< Ezequiel 44 >
1 Então ele me trouxe de volta pelo caminho do portão exterior do santuário, que olha para o leste; e ele estava fechado.
१नंतर त्या मनुष्याने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, मंदिराच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. ते घट्ट बंद होते.
2 Yahweh me disse: “Este portão deve estar fechado. Não será aberta, nenhum homem entrará por ela; pois Javé, o Deus de Israel, entrou por ela. Portanto, ele será fechado.
२परमेश्वर मला म्हणाला, “हे दार बंद केलेले राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही मनुष्य जाणार नाही. कारण परमेश्वर इस्राएलाचा देव यातून आत गेला आहे; म्हणून ते बंद केलेले राहीन.
3 Quanto ao príncipe, ele se sentará nela como príncipe para comer pão diante de Iavé. Ele entrará pelo caminho do alpendre do portão e sairá pelo mesmo caminho”.
३इस्राएलाचा राज्यकर्ता परमेश्वरासमोर त्या प्रवेशद्वारात बसून भोजन करील; या द्वाराजवळच्या द्वारमंडपाच्या वाटेने तो आत येईल व याच्याच वाटेने बाहेर जाईल.”
4 Então ele me trouxe pelo caminho do portão norte diante da casa; e olhei, e eis que a glória de Iavé encheu a casa de Iavé; então caí de cara.
४मग त्याने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तो पाहा! परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते; हे पहिले व मी उपडा पडलो.
5 Yahweh me disse: “Filho do homem, marca bem, e vê com teus olhos, e ouve com teus ouvidos tudo o que te digo a respeito de todas as ordenanças da casa de Yahweh e todas as suas leis; e marca bem a entrada da casa, com cada saída do santuário.
५मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला, परमेश्वराच्या मंदिराविषयीचे सर्व विधी व नियमाबाबत मी जे सर्व तुला सांगतो, त्याकडे लक्ष दे; आपले डोळे उघडून पाहा व कान देऊन ऐक आणि मंदिराच्या प्रवेशाकडे व पवित्रस्थानाच्या बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.
6 Dirás aos rebeldes, até mesmo à casa de Israel: 'O Senhor Javé diz: “Vós, casa de Israel, que basta de todas as vossas abominações,
६मग तू बंडखोरांना इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही सर्व घृणास्पद कृत्ये केली आहेत, ती तुम्हास पुरेशी होवो;
7 em que trouxestes estrangeiros, incircuncisos de coração e incircuncisos de carne, para estar no meu santuário, para profaná-lo, até a minha casa, quando oferecerdes o meu pão, a gordura e o sangue; e eles quebraram o meu pacto, para acrescentar a todas as vossas abominações.
७कारण तुम्ही माझी भाकर, चरबी व रक्त अर्पण करताना जे मनाने व शरीरानेही बेसुंती अश्या परक्या लोकांस माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यात भर टाकली आहे.
8 Vocês não cumpriram o dever de minhas coisas sagradas; mas colocaram para vocês mesmos os executantes do meu dever em meu santuário”.
८तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंची राखण जबाबदारीने केली नाही, तर तुम्ही आपणासाठी माझ्या पवित्रस्थानाची काळजी घेण्याचे काम दुसऱ्याला दिले.”
9 O Senhor Javé diz: “Nenhum estrangeiro, incircunciso de coração e incircunciso de carne, entrará em meu santuário, de qualquer estrangeiro que se encontre entre os filhos de Israel”.
९प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल लोकांच्यात राहणाऱ्या मनाने व शरीराने बेसुंती असलेल्या परक्याने कोणी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करू नये.
10 “““Mas os levitas que se afastaram de mim quando Israel se desviou, que se afastaram de mim depois de seus ídolos, eles suportarão sua iniqüidade.
१०जेव्हा इस्राएल भरकटून दूर गेले, तेव्हा लेवीं माझ्यापासून दूर गेले, जे माझ्यापासून भरकटून दूर आपल्या मूर्तीच्या मागे गेले, आता ते आपल्या पापासाठी किंमत देतील.
