< 1 Samuel 15 >
1 Samuel disse a Saul: “Javé me enviou para ungi-lo para ser rei sobre seu povo, sobre Israel”. Agora, portanto, escute a voz das palavras de Iavé.
१शमुवेल शौलाला म्हणाला, “परमेश्वराने आपले लोक इस्राएल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले तर आता तू परमेश्वराची वचने ऐक.
2 Yahweh dos Exércitos diz: “Lembro-me do que Amalek fez a Israel, como se pôs contra ele no caminho quando saiu do Egito.
२सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.
3 Agora vá e golpeie Amalek, e destrua totalmente tudo o que eles têm, e não os poupe; mas mate tanto o homem quanto a mulher, bebê e lactante, boi e ovelha, camelo e burro””.
३आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रिया मुले व बालके व गाय-बैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.”
4 Saul convocou o povo, e os contou em Telaim, duzentos mil homens de pé e dez mil homens de Judá.
४मग शौलाने लोकांस बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ होते व यहूदातील माणसे दहा हजार होती.
5 Saul chegou à cidade de Amalek, e montou uma emboscada no vale.
५मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.
6 Saul disse aos quenitas: “Ide, parti, descei do meio dos amalequitas, para que eu não vos destrua com eles; pois vós mostrastes bondade para com todos os filhos de Israel quando eles subiram do Egito”. Assim, os quenitas partiram do meio dos amalequitas.
६तेव्हा शौलाने केनी लोकांस म्हटले, “अमालेक्याबरोबर तुम्हास मारू नये म्हणून तुम्ही त्याच्यांमधून निघून जा; कारण इस्राएल लोक मिसरांतून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहाने वर्तला.” तेव्हा केनी अमालेक्यामधून निघून गेले.
7 Saul atingiu os amalequitas, de Havilah enquanto você vai para Shur, que está antes do Egito.
७मग शौलाने हवीला पासून मिसरासमोरील शूरापर्यंत अमालेक्यांना मार दिला.
8 Ele tomou vivo Agag, o rei dos amalequitas, e destruiu completamente todo o povo com o fio da espada.
८त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तलवारीच्या धारेखाली जिवे मारले.
9 Mas Saul e o povo pouparam Agag e o melhor das ovelhas, do gado, dos bezerros gordos, dos cordeiros, e tudo o que era bom, e não estavam dispostos a destruí-los totalmente; mas tudo o que era vil e recusado, que eles destruíram totalmente.
९तथापि शौलाने व लोकांनी अगागला जिवंत ठेवले; तसेच मेंढरे, बैल, पशु, कोकरे, असे जे काही चांगले धष्टपुष्ट ते राखून ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे टाकाऊ आणि निरूपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी संपूर्ण नाश केला.
10 Então a palavra de Javé veio a Samuel, dizendo:
१०तेव्हा परमेश्वराचे वचन शमुवेलाकडे आले, ते म्हणाले,
11 “Entristece-me o fato de eu ter criado Saul para ser rei, pois ele deixou de me seguir, e não cumpriu meus mandamentos”. Samuel ficou furioso; e chorou a Javé a noite toda.
११“मी शौलाला राजा केले याचे मला दु: ख होत आहे. कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराचा धावा केला.
12 Samuel levantou-se cedo para encontrar-se com Saul pela manhã; e Samuel foi informado, dizendo: “Saul veio ao Carmelo, e eis que ergueu um monumento para si mesmo, virou-se, passou adiante, e desceu a Gilgal”.
१२शमुवेल शौलाला भेटण्यासाठी पहाटेस उठला. तेव्हा कोणी शमुवेलाला सांगितले की, शौल कर्मेलास आला होता आणि पाहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे.
13 Samuel veio a Saul; e Saul lhe disse: “Você é abençoado por Javé! Eu cumpri o mandamento de Yahweh”.
१३मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौल त्यास म्हणाला, “परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो! मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.”
14 Samuel disse: “Então, o que significa este sangramento das ovelhas nos meus ouvidos e o rebaixamento do gado que ouço dizer”?
१४तेव्हा शमुवेल म्हणाला, “तर मेंढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय-बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?”
15 Saul disse: “Eles os trouxeram dos amalequitas; pois o povo poupou o melhor das ovelhas e do gado, para sacrificar a Javé seu Deus”. Nós destruímos totalmente o resto”.
१५मग शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली. कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत. पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला.”
16 Então Samuel disse a Saul: “Fique, e eu lhe direi o que Javé me disse ontem à noite”. Ele disse a ele: “Diga”.
१६तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले, “तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले.” ते मी तुला ऐकवतो. शौल त्यास म्हणाला, “बोला!”
