< 1 Samuel 13 >

1 Saul tinha trinta anos quando se tornou rei, e reinou sobre Israel durante quarenta e dois anos.
शौल राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने (दोन) वर्षे इस्राएलावर राज्य केल्यानंतर,
2 Saul escolheu para si três mil homens de Israel, dos quais dois mil estavam com Saul em Michmash e no Monte Betel, e mil estavam com Jonathan em Gibeah de Benjamin. Ele enviou o resto do povo para suas próprias tendas.
त्याने इस्राएलातून तीन हजार पुरुष निवडून घेतले; त्यातले दोन हजार त्याच्याबरोबर मिखमाशांत व बेथेलाच्या डोंगरात होते आणि योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात एक हजार होते. बाकीच्या लोकांस त्याने त्यांच्या घराकडे पाठवले, प्रत्येकजण त्याच्या तंबूकडे गेला.
3 Jonathan atacou a guarnição dos filisteus que estava em Geba, e os filisteus ouviram falar disso. Saul tocou a trombeta por toda a terra, dizendo: “Que os hebreus ouçam”!
गिब्यात पलिष्ट्यांच्या सैन्यांना योनाथानाने पराजित केले आणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले, “इब्र्यांना ऐकू द्या.”
4 Todo Israel ouviu que Saul havia golpeado a guarnição dos filisteus, e também que Israel era considerado uma abominação para os filisteus. O povo estava reunido depois de Saul em Gilgal.
शौलाने पलिष्ट्यांच्या सैन्याला पराजित केले आणि पलिष्ट्यांना इस्राएलाचा तिरस्कार वाटू लागला, असे सर्व इस्राएलांनी ऐकले. त्यानंतर लोक शौलाजवळ गिलगालात एकत्र जमले.
5 Os filisteus se reuniram para lutar com Israel: trinta mil carros, seis mil cavaleiros, e o povo como a areia que está à beira-mar em multidão. Eles subiram e acamparam em Michmash, a leste da avenida Beth.
मग तीस हजार रथ व सहा हजार रथ चालवणारे, आणि समुद्राच्या वाळूसारखे असंख्य लोक घेऊन पलिष्टी इस्राएलाशी लढाई करायला जमले आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ-आवेनाच्या पूर्वेस तळ दिला.
6 Quando os homens de Israel viram que estavam em apuros (pois o povo estava angustiado), então o povo se escondeu em cavernas, em matas, em rochas, em túmulos e em cavernas.
आपण अडचणीत आलो आहो हे इस्राएलांनी पाहिले. कारण लोक निराश झाले होते, तेव्हा लोक गुहा, झुडपात, खडकात, विहीरीत, व खड्यात लपले.
7 Agora alguns dos hebreus haviam atravessado o Jordão para a terra de Gad e Gilead; mas quanto a Saul, ele ainda estava em Gilgal, e todo o povo o seguia tremendo.
कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले. पण शौल गिलगालात तसाच राहिला आणि सर्व लोक त्याच्यामागे थरथर कापत गेले.
8 Ele permaneceu sete dias, de acordo com o tempo estabelecido por Samuel; mas Samuel não veio a Gilgal, e o povo estava se espalhando dele.
शमुवेलाने नेमलेल्या वेळेप्रमाणे तो सात दिवस थांबला परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक शौलापासून विखरून जाऊ लागले.
9 Saul disse: “Traga a oferta queimada para mim aqui, e as ofertas de paz”. Ele ofereceu o holocausto.
तेव्हा शौलाने म्हटले, “होमार्पणे व शांत्यर्पणे इकडे माझ्यापाशी आणा.” मग त्याने होमार्पण अर्पिले.
10 Aconteceu que, assim que terminou de oferecer o holocausto, eis que Samuel chegou; e Saul saiu ao seu encontro, para cumprimentá-lo.
१०त्याने होमार्पण अर्पिण्याची समाप्ती केली तितक्यात पाहा शमुवेलाचे आगमन झाले. शौल त्यास भेटण्यास आणि अभिवादन करण्यास बाहेर गेला.
