< 2 Reis 19 >
1 Quando o rei Ezequias o ouviu, rasgou suas roupas, cobriu-se de pano de saco e entrou na casa de Iavé.
१हे ऐकून राजा हिज्कीयाने त्याच्या अंगावरची वस्त्रे फाडली आणि गोणताट घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
2 Ele enviou Eliakim, que estava sobre a casa, Shebna, o escriba, e os anciãos dos sacerdotes, cobertos com pano de saco, ao profeta Isaías, o filho de Amoz.
२त्याने आपला घरकारभारी एल्याकीम व चिटणीस शेबना आणि वडिलधारे याजक यांना गोणताट पांघरलेले असे आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले.
3 Eles lhe disseram: “Hezekiah diz: 'Hoje é um dia de problemas, de repreensão e de rejeição; pois as crianças chegaram ao ponto de nascer, e não há forças para entregá-las'.
३ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा व धिक्काराचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे.
4 Pode ser que Yahweh, seu Deus, ouça todas as palavras de Rabshakeh, que o rei da Assíria, seu mestre, enviou para desafiar o Deus vivo, e repreenda as palavras que Yahweh, seu Deus, ouviu. Portanto, levantai vossa oração pelo remanescente que resta”.
४परमेश्वर तुझा देव कदाचित रब-शाकेचे सगळे शब्द ऐकेल, त्याचा स्वामी अश्शूराचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे. आणि जी वचने परमेश्वर तुझा देव याने ऐकली आहेत, त्यांचा कदाचित तो निषेध करील. म्हणून जे शेष राहिले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा.”
5 Então os servos do rei Ezequias vieram a Isaías.
५तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे गेले.
6 Isaías disse a eles: “Diga isto a seu senhor”: Javé diz: “Não tenham medo das palavras que ouviram, com as quais os servos do rei da Assíria me blasfemaram”.
६आणि यशया त्यांना म्हणाला, “तुझ्या स्वामीला हा निरोप द्या; की परमेश्वर असे म्हणतो ‘माझ्यासाठी जे अपमानकारक उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरुन जाऊ नका.’
7 Eis que colocarei nele um espírito, e ele ouvirá notícias, e voltará à sua própria terra. Fá-lo-ei cair pela espada em sua própria terra””.
७पाहा, मी आता त्याच्यात एक आत्मा घालीन आणि तो वर्तमान ऐकून स्वदेशी परत जाईल आणि आपल्या देशातच त्यास तलवारीने मरण येईल असे मी करणार.”
8 Então Rabshakeh voltou e encontrou o rei da Assíria em guerra contra Libnah; pois tinha ouvido dizer que havia partido de Laquis.
८नंतर रबशाके परत गेला तेव्हा त्यास अश्शूराचा राजा लिब्नाविरुध्द लढाई करताना आढळला, कारण तो लाखीशाहून निघून गेला असल्याचे त्याने ऐकले.
9 Quando ouviu falar de Tirhakah, rei da Etiópia: “Eis que ele saiu para lutar contra ti”, enviou mensageiros novamente a Ezequias, dizendo:
९मग कूशाचा राजा तिऱ्हाका आपल्याशी लढायला येत आहे असे सन्हेरीब याने ऐकले. तेव्हा त्याने राजा हिज्कीयाकडे पुन्हा दूताकरवी निरोप पाठवून म्हटले,
10 “Diga isto a Ezequias, rei de Judá”: Não deixe que seu Deus em quem confia o engane, dizendo: Jerusalém não será entregue na mão do rei da Assíria”.
१०यहूदाचा राजा हिज्कीयाला तुम्ही सांगा, “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात तो, ‘अश्शूरचा राजाच्या हाती यरूशलेम दिले जाणार नाही, असे बोलून तुला न फसवो.’
11 Eis que vocês ouviram o que os reis da Assíria fizeram a todas as terras, destruindo-as completamente. Você será entregue?
११अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे. आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले. तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही.
12 Será que os deuses das nações os entregaram, que meus pais destruíram - Gozan, Haran, Rezeph e os filhos do Éden que estavam em Telassar?
१२त्या राष्ट्राच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले.
13 Onde está o rei de Hamath, o rei de Arpad, e o rei da cidade de Sefarvaim, de Hena, e de Ivvah?
१३हमाथ, अर्पद, सफरवाईम, हेना आणि इव्वा यांचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुरळा उडाला आहे.”
14 Hezekiah recebeu a carta da mão dos mensageiros e a leu. Então Hezekiah foi até a casa de Yahweh e a espalhou antes de Yahweh.
१४हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले.
15 Ezequias orou diante de Iavé e disse: “Iavé, o Deus de Israel, que está entronizado acima dos querubins, tu és o Deus, até mesmo tu sozinho, de todos os reinos da terra”. Vocês fizeram o céu e a terra.
१५परमेश्वराची प्रार्थना करून हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस,
16 Inclina teu ouvido, Yahweh, e ouve. Abra seus olhos, Javé, e veja. Ouça as palavras de Sennacherib, que ele enviou para desafiar o Deus vivo.