11 Yet eles serão ministros em meu santuário, tendo supervisão às portas da casa, e ministrando na casa. Eles matarão o holocausto e o sacrifício pelo povo, e estarão diante deles para ministrar a eles.
११ते माझ्या पवित्रस्थानातले सेवक आहेत, ते मंदिराच्या द्वारांचे पहारेकरी आणि मंदिरात सेवा करणारे आहेत. ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञबली याचे पशू कापतील; ते त्यांच्यापुढे त्यांची सेवा करायला उभे राहतील.
12 Como eles ministraram a eles diante de seus ídolos, e se tornaram um obstáculo de iniqüidade para a casa de Israel, por isso levantei minha mão contra eles”, diz o Senhor Javé, “e eles suportarão sua iniqüidade”.
१२पण त्यांनी त्यांच्या मूर्तीपुढे इस्राएल घराण्याची सेवा केली व ते त्यास पापांत पाडणारे अडथळे झाले म्हणून मी आपला हात त्यांच्याविरुद्ध शपथ घेऊन उंचावला आहे आणि ते आपल्या पापासाठी किंमत देतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
13 Eles não se aproximarão de mim, para executar o ofício de sacerdote para mim, nem se aproximarão de nenhuma das minhas coisas santas, das coisas que são santíssimas; mas suportarão sua vergonha e suas abominações que cometeram”.
१३म्हणून माझ्याकडे याजकाचे काम करायला ते माझ्याजवळ येणार नाहीत किंवा माझ्या पवित्र वस्तुजवळ, परमपवित्र वस्तू आहेत त्यांजवळ ते येणार नाहीत; त्याऐवजी त्यांनी जे घृणास्पद कृत्ये केली आहेत त्याचा दोषीपणा व निंदा त्यांना सहन करावी लागेल.
14 No entanto, farei deles artistas do dever da casa, por todos os seus serviços e por tudo o que nela for feito.
१४पण मी त्यांना मंदिराची काळजी घेणारे, त्याच्या सर्व सेवेसाठी आणि त्यामध्ये जे काही काम करायचे त्यासाठी नेमीन.
15 “““Mas os sacerdotes levíticos, os filhos de Zadok, que cumpriram o dever de meu santuário quando os filhos de Israel se desviaram de mim, se aproximarão de mim para ministrar a mim. Eles estarão diante de mim para me oferecer a gordura e o sangue”, diz o Senhor Yahweh.
१५आणि “पण जेव्हा इस्राएलाचे लोक भरकटून माझ्यापासून दूर गेले, तेव्हा लेवी याजकापैकी सादोकाचे वंशज माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये पूर्ण करीत होते. तेच माझी सेवा करायला माझ्याजवळ येतील; आणि मला चरबी व रक्त अर्पावे म्हणून माझ्यापुढे उभे राहतील.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
16 “Eles entrarão em meu santuário, e se aproximarão da minha mesa, para ministrar a mim, e guardarão minha instrução.
१६ते माझ्या पवित्रस्थानात येतील. ते माझी आराधना करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझी कर्तव्ये पूर्ण करतील.
17 “““Será que quando entrarem pelos portões do tribunal interno, serão vestidos com roupas de linho. Nenhuma lã virá sobre eles enquanto ministrarem nos portões do pátio interno, e dentro dele.
१७ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की त्यांनी तागाची वस्त्रे घालावीत. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे घालू नयेत.
18 Eles terão turbantes de linho na cabeça, e calças de linho na cintura. Eles não se vestirão com nada que os faça suar.
१८त्यांच्या डोक्यास तागाचे फेटे असावेत व त्यांच्या कमरेची अंतर्वस्त्रेही तागाची असावीत. त्यांना घाम येईल अशी वस्रे त्यांनी घालू नयेत.
19 Quando saírem para o pátio exterior, mesmo para o pátio exterior para o povo, despirão suas vestes nas quais ministram e as colocarão nos quartos sagrados. Vestirão outras vestes, para não santificar o povo com suas vestes.
१९जेव्हा ते बाहेरील अंगणात लोकांकडे बाहेर जातील, तेव्हा त्यांच्या वस्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळेची वस्रे काढून पवित्र खोल्यात ठेवावी व दुसरी वस्रे घालावी.
