< 2 Crônicas 23 >
1 No sétimo ano, Jehoiada se fortaleceu e levou os capitães de centenas-Azarias, filho de Jeroham, Ismael, filho de Jehohanan, Azarias, filho de Obede, Maaséias, filho de Adaías, e Elishaphat, filho de Zichri, para um pacto com ele.
१यहोयादाने सातव्या वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामाचा पुत्र अजऱ्या यहोहानानाचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजऱ्या, अदायाचा पुत्र मासेया आणि जिख्रीचा पुत्र अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला.
2 Eles andaram por Judá e reuniram os levitas de todas as cidades de Judá, e os chefes de família dos pais de Israel, e vieram a Jerusalém.
२त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदाच्या नगरात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरूशलेम येथे गेले.
3 Toda a assembléia fez um convênio com o rei na casa de Deus. Jeoiada lhes disse: “Eis que o filho do rei deve reinar, como Javé falou a respeito dos filhos de Davi”.
३तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला. यहोयादा या लोकांस म्हणाला, “परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्यास अनुसरुन राजाचा पुत्र गादीवर येईल.
4 Isto é o que vocês devem fazer: uma terceira parte de vocês, que entram no sábado, dos sacerdotes e dos levitas, serão porteiros dos umbrais.
४आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक-तृतीआंश याजक आणि लेवी शब्बाथाच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा.
5 Uma terceira parte estará na casa do rei; e uma terceira parte no portão da fundação. Todo o povo estará nas cortes da casa de Yahweh.
५एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनात रहावे.
6 Mas que ninguém entre na casa de Iavé, exceto os sacerdotes e os que ministram os levitas. Eles entrarão, pois são santos, mas todo o povo seguirá as instruções de Yahweh.
६कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये, याजक व सेवा करणारे लेवी यांनीच मात्र आत यावे कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपआपली कामे करायची आहेत.
7 Os levitas rodearão o rei, cada homem com suas armas na mão. Quem quer que entre na casa, deixe-o ser morto. Esteja com o rei quando ele entrar e quando ele sair”.
७लेवींनी राजाला सर्व बाजूंनी घेराव घालावा. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायचा प्रयत्न केल्यास त्यास ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.
8 Então os Levitas e todo Judá fizeram de acordo com tudo o que Jehoiada, o sacerdote, ordenou. Cada um levou seus homens, aqueles que deveriam entrar no sábado, com aqueles que deveriam sair no sábado, pois Jehoiada o padre não dispensou o turno.
८लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथाच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली.”
9 Jehoiada o sacerdote entregou aos capitães de centenas de lanças, baldes e escudos que tinham sido do rei Davi, que estavam na casa de Deus.
९दावीद राजाचे भाले, छोट्या आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या.
10 Ele colocou todo o povo, cada homem com sua arma na mão, do lado direito da casa para o lado esquerdo da casa, perto do altar e da casa, ao redor do rei.
१०आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपआपले शस्त्र होते. मंदिराच्या सरळ उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच.
11 Depois trouxeram o filho do rei, colocaram a coroa sobre ele, deram-lhe o pacto e o fizeram rei. Jehoiada e seus filhos o ungiram, e disseram: “Viva o rei”!
११मग त्यांनी राज पुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुकुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशाला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याचे पुत्र यांनी त्यास अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले.
12 Quando Athaliah ouviu o barulho do povo correndo e elogiando o rei, ela veio até o povo na casa de Yahweh.
१२लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती लोकांकडे परमेश्वराच्या मंदिरात आली.
13 Então ela olhou, e eis que o rei estava ao lado de seu pilar na entrada, com os capitães e os trombeteiros do rei. Todo o povo da terra se regozijou e tocou trombetas. Os cantores também tocaram instrumentos musicais, e lideraram o canto de louvor. Então Athaliah rasgou suas roupas, e disse: “Traição! traição”.
१३पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजाजवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक गात होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखविण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी! फितुरी!” असे ती ओरडली.
14 Jehoiada o padre trouxe os capitães de centenas que estavam sobre o exército, e disse-lhes: “Tragam-na para fora entre as fileiras; e quem a seguir, que seja morto com a espada”. Pois o padre disse: “Não a matem na casa de Yahweh”.
१४याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्यास तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली कि, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.”
15 Então eles abriram caminho para ela. Ela foi para a entrada do portão dos cavalos da casa do rei; e eles a mataram lá.
१५राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोहोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.
16 Jehoiada fez um pacto entre ele mesmo, todo o povo e o rei, de que deveriam ser o povo de Yahweh.
१६यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.
17 Todo o povo foi à casa de Baal, quebrou-a, quebrou seus altares e suas imagens em pedaços, e matou Mattan, o sacerdote de Baal, antes dos altares.
१७मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.
18 Jehoiada nomeou os oficiais da casa de Iavé sob a mão dos sacerdotes levíticos, que David distribuiu na casa de Iavé, para oferecer os holocaustos de Iavé, como está escrito na lei de Moisés, com alegria e com cânticos, como David havia ordenado.
१८यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदीरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वरास होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले
19 Ele colocou os porteiros às portas da casa de Iavé, para que ninguém que estivesse impuro em nada entrasse.
१९कोणीही अशुद्धतेने मंदिराच्या आत येवू नये, म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले
20 Ele tomou os capitães de centenas, os nobres, os governadores do povo e todo o povo da terra, e trouxe o rei da casa de Iavé. Eles vieram pelo portão superior da casa do rei, e colocaram o rei no trono do reino.
२०सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले.
21 Assim, todo o povo da terra se alegrou e a cidade ficou quieta. Eles tinham matado Athaliah com a espada.
२१अथल्याचा तलवारीने वध झाला त्यानंतर यहूदातील लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरूशलेम नगर शांत झाले.