१६परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा.
17 Verdadeiramente, Javé, os reis da Assíria devastaram as nações e suas terras,
१७खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत.
18 e lançaram seus deuses no fogo; pois eles não eram deuses, mas obra de mãos de homens, madeira e pedra. Portanto, eles os destruíram.
१८तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. मनुष्याने केलेल्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या.
19 Agora, portanto, Javé, nosso Deus, salvai-nos, peço-vos, da sua mão, que todos os reinos da terra saibam que vós, Javé, sois apenas Deus”.
१९तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हास या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राजांना कळेल.”
20 Então Isaías, filho de Amoz, enviou a Ezequias, dizendo: “Javé, o Deus de Israel, diz: 'Você rezou para mim contra Senaqueribe, rei da Assíria, e eu o ouvi.
२०आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवला की, “इस्राएलचा परमेश्वर देव असे म्हणतो, ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या विषयी तू केलेले गाऱ्हाणे मी ऐकले आहे.”
21 Esta é a palavra que Javé falou a respeito dele: 'A virgem filha de Sião te desprezou e te ridicularizou'. A filha de Jerusalém sacudiu sua cabeça para você.
२१“सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे. सीयोनच्या (म्हणजेच यरूशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरूशलेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते.”
22 A quem você desafiou e blasfemou? Contra quem você exaltou sua voz e ergueu os olhos para o alto? Contra o Santo de Israel!
२२पण तू कोणाचा अपमान केलास? कोणाला दुर्भाषण केलेस? तू हे कोणाविरुध्द बोललास? इस्राएलच्या पवित्र परमेश्वराविरुध्द तू गेलास. त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास.
23 Por seus mensageiros, vocês desafiaram o Senhor e disseram: “Com a multidão de meus carros, subi ao cume das montanhas, às partes mais internas do Líbano, e cortarei seus altos cedros e seus ciprestes escolhidos; e entrarei em seu lugar de hospedagem mais distante, a floresta de seu campo fértil”.
२३परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनाच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन. लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे.
24 Cavei e bebi águas estranhas, e vou secar todos os rios do Egito com a planta de meus pés”.
२४मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो. मिसरमधील नद्या सुकवून तो प्रदेश मी पादाक्रांत केला.”
25 Você não ouviu como o fiz há muito tempo, e o formei dos tempos antigos? Agora eu a fiz passar, que deveria ser sua para colocar os resíduos das cidades fortificadas em montões ruinosos.
२५तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय? “पूर्वी, फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच.
26 Portanto, seus habitantes tinham pouco poder. Estavam consternados e confusos. Eram como a grama do campo e como a erva verde, como a grama no topo da casa e como o grão que explodiu antes de crescer.
२६तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती.
27 Mas eu sei que vocês se sentaram, saíram, entraram e se enfureceram contra mim.
२७तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहित आहे.
28 Por causa de sua fúria contra mim, e porque sua arrogância subiu em minhas orelhas, por isso colocarei meu gancho em seu nariz, e meu freio em seus lábios, e o farei voltar pelo caminho pelo qual você veio”.
२८माझ्याविरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.”
29 “Este será o sinal para você: Este ano, você comerá o que cresce de si mesmo, e no segundo ano o que nasce disso; e no terceiro ano semear e colher, e plantar vinhedos e comer seus frutos.
२९“मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वत: पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा.”
30 O remanescente que escapou da casa de Judá voltará a criar raízes para baixo, e dará frutos para cima.
३०यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल.
31 Pois de Jerusalém sairá um remanescente, e do Monte Sião sairão os que escaparem. O zelo de Yahweh fará isso.
३१कारण काहीजण बचावतील. ते यरूशलेमेतून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल.
32 “Por isso Yahweh diz a respeito do rei da Assíria: “Ele não virá a esta cidade, nem atirará uma flecha lá”. Ele não virá diante dela com escudo, nem levantará um monte contra ela”.
३२“अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही.
33 Ele voltará do mesmo modo que veio, e não virá a esta cidade”, diz Javé.
३३तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
34 'Pois eu defenderei esta cidade para salvá-la, para meu próprio bem e para o bem do meu servo David'”.
३४या नगराचे रक्षण करून त्यास मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन.”
35 Naquela noite, o anjo de Yahweh saiu e atingiu cento e oitenta e cinco mil no acampamento dos assírios. Quando os homens se levantaram cedo pela manhã, eis que eram todos cadáveres.
३५त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐंशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला.
36 Então Sennacherib, rei da Assíria, partiu, foi para casa e viveu em Nínive.
३६तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता तिथे निघून गेला.
37 Quando ele estava adorando na casa de Nisroch seu deus, Adrammelech e Sharezer golpearam-no com a espada; e eles escaparam para a terra de Ararat. Esar Haddon, seu filho, reinou em seu lugar.
३७एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्यास तलवारीने मारले. मग ते अरारात देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसरहद्दोन राज्य करु लागला.