< Deuteronômio 33 >
1 Esta é a bênção com a qual Moisés, o homem de Deus, abençoou os filhos de Israel antes de sua morte.
१देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांस आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, तो असाः
2 disse ele, “Yahweh veio do Sinai, e se levantou de Seir para eles. Ele brilhou desde o Monte Paran. Ele veio dos dez mil santos. À sua direita estava uma lei ardente para eles.
२“परमेश्वर सीनाय येथून आला. उष: कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला, दहा हजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिक त्याच्याबरोबर होते.
3 Sim, ele ama o povo. Todos os seus santos estão em suas mãos. Eles se sentaram a seus pés. Cada um recebe suas palavras.
३परमेश्वराचे आपल्या लोकांवर खरेच फार प्रेम आहे. त्याची पवित्र प्रजा त्याच्या हातात आहे. ते लोक त्याच्या पायाशी बसून त्याच्याकडून शिकवण घेतात.
4 Moisés nos ordenou uma lei, uma herança para a assembléia de Jacob.
४मोशेने आम्हास नियमशास्त्र दिले. ती शिकवण याकोबाच्या लोकांची ठेव आहे.
5 Ele foi rei em Jeshurun, quando as cabeças do povo estavam reunidas, todas as tribos de Israel juntas.
५इस्राएलचे सर्व वंश आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला.
6 “Deixe Reuben viver, e não morrer; Nem deixe seus homens serem poucos”.
६रऊबेनचे लोक मोजकेच असले तरी ते जगोत, त्यांना मरण न येवो.”
7 Isto é para Judah. Ele disse, “Ouve, Yahweh, a voz de Judá. Traga-o ao seu povo. Com suas mãos, ele lutou por si mesmo. Você será uma ajuda contra seus adversários”.
७मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला: “परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करून दे. त्यास शक्तीशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्यास साहाय्यकारी हो.”
8 Sobre Levi, disse ele, “Seu Thummim e seu Urim estão com seu piedoso, que você provou no Massah, com quem você lutou nas águas do Meribah.
८लेवीविषयी मोशे असे म्हणाला: “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवीची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करून घेतलीस.
9 Ele disse de seu pai, e de sua mãe: “Eu não o vi”. Ele não reconheceu seus irmãos, nem conhecia seus próprios filhos; pois eles cumpriram sua palavra, e mantenha seu convênio.
९हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला.
10 Eles ensinarão a Jacob suas ordenanças, e Israel, sua lei. Eles deverão colocar incenso diante de você, e toda a oferta queimada em seu altar.
१०ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलाला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील.
11 Yahweh, abençoe suas habilidades. Aceitar o trabalho de suas mãos. Ataque nos quadris daqueles que se levantam contra ele, daqueles que o odeiam, que não se levantem novamente”.
११परमेश्वरा, जे जे लेवीचे आहे त्यास आशीर्वाद दे. ते जे करतील त्याचा स्विकार कर. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा संहार कर. त्यांच्या शत्रूंना पार नेस्तनाबूत करून टाक.”
12 Sobre Benjamin, disse ele, “O amado de Yahweh viverá em segurança por ele. Ele o cobre durante todo o dia. Ele mora entre seus ombros”.
१२बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वरास प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या देशात राहील.”
13 Sobre Joseph, disse ele, “Sua terra é abençoada por Javé”, para as coisas preciosas do céu, para o orvalho, para as profundezas que se situam abaixo,
१३योसेफाविषयी तो म्हणाला, “योसेफाच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
14 para as coisas preciosas dos frutos do sol, para as coisas preciosas que a lua pode render,
१४सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्यास देवो.
15 for as melhores coisas das montanhas antigas, para as coisas preciosas das colinas eternas,
१५टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.
16 para as coisas preciosas da terra e sua plenitude, a boa vontade daquele que viveu no mato. Que isto venha sobre a cabeça de José, na coroa da cabeça daquele que foi separado de seus irmãos.
१६धरतीचा उत्तमातील उत्तम ठेवा योसेफाला मिळो. योसेफाची आपल्या भाऊबंदापासून ताटातूट झाली होती. तेव्हा जळत्या झुडूपातल्या, परमेश्वराचा दुवा त्यास मिळो.
17 A majestade pertence ao primogênito de seu rebanho. Seus chifres são os chifres do boi selvagem. Com eles, ele empurrará todos os povos até os confins do mundo. Eles são os dez mil de Efraim. Eles são os milhares de Manasseh”.
१७प्रथम जन्मलेल्या गोऱ्हासारखा त्याचा प्रताप आहे. त्याचे शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करून त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”
18 Sobre Zebulun, ele disse, “Alegre-se, Zebulun, em sua saída”; e Issachar, em suas tendas.
१८मोशे जबुलूनबद्दल म्हणाला, “जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
19 Eles chamarão os povos para a montanha. Lá eles oferecerão sacrifícios de retidão, pois eles irão extrair a abundância dos mares, os tesouros escondidos da areia”.
१९ते लोकांस आपल्या डोंगरावर बोलावतील. तेथे ते योग्य यज्ञ करतील. समुद्रातील धन आणि वाळूतील खजिना हस्तगत करतील.”
20 About Gad disse ele, “Aquele que amplia Gad é abençoado. Ele habita como uma leoa, e rasga o braço e a coroa da cabeça.
२०गादविषयी मोशे म्हणाला, “गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरून बसतो. आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो.
21 Ele forneceu a primeira parte para si mesmo, para a parte do legislador foi reservada para ele. Ele veio com a cabeça do povo. Ele executou a justiça de Yahweh, Suas ordenanças com Israel”.
२१स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वतःला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.”
22 Sobre Dan, ele disse, “Dan é um filhote de leão que salta de Bashan”.
२२दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”
23 About Naftali, disse ele, “Naftali, satisfeito com o favor, cheio da bênção de Yahweh, Possuir o oeste e o sul”.
२३नफताली विषयी मोशेने सांगितले, “नफताली, तू सर्व चांगल्या गोष्टीने समाधानी त्या तुला भरभरून मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
24 Sobre Asher, disse ele, “Asher é abençoado com crianças. Que ele seja aceitável para seus irmãos. Deixe-o mergulhar seu pé em óleo.
२४आशेर विषयी मोशने असे सांगितले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
25 Suas barras serão de ferro e bronze. Como seus dias, assim será sua força.
२५तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”
26 “Não há ninguém como Deus, Jeshurun, que cavalga sobre os céus para sua ajuda, em sua excelência sobre os céus.
२६हे यशुरुना! परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
27 O Deus eterno é a sua morada. Por baixo estão os braços eternos. Ele expulsou o inimigo de antes de você, e disse: “Destrua!”.
२७देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ राहते! तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. शत्रूंना नष्ट कर असे तो म्हणतो.
28 Israel habita em segurança, só a fonte de Jacob, Em uma terra de grãos e vinho novo. Sim, seu orvalho cai do céu.
२८म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षरसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
29 Você está feliz, Israel! Quem é como você, um povo salvo por Javé, o escudo de sua ajuda, a espada de sua excelência? Seus inimigos se submeterão a você. Você pisará em seus lugares altos”.
२९इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची महान ठिकाणे तू तुडवशील!