20 “““Eles não devem raspar a cabeça, nem permitir que suas fechaduras cresçam muito tempo. Eles só cortarão os cabelos de suas cabeças.
२०त्यांनी आपली डोकी मुंडन करू नयेत वा केस लांब वाढू देऊ नयेत तर त्यांनी आपले केस कातरुन बारीक करावे.
21 ““Nenhum sacerdote deve beber vinho quando entrar na corte interna.
२१आतल्या अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षरस पिऊ नये.
22 Eles não levarão para suas esposas uma viúva, ou uma viúva que seja repudiada; mas levarão virgens da descendência da casa de Israel, ou uma viúva que seja viúva de um sacerdote.
२२कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली वंशातील कुमारीकेशी लग्न करावे अथवा जी पूर्वी याजकाची पत्नी होती अशी विधवा, तिच्याशी लग्न करावे.
23 Ensinarão ao meu povo a diferença entre o santo e o comum, e o farão discernir entre o impuro e o limpo.
२३त्यांनी माझ्या लोकांस “शिक्षण द्यावे. पवित्र व सामान्य, आणि शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक त्यास दाखवून द्यावा.
24 “““Em uma controvérsia, eles se levantarão para julgar. Eles a julgarão de acordo com minhas ordenanças. Eles manterão minhas leis e meus estatutos em todas as minhas festas designadas. Tornarão santos os meus sábados.
२४वादविवादाचा न्याय करण्यास त्यांनी तत्पर असावे. माझ्या निर्णयाप्रमाणे त्यांनी निवाडा करावा. ते माझ्या सर्व नेमलेल्या सणात माझे विधी व माझे नियम पाळतील, आणि माझे शब्बाथ दिवस पवित्र पाळावेत.
25 “““Eles não devem ir a nenhuma pessoa morta para se contaminar; mas para pai, ou para mãe, ou para filho, ou para filha, para irmão, ou para irmã que não teve marido, eles podem se contaminar.
२५मृताच्या जवळ जाऊन ते अशुद्ध होणार नाहीत, पण मृत पुरुष जर याजकाची स्वत: ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुद्ध झाले तरी चालेल.
26 Depois que ele estiver limpo, eles contarão com ele sete dias.
२६याजक शुद्ध झाल्यानंतर, लोकांनी त्याच्यासाठी सात दिवस मोजावे.
27 No dia em que ele entrar no santuário, na corte interna, para ministrar no santuário, ele oferecerá sua oferta pelo pecado”, diz o Senhor Yahweh.
२७मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्रस्थानातील सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, त्यादिवशी त्याने आपले पापार्पण करावे.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
28 “'Eles terão uma herança: Eu sou sua herança; e vocês não lhes darão nenhuma posse em Israel”. Eu sou sua possessão.
२८आणि हे त्याचे वतन आहे, मी त्यांचे वतन आहे. म्हणून त्यांना इस्राएलामध्ये वाटा नाही. मी त्यांचा वाटा आहे.
29 Eles comerão a oferta de refeição, a oferta pelo pecado e a oferta pela culpa; e toda coisa devota em Israel será deles.
२९त्यांना अन्नार्पण, दोषार्पण, पापार्पण ही त्यांनी खावी. इस्राएलांनी वाहिलेली हरएक वस्तू त्यांची व्हावी.
30 As primícias de cada coisa, e cada oferta de tudo, de todas as suas ofertas, serão para o sacerdote. Você também dará aos sacerdotes a primeira de sua massa, para fazer descansar uma bênção sobre sua casa.
३०सर्वप्रथम फळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करावयाची प्रत्येक वस्तू याजकाची व्हावी; तुम्ही मळलेल्या पिठाचा पहिला भाग याजकाचा असेल. अशासाठी की, तुझ्या घरात आशीर्वाद राहावा.
31 Os sacerdotes não comerão de nada que morra por si mesmo ou que seja rasgado, seja pássaro ou animal.
३१पक्ष्यातले किंवा पशूतले जे काही आपोआप मरण पावलेले किंवा फाडलेले असेल ते याजकांनी खाऊ नये.