17 Samuel disse: “Embora você fosse pequeno à sua própria vista, você não foi nomeado chefe das tribos de Israel? Javé te ungiu rei sobre Israel;
१७मग शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले”
18 e Javé te enviou numa viagem, e disse: “Vai, e destrói totalmente os pecadores amalequitas, e luta contra eles até que sejam consumidos”.
१८परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की, जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर. ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर.
19 Por que então não obedecestes à voz de Iavé, mas levastes o saque, e fizestes o que era mau aos olhos de Iavé”?
१९तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले?
20 Saul disse a Samuel: “Mas eu obedeci à voz de Javé, e segui o caminho que Javé me enviou, e trouxe Agag, o rei de Amalek, e destruiu totalmente os amalequitas.
२०तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यामध्ये मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे.
21 Mas o povo tomou do saque, ovelhas e gado, o melhor das coisas dedicadas, para sacrificar a Javé seu Deus em Gilgal”.
२१परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली.”
22 Samuel disse: “Yahweh tem tanto prazer em ofertas queimadas e sacrifícios, como em obedecer à voz de Yahweh? Eis que obedecer é melhor do que sacrificar, e ouvir do que a gordura dos carneiros.
२२शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.
23 Pois a rebelião é como o pecado da bruxaria, e a teimosia é como a idolatria e o teraphim. Porque rejeitaste a palavra de Javé, ele também te rejeitou de ser rei”.
२३कारण बंडखोरी जादुगीरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.”
24 Saul disse a Samuel: “Pequei, pois transgredi o mandamento de Javé e suas palavras, porque temi o povo e obedeci à sua voz.
२४मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.
25 Agora, portanto, por favor, perdoem meu pecado, e voltem-se comigo, para que eu possa adorar a Iavé”.
२५तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
26 Samuel disse a Saul: “Não voltarei contigo; pois rejeitaste a palavra de Javé, e Javé te rejeitou de ser rei sobre Israel”.
२६शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही; कारण तू देवाचे वचन धिक्कारले, आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राज्य करण्यापासून धिक्कारले आहे.”
27 Quando Samuel se virou para ir embora, Saul agarrou a saia de seu manto, e ela se rasgou.
२७शमुवेल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.
28 Samuel lhe disse: “Javé arrancou de você hoje o reino de Israel e o deu a um vizinho seu que é melhor do que você”.
२८तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले, “परमेश्वराने आज इस्राएलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्यास दिले आहे.
29 Também a força de Israel não mentirá nem se arrependerá; pois ele não é um homem, para que se arrependa”.
२९तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.”
30 Então ele disse: “Eu pequei; mas por favor, honre-me agora diante dos anciãos do meu povo e diante de Israel, e volte comigo, para que eu possa adorar a Javé, seu Deus”.
३०तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. तरी आता मी तुला विनंती करतो माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्राएलासमोर तू माझा सन्मान कर आणि परमेश्वर तुझा देव याचे भजन पूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
31 Então Samuel voltou com Saul; e Saul adorava Yahweh.
३१मग शमुवेल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने परमेश्वराचे भजन पूजन केले.
32 Então Samuel disse: “Traga Agag o rei dos amalequitas aqui para mim”! Agag veio até ele alegremente. Agag disse: “Certamente, a amargura da morte já passou”.
३२मग शमुवेल म्हणाला, “अमालेक्याचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा.” तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला, आणि अगागाने म्हटले खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे.
33 Samuel disse: “Como sua espada tornou as mulheres sem filhos, assim sua mãe será sem filhos entre as mulheres”! Então Samuel cortou Agag em pedaços antes de Yahweh em Gilgal.
३३तेव्हा शमुवेल म्हणाला, “जसे तुझ्या तलवारीने स्त्रियांना बालकांविरहित केले आहे, तशी बायकांमध्ये तुझी आई बालकाविरहित होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वराच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले.
34 Então Samuel foi para Ramah; e Saul subiu para sua casa em Gibeah de Saul.
३४त्यानंतर शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला.
35 Samuel não veio mais para ver Saul até o dia de sua morte, mas Samuel lamentou por Saul. Iavé lamentou ter feito Saul rei sobre Israel.
३५शमुवेल आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला आणखी गेला नाही; तरी शमुवेलाने शौलासाठी शोक केला; आपण शौलाला इस्राएलांवर राजा केले म्हणून परमेश्वर अनुतापला.