11 Samuel disse: “O que você fez?”. Saul disse: “Porque eu vi que o povo estava disperso de mim, e que você não veio nos dias designados, e que os filisteus se reuniram em Michmash,
११तेव्हा शमुवेल म्हणाला, “तू हे काय केले आहे?” शौलाने म्हटले, “कारण मी पाहिले की, लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले, आणि नेमलेल्या दिवसाच्या आत तुम्ही आला नाही, आणि पलिष्टी मिखमाश येथे जमले आहेत,
12 portanto eu disse: 'Agora os filisteus descerão sobre mim para Gilgal, e eu não tenho tratado o favor de Yahweh'. Eu me forcei, portanto, e ofereci o holocausto”.
१२म्हणून मी म्हणालो, पलिष्टी खाली गिलगालास माझ्याविरूद्ध येत आहेत आणि मी परमेश्वराची मर्जी अद्याप मिळवली नाही. म्हणून मी स्वत: च्या मजबुरीने भाग पडून होमार्पण अर्पिले.”
13 Samuel disse a Saul: “Você fez loucuras”. Não guardaste o mandamento de Javé teu Deus, que ele te ordenou; por agora Javé teria estabelecido teu reino sobre Israel para sempre”.
१३नंतर शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणाचे कृत्य केले. परमेश्वर तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते.
14 Mas agora seu reino não vai continuar. Javé buscou para si mesmo um homem, depois de seu próprio coração, e Javé o designou para ser príncipe sobre seu povo, porque não guardastes o que Javé vos ordenou”.
१४परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. परमेश्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे, आणि त्यास आपल्या लोकांचा राजा होण्यास नेमले आहे, कारण परमेश्वराने जे तुला आज्ञापिले ते तू पाळले नाही.”
15 Samuel surgiu, e foi de Gilgal para Gibeah de Benjamin. Saul contou as pessoas que estavam presentes com ele, cerca de seiscentos homens.
१५मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामिनातील गिबा येथे गेला. त्यानंतर शौलाने आपणाजवळ जे लोक होते त्यांची गणना केली, ते सुमारे सहाशे होते.
16 Saul, e Jonathan seu filho, e as pessoas que estavam presentes com eles, ficaram em Geba de Benjamin; mas os filisteus acamparam em Michmash.
१६शौल, त्याचा मुलगा योनाथान व त्याच्याबरोबरचे लोक बन्यामिनांतील गिब्यात राहिले. पण पलिष्ट्यांनी मिखमाशात छावणी केली.
17 Os invasores saíram do acampamento dos filisteus em três empresas: uma empresa se voltou para o caminho que leva a Ophrah, para a terra de Shual;
१७पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणारे तीन टोळ्या करून निघाले. एक टोळी आफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली
18 outra empresa virou o caminho para Beth Horon; e outra empresa virou o caminho da fronteira que olha para baixo no vale de Zeboim em direção ao deserto.
१८आणि दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि आणखी एक टोळी जो प्रांत सबोईम खोऱ्याकडला आहे त्याच्या वाटेने रानाकडे वळली.
19 Agora não havia ferreiro em toda a terra de Israel, pois os filisteus diziam: “Para que os hebreus não se façam espadas ou lanças”;
१९तेव्हा इस्राएलाच्या सर्व देशात कोणी लोहार मिळेना, कारण पलिष्ट्यांनी म्हटले होते, कदाचित इब्री आपणासाठी तलवारी किंवा भाले करून घेतील.
20 mas todos os israelitas desceram aos filisteus, cada um para afiar seu próprio arado, mattock, machado e foice.
२०परंतु सर्व इस्राएली लोक, आपला नांगराचा फाळ, आपली कुदळ, आपली कुऱ्हाड, आणि विळ्यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात.
21 O preço era um pagamento cada um para afiar mattocks, charruas, forquilhas, machados e goadas.
२१नांगराचा फाळ आणि कुदळ यांना धार लावण्याचे शुल्क दोन तृतीयांश शेकेल आणि एकतृतीयांश कुऱ्हाडीला धार देण्यासाठी आणि पराणी सरळ करण्यासाठी.
22 Assim aconteceu no dia da batalha que nem espada nem lança foram encontradas na mão de nenhuma das pessoas que estavam com Saul e Jonathan; mas Saul e Jonathan seu filho as tinha.
२२आणि लढाईच्या दिवशी असे झाले की, जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यातल्या कोणाच्याही हाती तलवार व भाला नव्हता. फक्त शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ ते होते.
23 A guarnição dos filisteus saiu para o desfiladeiro de Michmash.
२३पलिष्ट्यांचे सैन्य निघून मिखमाशाच्या उताराकडे गेले.

< 1 Samuel 13 >