नाहीसे होईपर्यंत मरण पावलेला मनुष्य उठणार नाही. मनुष्यप्राणीत्या झोपेतून कधी जागा होत नाही.
13 “Oh, que você me esconderia no Sheol, que você me manteria em segredo até que sua ira passasse, que você me indicaria um tempo determinado e se lembraria de mim! (Sheol h7585)
१३तू मला अधोलोकापासून लपव, संकटा पासून वाचव, आणि तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस. नंतर तू माझी मदत नियमित करून माझी आठवण करशील तर किती बरे होईल. (Sheol h7585)
14 Se um homem morrer, será que ele viverá novamente? Eu esperaria todos os dias da minha guerra, até minha liberação chegar.
१४मरण पावलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.
15 Você ligaria, e eu lhe responderia. Você teria um desejo pelo trabalho de suas mãos.
१५तू मला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन. मग जे तू मला निर्माण केलेस तो मी तुला महत्वाचा वाटेन.
16 Mas agora você conta meus passos. Você não cuida do meu pecado?
१६पण सध्या तू माझे प्रत्येक पाऊल मोजीत आहेस व माझ्या प्रत्येक पापा वर नजर ठेवीत आहेस.
17 Minha desobediência é selada em uma bolsa. Você prende minha iniqüidade.
१७तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवली आहेत, माझे पाप झाकून ठेवीली आहेस.
18 “Mas a montanha que cai não dá em nada. A rocha é removida de seu lugar.
१८डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक जागीच फुटतात.
19 As águas desgastam as pedras. As torrentes da mesma lavam o pó da terra. Assim você destrói a esperança do homem.
१९खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे मनुष्याची आशा नष्ट होते.
20 Você prevalece para sempre contra ele, e ele parte. Você muda seu rosto, e o manda embora.
२०तू नेहमीच त्याचा पराभव करतोस, तू तेथून निघून जातोस. तू त्यास दु: खी करतोस आणि त्याला मरणासाठी सोडून देतो
21 Seus filhos vêm para honrar, e ele não sabe disso. Eles são trazidos para baixo, mas ele não percebe isso deles.
२१त्यांच्या मुलांना बहुमान प्राप्त झाला तर ते त्यास समजत नाही. त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्यास कधी दिसत नाहीत.
22 Mas sua carne tem dor, e sua alma dentro dele chora”.
२२फक्त त्याच्या स्वत: च्या शारीरिक दु: खाची जाणीव असते. आणि त्याचे अतंर्याम केवळ स्वत: साठी रडते.”

< 14 >