< Gênesis 11 >
1 A Terra inteira era de uma língua e de um discurso.
१आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते.
2 Ao viajarem para o leste, encontraram uma planície na terra de Shinar, e ali viveram.
२ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली.
3 Disseram um ao outro: “Venham, vamos fazer tijolos, e queimá-los completamente”. Eles tinham tijolos para pedra, e usavam alcatrão para argamassa.
३ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.
4 Eles disseram: “Venham, vamos construir uma cidade, e uma torre cujo topo alcança o céu, e vamos fazer um nome para nós mesmos, para que não fiquemos espalhados no exterior sobre a superfície de toda a terra”.
४मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”
5 Yahweh desceu para ver a cidade e a torre, que os filhos dos homens construíram.
५आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला.
6 Yahweh disse: “Eis que eles são um só povo, e todos eles têm uma só língua, e é isso que eles começam a fazer. Agora nada lhes será negado, o que pretendem fazer”.
६परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही.
7 Venha, vamos descer, e aí confundir a língua deles, para que não entendam o discurso uns dos outros”.
७चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
8 Então Yahweh os espalhou dali para o exterior sobre a superfície de toda a terra. Eles pararam de construir a cidade.
८मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले.
9 Portanto, seu nome foi chamado Babel, porque ali Javé confundiu a linguagem de toda a terra. De lá, Javé os espalhou para o exterior na superfície de toda a terra.
९त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
10 Esta é a história das gerações de Shem: Shem tinha cem anos quando se tornou o pai de Arpachshad dois anos após a enchente.
१०ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला.
11 Shem viveu quinhentos anos depois de se tornar o pai de Arpachshad, e se tornou o pai de mais filhos e filhas.
११अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला.
12 Arpachshad viveu trinta e cinco anos e tornou-se o pai de Selá.
१२अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला.
13 Arpachshad viveu quatrocentos e três anos depois de se tornar o pai de Selá, e se tornou o pai de mais filhos e filhas.
१३शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
14 Shelah viveu trinta anos, e tornou-se o pai de Eber.
१४जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला;
15 Shelah viveu quatrocentos e três anos depois de se tornar o pai de Eber, e se tornou o pai de mais filhos e filhas.
१५एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
16 Eber viveu trinta e quatro anos, e tornou-se o pai de Peleg.
१६एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला.
17 Eber viveu quatrocentos e trinta anos depois de se tornar o pai de Peleg, e se tornou o pai de mais filhos e filhas.
१७पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
18 Peleg viveu trinta anos, e tornou-se o pai de Reu.
१८पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला.
19 Peleg viveu duzentos e nove anos depois de se tornar o pai de Reu, e se tornou o pai de mais filhos e filhas.
१९रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
20 Reu viveu trinta e dois anos, e tornou-se o pai de Serug.
२०रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरुगाला जन्म दिला.
21 Reu viveu duzentos e sete anos depois de se tornar o pai de Serug, e se tornou o pai de mais filhos e filhas.
२१सरुगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
22 Serug viveu trinta anos, e tornou-se o pai de Nahor.
२२सरुग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला.
23 Serug viveu duzentos anos depois de se tornar o pai de Nahor, e se tornou o pai de mais filhos e filhas.
२३नाहोराला जन्म दिल्यावर सरुग दोनशे वर्षे जगला आणि त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.
24 Nahor viveu vinte e nove anos, e tornou-se o pai de Terah.
२४नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला.
25 Nahor viveu cento e dezenove anos depois de se tornar o pai de Terah, e se tornou o pai de mais filhos e filhas.
२५तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला.
26 Terah viveu setenta anos e tornou-se o pai de Abram, Nahor e Haran.
२६तेरह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला.
27 Now esta é a história das gerações de Terah. Terah tornou-se o pai de Abram, Nahor, e Haran. Haran se tornou o pai de Lot.
२७तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला.
28 Haran morreu na terra de seu nascimento, em Ur dos Caldeus, enquanto seu pai Terah ainda era vivo.
२८हारान, आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला.
29 Abram e Nahor casaram esposas. O nome da esposa de Abram era Sarai, e o nome da esposa de Nahor era Milcah, a filha de Haran, que também era o pai de Iscah.
२९अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता.
30 Sarai era estéril. Ela não tinha filhos.
३०साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
31 Terah levou Abram seu filho, Lot o filho de Haran, o filho de seu filho, e Sarai sua nora, a esposa de Abram, seu filho. Eles foram de Ur dos Caldeus, para ir para a terra de Canaã. Eles vieram para Haran e viveram lá.
३१मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, हारानचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे अब्रामाची पत्नी साराय यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हारान प्रदेशापर्यंत येऊन तेथे राहिले.
32 Os dias de Terah foram duzentos e cinco anos. Terah morreu em Haran.
३२तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.